Saturday, April 18, 2026
Google search engine

रस्ता सुरक्षा सप्ताह दिन निमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताह दिन निमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य चंद्रपुर जिल्हयात दि. ०१/०१/२०२५ पासुन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व नेहरू युवा केंद्र, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता दिनांक २०/०१/२०२५ रोजी शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतुक नियमनाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली.

जनजागृती रॅली ही वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर ते बस स्टॉप परत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर पर्यंत काढण्यात आली. सदर जनजागृत्ती रॅली मध्ये सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक तसेच श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर, श्री. प्रविण सोनोने, सहायक पोलीस निरिक्षक, वा.नि.शा. अॅड देवा पाचभाई व इतर नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

तरी या जनजागृत्ती निमित्ताने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन मा.श्री. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page