
चंद्रपुरात ऐकेरी प्लास्टिकचा वापर
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होत नाही. संबंधित मनपा विभागाचे दुर्लक्ष,
चंद्रपुर –
प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची विविध प्रकारची हानी होत असल्याने शासनाने प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासन, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आणि महानगर पालिकेला दिले आहेत. मात्र जिल्ह्यात तथा शहरात प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्यामुळे खुलेआम प्लास्टिकचा वापर होत आहे.
त्याचबरोबर प्लास्टिकमुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची गंभीर शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सतत मागणी होत आहे. जेव्हापासून सरकारने एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे, तेव्हापासून थोड्या काळासाठी प्रशासन जागृत हाेते लाहाण दुकान व्यवसाईकांकडे एकेरी प्लास्टीक पिशव्या आढळल्याने दुकान व्यवसाईकांनावर थातुर मातुर कारवाही करून फक्त चालन करत दंड आकारले गेलेत.

मात्र जिल्ह्यात एकेरी प्लास्टिकचा माेठ्या प्रमाणात बिनदिक्कत माेठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे वास्तव आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून केवळ स्वताच्या फायद्यासाठी छोटे-मोठे चालान देऊन हे प्रकरण गुंडाळले जात आहे.

जनजागृती मोहीम अयशस्वी ठरत आहे
कायदा लागू होताच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत तथा महानगरपालिके मार्फतही दुकाने, हातठेले, आस्थापना आदींना भेटी देऊन प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली हाेते. या मोहिमेत अनेक व्यावसायिकांकडून प्लास्टिक जप्त करून दंडही वसूल करण्यात आला हाेता. ही मोहीम काही महिने नावा पुरतीच सुरू हाेती. मात्र आता संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक बंदी पुर्ण पणे मोहीम रखडली आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. छाेटे दुकान व्यवसाईकांना चंद्रपुर शहराच्या मध्यभागी असलेला एक माेठा व्यापारी जिल्ह्यात एकेरी प्लास्टिकचा पुरवठा करताे हे माहित असुन सुध्दा मनपा अधिकाऱ्यांकडून लाहाण दुकान व्यवसाईकांनला त्रास देण्यात येताे. परंतु पुरवठा करणा-या व्यापा-यावर कुठलीच कारवाही हाेता नाही. लाहाण दुकान व्यवसाईकांना विचारल्यास जर एकेरी प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा झालाच नाही तर आम्ही ठेवणारच कशाला किंवा ग्राहक वर्ग आम्हाला मागणारच कशाला असे बाेलुन प्रशासनाने आधी पुरवठा करणा-याला जेरबंद करावे तरच प्लास्टीक कायद्याची अमलबजावनी हाेईल असे सांगतात. परंतु प्रशासनातिल जाेंदरा घेणारे अधिकारी जर का भ्रष्ट्राचार प्रवृतीचे असतील तर कुठल्याही कायद्याची अमलबजावनी हाेणार नाही.

राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी प्लॅस्टिक बंदी कायदा लागू केला हाेता आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांना दंड व शिक्षेची तरतूदही केली आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या.
चंद्रपुर शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका माेठ्या व्यापा-या कडुन जिल्ह्यातल्याच नव्हे तर शहरातल्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा होत आहे. या बाबीची माहिती असुन ही प्रशासनातिल अधिकारी मृग गिळुन गप्प आहेत.

जिल्ह्यातील किराणा दुकान असो, दुग्धशाळा असो, उपाहारगृह असो किंवा अन्य दुकान, सर्व हातठेले असो, आजही सर्वत्र एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी प्लास्टिकचा पुरवठा कोण करत आहे. याबाबतची माहिती असुन सुध्दा जोपर्यंत पुरवठादारांवर प्रशासन कारवाई करत नाही, तोपर्यंत एकेरी प्लास्टीक पिशव्यांचा पुरवठा व वापर असाच निरंतर सुरू राहील हे मात्र नक्की



