Friday, April 17, 2026
Google search engine

ब्रह्मपुरीत १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात प्रांत अधिकाऱ्याची उपस्थिती

ब्रह्मपुरीत १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात प्रांत अधिकाऱ्याची उपस्थिती

nilesh thakre
ब्रह्मपुरी तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे दिनांक ०१ ऑगस्ट हा दिवस “महसूल दिन” म्हणुन साजरा केला जातो. ब्रह्मपुरी उपविभागात दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येत आहे.

आज एक आगस्टला “महसूल दिन व सप्ताह शुभारंभ प्रांत अधिकारी पर्वणी पाटील ब्रह्मपुरी यांचे उपस्थितीत तहसील कार्यालय, ब्रह्मपुरी, येथील सभागृहात महसूल दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. “महसूल विभागाचे विविध संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट नायब तहसीलदार लीना किशोर बोबाटे. ,उत्कृष्ट वरिष्ठ लिपिक मनीषा उईके, उत्कृष्ट प्रियंदर्शना मेश्राम, उत्कृष्ट कनिष्ठ लिपिक राकेश नैताम, उत्कृष्ट तलाठी श्रद्धा खरकाडे, उत्कृष्ट मंडळ अधिकारी बोधनवर, उत्कृष्ट कोतवाल धनपाल बोरघरे, उत्कृष्ट शिपाई शोभा वलके, फुलझेले अधिकारी कर्मचारी यांना पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र विरतण समारंभ आयोजित केले.

२ आगस्ट रोजी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे, उपविभागीय कार्यालय स्तरावर तहसिलदार, ब्रह्मपुरी,नागभीड उपअधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत यांचे सोबत उपविभागीय अधिकारी, ब्रह्मपुरी यांचे अध्यक्षतेखाली पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटपासंदर्भातील आढावा बैठक, ३ आगस्ट सकाळी १०.०० वाजता, गावामध्ये पांदन रस्ता व दुर्तफा झाडे लावणे.

४ ऑगस्टला मंडळ गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे

५ ऑगस्टला सर्व गाव येथे विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेटी देवून आधार व्हॅलिडेशन व आधार मॅपिंग करण्याबाबत सुचना देऊन पंचनामा करण्यात येणार आहे.

६ ऑगस्टला तालुक्यात शासकीय जमिनींवरील अतिक्रमण व शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत तक्रारी प्राप्त असल्यास त्या निकाली काढून अतिक्रमणे निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

  1. ७ ऑगस्ट “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नविन मानक कार्यप्रणालीप्रमाणे एस.ओ.पी. प्रमाणे धोरण पुर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभाचे आयोजन केले असल्याचे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील ब्रह्मपुरी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page