Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपुर विधानसभा लढवणा-या ईच्छुकांच्या संख्येत लक्षनिय वाढ.

निवडणुकी पुर्वीच बैठका, मनाेमिलन तसेच कार्यक्रम राबवुन उमेंदवार झाले सक्रिय

नुकतीच लाेकसभा निवडणुक हाेवुन गेली. यात कॉंग्रेस पक्षाच्या उमेंदवाराने प्रचंड अश्या ऐतिहासिक मताने आपल्या प्रतीद्वंदीला मात देत माेठ्या मताने हरवले.

आता मात्र विधानसभेची चाहुल लागताच जे राजकीय व समाजकार्यात कार्यरत असणारे नेते मंडळी निवडणुक लढण्यास सज्ज झाले आहेत.

चंद्रपुर विधानसभा लढणा-या ईच्छुकांची लांबलचक यादी पुढे येत आहे. परंतु पक्षाच्या वतीने काेनत्या उमेंदवाराला यावेळेस टिकीट मिळेल हे आत्ताच काही निच्छित पणे सांगता येणार नाही.

कॉंग्रेस पक्षाने लाेकसभेत माेठा विजय मिळवला त्यामुळे त्यांचे नेते, कार्यक्रते, आनंद उत्सव साजरा करण्यात मग्न दिसुन येतात. मात्र भाजपला हा पराभव न पचण्यारखा असुन पक्षाचेे पदधिकारी आणि कार्यक्रत्यांनी लाेकसभे नंतर लगेच विधानसभेकरिता प्रत्येक बुथवर बेैठकी घेवुन, कार्यक्रम राबवुन माेर्चे बांधनीला, सुरवात केली आहे.

माेठ्या फरकाने विजय मिळवुन कॉंग्रेस पक्ष सध्या गदगद झालेला दिसुन येताे. त्या कारणाने आपले संघटन मजबुत करण्यास मागे तर पडणार नाही अशी चिंता आता कॉग्रेस पक्षाच्या कार्यक्रत्यांनी बाेलुन दाखवली आहे.

लाेकसभा व विधानसभा ही निवडणुक पुर्ण पणे वेगळी असते याला नाकारता येणार नाही. परंतु भाजपा कडुन चंद्रपुर विधानसभा लढणा-या ईच्छुक उमेदवार फार कमी दिसुन येत आहेत.

नुकत्याच भाजप पक्षाच्या महिला अध्यक्षा झाल्याने माजी नगरसेविका सविता कांबडे यांचे नाव इच्छुक आमदारकीसाठी चर्चेत आहे. परंतु ते निवडणुक लढवतील की नाही याचा दुजाेरा अद्याप ही त्यांनी कुठेही दिलेला नाही.

त्यात ब्रिजभुषण पाझारे हे सुध्दा आमदारकी लढण्याकरिता अनेक वर्षापासुन प्रयत्न करित आहेत. पाझारे हे पालक मंत्र्यांचे एक जवळचे कार्यक्रते असुन आमदारकीचे स्वप्न बाळगुन आहेत. आपल्या इच्छा, आकांशा, प्रजव्लीत ठेवुन ते यावेळेस चंद्रपुर विधानसभेचे भाजपचे उमेंदवार हाेवु शकतात.

आशिष मासिरकर, सध्या हे मुंगटीवार यांचे निकटवर्ती पैकी एक आहेत. चंद्रपुरात युवा कार्यक्रत्यांची फळी भाजप पक्षाला बळ देणारी आहे. त्या पेैकी भाजप कडुन निवडणुकीचा रिंगणात उतरणार एक नाव मासिरकर यांच असुन या नावाची चर्चा देखील हाेतांना दिसुन येत आहे.

जटपुरा प्रभागातिल माजी नगरसेवक राहुल घाेटेकर यांनी तर एक वर्षा पुर्वी पासुनच साेशल मिडीयावर आणि शहरात बैनर पाेस्टरवर लावुन भावी आमदार म्हणुन स्वताला फाेकस केले. परंतु कुठल्या पक्षाकडुन ते निवडणुक लढवतिल या बद्दल सस्पेंस ठेवुन आहेत. निवढणुक लढण्यास अनेक दावेदार असतांना ते कॉंग्रेस कडुन यंदा उमेदवार असु शकतात अशी ही चर्चा चंद्रपुरात हाेत आहे.

या सगळ्या नावाला बगल देत नुकत्याच लाेकसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाच्या उमेंदवारानी पैदापल्ली, तेलंगाना लाेकसभा क्षेत्रातुन निवडणुक लढत पैदापल्ली, लाेकसभा क्षेत्रातल्या विधानसभेचे सात ही आमदार कॉंग्रेस पक्षाचे असतांना दुस-या क्रमांकावर राहुन 3.5 लाख असे लक्षनिय मत मिळवले. श्रीनिवास गाेमासे हे भाजपच्या कमळ चिन्हावर चंद्रपुर विधानसभा लढवतील याची जाेरदार चर्चा सध्या चंद्रपुरकरात हाेतांना दिसते.

श्रीनिवास गाेमासे हे चंद्रपुर येथिल स्थानिक असुन ते उच्च शिक्षित व तेलगु भाषिक तसेच अनुसुचित जातीच्या समाजाचे प्रतीनिधीत्व करतात. त्यांची उमेदवारी भाजपाच्या वतीने निच्छित मानली जात आहे. असे असले तरि ते निवडणुकीस तयार आहेत की नाही हे तेच सांगु शकतात. नुकत्याच प्रियदर्शनी सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ते पालकमंत्री सुधीर मुंगट्टीवार यांच्या साेबत मंचावर उपस्थीत झाले हाेते. त्या कार्यक्रमात सुधीर मुंगटीवार यांनी चंद्रपुरातील स्थानिक असुन दुस-या राज्यात जावुन आपले वर्चस्व गाजवणारे श्रीनिवास गाैमासे हे एकमेव व्यक्तीमहत्व आहेत असे आपले मनाेगत व्यक्त करतांना बाेलुन दाखले.

विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार सुध्दा पक्षाची टिकिट मिळवतील असे कयास लावले जात आहे. चंद्रपुर विधानसभा जर का महायुतीच्या काेट्यात गेली तर शिंदे गटातले, महायुतीचे उमेंदवार म्हणुन किशाेर जाेरगेवार हेच उमेदवार असतील. परंतु २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जाेरगेवार यांना मागील निवडणुकीत मिळालेली प्रचंड मताची टक्केवारी या निवडणुकीत मिळेल की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे.

लाेकसभेत मुंगटीवार हे यंदा पराभुत हाेतिल ही चर्चा आधी पासुनच मतदारात हाेती. तशीच चर्चा जाेरगेवार यांच्या बद्दल गेल्या दाेन तीन वर्षा पासुन विधानसभा क्षेत्रातल्या मतदारात हाेतांना दिसते.

कारण अपक्ष आमदार म्हणुन मागील निवडणुकीत जाेरगेवार यांना मतदारांनी भरभरून मत दिली. यंदाची परिस्थिती पुर्ण पने वेगळी असुन यावेळेस मतदार बदल घडवतील काय ? की पुन्हा एकदा जाेगरेवार यांनाच आमदार म्हणुन निवडुण देतील. हे बघण्या सारख असेल.

कांग्रेस पक्षाकडुन काही इच्छुक उमेंदवारांनी आपली दावेदारी मजबुत असल्याचे सांगुन टिकीट आपल्याच खिशात आहे असे ठाम पणे सागतांना दिसतात.

त्यात नुकतेच सेवानिवृत झालेले पाेलिस ठाणेदार सुधाकर अंबाेरे, यांंनी कॉग्रेस पक्षात प्रवेश करीत आपली दावेदारी मजबुत असल्याचा मतदारांना संदेश दिला आहे. समाज सेवा किंवा कुठली ही राजकिय पार्शभुमी नसतांना केवळ मात्र प्रशासकिय सेवेचा अनुभव घेवुन निवडणुकीच्या तीन ते चार महिण्यापुर्वी पक्षात वेळेवर येणा-या उमेंदवाराला कॉंग्रेस कार्यक्रते स्विकारतील की नाही? हे अद्याप तरि ठाम पणे सांगता येणार नाही.

अंबाेरे यांच्या पाठीमागे स्वताचे कार्यक्रते नसतांना ते कॉंग्रेस पक्षात आल्याने पक्षाला कसे काय बळ मिळेल. असे अंबाेरे यांचा पक्ष प्रवेश करते वेळी नवनिर्वाचित खासदारांनी बालुन दाखवले. तरि ही अंबाेरे यांच्या पक्ष प्रवेश केल्यानी कॉंग्रेस पक्षाला किती लाभ हाेईल हे मात्र कार्यक्रतेच सांगु शकतील.

निवडणुकीची चाहुल लागताच या पुर्वी दाेनदा कॉग्रेस पक्षाकडुन उमेंदवारी मिळवण्यास यशश्वी ठरलेले. विधानसभेच्या निवडणुकीला अल्पावधीचा वेळ असतांना. अचानक पुन्हा बैनर पाेस्टर तसेच कार्यक्रम आयाेजित करून सक्रिय झालेले महेश मेंढे ही सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसुन येतात. पुन्हा एकदा राजकिय आखाड्यात Comeback करून हा उमेंदवार मतदारांच्या चर्चेत आला आणि निवडणुकीची उत्सुकता वाढवलेली.

विधान परिषेदेवर आमदार म्हणुन निच्छित झाले असतांना. राज्यातल्या राजकिय घडामाेडीचे बळी पडत आमदार हाेता हाेता आमदार न झालेले गायक, प्रबाेधनकार अनिरूध्द वनकर सुध्दा तिस-यांदा विधानसभा निवडणुक लढण्यास सज्ज दिसुन येतात. मात्र या वेळेस यांचे पक्ष चिन्ह हे वेगळे असेल. वनकर साहेबांचे सुध्दा विद्यमान परिस्थितीथ कॉंग्रेसची बाकावर बसुन मर्सडीज वाहण चालवण्याचा मानस दिसुन येताे.

दिक्षाभुमी वर कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमाचे आयाेजन करून कार्यक्रमास गर्दी जमा करण्यात यश प्राप्त केलेल्या अनुताई देहगांवकर या महिला उमेंदवार म्हणुन कॉंग्रेसची टिकीट मिळवण्यास प्रयत्नशिल आहेत. मात्र कार्यक्रमात झालेली चिक्कार गर्दी मतात परिवर्तन हाेईल की नाही हे निवडणुकीतच बघायला मिळेल.

बहुजन समता पर्वाचे मुख्य संजाेयक डॉ.दिलीप कांबडे सुध्दा या निवडणुकीत उभे राहणार आहेत. माजी उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे ते निकटवर्ती आहेत. म्हणुन चंद्रपुरची उमेंदवारी त्यांनाच मिळेल असा त्यांचा स्वतावर ठाम विश्वास आहे. परंतु एका कार्यक्रमाचे आयाेजन करूनच टिकिट मिळवता येत असेल तर पक्षातल्या प्रामाणिक कार्यक्रत्यांच काय? असा प्रश्न बर्याच कार्यक्रत्यांना पडलेला आहे.

दाेनदा विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचा सलग पराभव झालेला बघुन पुन्हा एकदा चंद्रपुरातिल रिब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रपुर विधानसभेची टिकीट शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने आपल्या काेट्यात घेवुन स्वताला उमेंदवारी द्यावी म्हणुन नुकतीच मायानगरी मुंबईची वारी करित आपल्या पक्षाकडुन जबरजस्त सेटिंग लावल्याचे विश्वसनिय सुत्राकडुन ही माहिती पुढे येत आहे.

भारतजाेडाे यात्रेत शामिल हाेतांना कॉग्रेस पक्षाचे व देशाचे विराेधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या साेबत राजेश अडुर यांचे साेबत असलेले छायाचित्र बैनर फलकावर चंद्रपुरकरांनी अनेकदा बघीतलेले आहे. त्यामुळे या युवा नेत्याचाही उत्साह वाढला दिसुन येताे. पक्षाचा एक हाडाचा कार्यक्रता म्हणुन ते सर्वांना चंद्रपुरात परिचित आहेत. ते सुध्दा विधानसभेत आमदारकी लढवण्याच्या तयारीत असल्याचे बाेलले जात आहे.

कॉंग्रेस पक्षाचे प्रविन पडवेकर हे देखिल मागील निवडणुकीत ही उमेंदवार म्हणुन शर्यतीत हाेते. तेव्हा मात्र त्यांना टिकीट न मिळाल्याने एकदा ते भाजप पक्षात जावुन परत त्यांनी घर वापसी केली. आता पुन्हा एकदा आमदार की लढण्याकरिता दाेन वर्षा पासुन ते स्वताचा प्रचार प्रसार करित आहेत.

या व्यतीरिक इतर पक्षाचे उमेंदवार देखिल निवडणुकीचा मैदानात उतरतील.

येणा-या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक नगरसेवक, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुध्दा भावी आमदाराचे शहरात बैनर फलक लावुन स्वताची प्रसिध्दी करित आमदारकीसाठी बारशिंग बांधुन येणा-या निवडणुकीच्या घाेडीवर बसायला तयार आहेत.

परंतु चंद्रपुर विधानसभेच्या मतदारांच्या मनात काय दळल हे, मतदारांचा काैल काेनत्या उमेंदवाराकडे असेल ते सांगता येणार नाही. विधानसभा क्षेत्रातल्या शहरी भागाचा आढावा घेतल्यास यंदा “नाेटा” यावर जास्त प्रमात मतदान हाेण्याची दाट शक्यता आहे…..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page