आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
1) पो.स्टे. चिमुर अप. क्र. 224/2023 कलम 420, 34 भादंवि सहकलम 3 MPID 1999 दाखल गुन्हयामध्ये आरोपी कंपनी 1) विहान डायरेक्ट सेलींग (इंडीया) प्रा.ली. 2) युनिव्हर्सेल टेक्नालॉजी फर्म द्वारे मल्टी लेव्हल मार्केटींगच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातून 47,40,020/- रुपयाची गुंतवणुकदारांची फसवणुक केलेली आहे. या गुन्हयामध्ये आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी आरोपी अजिंक्य मुलमुले याचे मालकीचा कल्याण पलावासिटी येथील एक फ्लॅट जप्त केलेला आहे तसेच युनिव्हर्सेल टेक्नालॉजी फर्मचे कर्नाटक राज्यातील मददकेरे येथील कर्नाटक ग्रामीण बँक मधील 3,27,66,413/- रुपये जप्त करण्यात आलेले आहे.
2) पो.स्टे. रामनगर अप.क्र. 441/2015 420, 34 भादंवि सहकलम 3 MPID कायदा 1999, सहकलम 4 मनी लॉन्ड्रींग अॅक्ट प्रमाणे HBN DAIRIES@ALLIED LTD या कंपनी व त्यांचे संचालकाविरुध्द गुन्हा दाखल असून सदर कंपनीने चंद्रपूर जिल्हयातील गुंवणुकदारांची 2,52,85,887/- रु. फसवणुक केलेली आहे. सदर गुन्हयामध्ये 10 वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी 10,74,00,000/- रुपये जप्त केलेले आहेत.
3) पो.स्टे. रामनगर अप.क्र.477/2022 कलम 406, 409, 420, 506, 34 भादवि. सहकलम 3 MPID अन्वये अनमोल इंडीया अॅग्रो हर्बल फॉर्मीग अॅण्ड डेअरीज केअर लि.मी. कंपनी व कुमार मल्टी स्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडीअ सोसायटी लि.मी. चे संचालाकाविरुध्द गुन्हा दाखल असून कपंनीने चंद्रपूर जिल्हयातील गुंतवणुकदारांची 2,14,62,481/- रु. ची फसवणुक केलेली आहे. सदर गुन्हयामध्ये आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी आरोपी व कंपनीची 2,50,00,000/- कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केलेली आहे.
4) पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक 498/2022 कलम 420, 406, 409, 34 भादंवि सहकलम 3, 4 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे संरक्षण) अधिनियम 1999 अन्वये कलकाम रिअल इंफ्रा इंडीया लिमीटेड या कंपनी व त्यांचे संचालकाविरुध्द गुन्हा नोंद असून चंद्रपूर जिल्हयातील गुंतवणुकदारांची 15,24,71,337/- रुपयाची फसवणुक केलेली असून आर्थिक गुन्हे शाखे मार्फत रेडीरेकनर दरानुसार 10,73,22,629/-रु. किंमतीची मालमत्ता जप्त केली व त्याचे गॅझेट नोटीफिकेशन झाले असून उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर (SDM) यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.
5) पोलीस स्टेशन रामनगर 1627/2017 कलम 406, 409, 420,34 भादवि. सहकलम 3 एम.पी.आय.डी. अॅक्ट 1999 अन्वये मैत्रेय गृप ऑफ कंपनी व त्यांचे संचालकाविरुध्द गुन्हा नोंद असून चंद्रपूर जिल्हयातील 2,49,569 गुंतवणूकदारांची 194,21,94,730/- रु ची फसवणुक केलेली असून आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र, गोवा, राज्यस्थान राज्यातील एकुण 955 एकर जमीन जप्त करुन महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सदर मालमत्तेंचे रेडीरेकनर दारानूसार 58,80,78,896/- रुपये एवढे आहे. तसेच राज्यस्थान राज्यातील पाली जिल्हयातील 47 मालमत्तांचे गॅझेट नोटीफिकेशन करण्यात आलेले आहे.
6) पोलीस स्टेशन रामनगर अप.क्र. 211/2023 कलम 406, 409, 420, 34 भादवि. सहकलम 3 एम.पी.आय.डी. अक्ट 1999 अन्वये मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूर व त्यांचे संचालक यांचेविरुध्द गुन्हा नोंद असून सदर पतसंस्थेने 1,26,32,245/- रुपयाची गुंतवणुकदारांची ठेवी स्विकारुन फसवणुक केलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने रेडीरेकनरदरानुसार 86,33,226/- रुपयाची पतसंस्थेच्या संचालकांची खाजगी मालमत्ता जप्त केलेली आहे.
7) पो.स्टे. रामनगर अप.क्र. 1178/2020 कलम 420, 409, 34 भादंवि सहकलम 3 MPID अक्ट अन्वये PICL कंपनी व त्यांचे संचालकाविरुध्द गुन्हा नोंद असून कंपनीने चंद्रपूर जिल्हयातील गुंतवणुकदारांची 3 कोटी रुपयाची फसवणूक केलेली असून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने आरोपी कपंनी व संचालकांची रेडीरेकनर दरानुसार 1,64,72,500/- रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केलेली आहे. त्याचे गॅझेट नोटीफिकेशन झाले असून उपविभागीय अधिकारी, मुल (SDM) यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.
8) पो.स्टे. रामनगर अप.क्र. 819/2016 कलम 420, 34 भादंवि सहकलम 3 MPID अॅक्ट अन्वये जागृती अॅग्रो फुडस अॅण्ड इंफ्रा प्रोजेक्ट या कंपनी व त्यांचे संचालकाविरुध्द गुन्हा नोंद असून कंपनीने चंद्रपूर जिल्हयातील गुंतवणुकदारांची 10,77,59,376/- रुपयाची फसवणूक केलेली असून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने आरोपी कपंनी व संचालकांची रेडीरेकनर दरानुसार 2,30,88,080/-रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केलेली आहे.
वरील सर्व कार्यवाही मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर व मा. श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील श्री. सुधाकर यादव, पोलीस उपअधिक्षक, श्री. कोंडावार, पोलीस निरीक्षक, सपोनि सचिन यादव, पोउपनि श्री.चिकनकर, पोउपनि श्रीरामे, पोहवा संदीप वासेकर, पोहवा प्रभाकर तलांडे, पोहवा उज्वल साखरकर, मपोहवा श्वेता आंबोरकर यांनी पार पाडली आहे. तपासी अधिकारी सचिन यादव सहा. पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर मो.क्र.9594083141करित आहेत.



