
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आहारी रिल्स बनवणे आणि पाहणे यास प्रचंड उधाण आले आहे. मात्र, यामुळे जीवाची राखरांगोळी होतेय. ‘रीलबळी”च्या नवसमस्याचा वेध.
फेसबुक, वॉटसअप, ट्विटर किंवा एक्स या सर्वांना ना मागे टाकत इन्स्टाग्रामला आपल्याकडे प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहण्यामध्ये दिवसातला बहुमूल्य वेळ सहजगत्या वाया घालवणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या लाखांत आहे.
यूट्यूबवरील रिल्सनाही प्रचंड प्रेक्षकवर्ग लाभत आहे, यातून रिल्स मेकिंग ही करिअरवाटही बनली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी नेहमीच काही तरी जबरदस्त किंवा हटके कंटेंट गरजेचा असतो. त्यामध्ये थ्रील असेल तर सोने पे सुहागा पण या थ्रीलच्या मागे धावताना आपल्या जीवाचेही भान राहू नये इतके बेभानपण येत असेता तर ती नक्कीच चिंतिची बाब ठरते.

अलीकडेच एका २० वर्षीय विद्यार्थिनीने रेल्वे रुळावर रील बनवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी आलेल्या ट्रेनची तीला धडक बसून तिला आपला जीव गमवावा लागला, ज्या मुलीला शिक्षण घ्यायचं होतं, खेळायचं होतं आणि चांगल्या भविष्याची स्वप्नं पहायची होती, त्या मुलीच्या या स्वप्नांची रील बनवण्याच्या नादात राखरांगोळी झाली.
इन्टाग्रामवर रिल्स बनवण्याचं सगळ्यांनाच वेड लागले आहे. व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर झटक्यात स्टार होण्याचं फंडा सगळ्यांमध्येच दिसून येत आहे. मात्र, त्यासाठी तरुणवर्ग कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता कुठल्याही टोकाला जात आहेत. या रिल बनवण्याच्या नादात अनेकाना गंभीर दुखापतदेखील झाली आहे. तसेच अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे.

अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच पुण्यातल्या घडली. दोन तरुणांच्या रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा जीव गेला. यापैकी एक तरुण दुचाकीवर बसून वेगाने दुचाकी चालवत असताना त्याचा मित्र व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. त्याच परिसरातून जाणाऱ्या एका महिलेला या दुचाकीने जोरदार धडक दिली, त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यापूर्वी डोथिवीजबाहील ठाकुली येथे
या रिल च्या नादात अनेक अल्पवयीन मुली, मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटनाही याच रिल्समुळे घडल्या आहेत. पुन्हा एक अश्याच एक चा उल्लेख करताे आहे. एक तरूण ट्रेन साेबत रिल बनवण्या मग्न हाेता. रेल्वे स्टेशन वर जशी ट्रेन जवळ आली, तसा हा तरुण ट्रेनच्या आणखी जवळ गेला, त्याला या गोष्टीचा अंदाज आला नाही की, भरधाव येणारी ट्रेन त्याला धडक देईल. शेवटी ट्रेनने मुलाला धडक दिली आणि तिथेच क्षणात आपला प्राण साेडला.
संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये जगाची एकुण लोकसंख्या ८ अब्जापेक्षा अधिक आहे तर त्यात निम्म्याहन अधिक नागरिक हे सोशल मीडियावर सक्रिय असतात, ही संख्या खूपच अधिक आहे आणि ती वाढतच जात आहे. सोशल मीडिया यूजरला काय खाऊ घालते, हे कळतच नाही आणि सक्रिय यूजरला देखील काहीच ठाऊक नाही. प्रत्यक्षात सोशल मीडियाचा अर्थ आपण चुकीने लावला आहे की काय असे आता वाटू लागले आहे.
समाजाच्या नियमांचे, रितीरिवाजांचे पालन करणे, एकत्र राहणे, सर्वांशी मिळून मिसळून राहणे म्हणजे सोशल होय आणि मीडिया म्हणजे माध्यम होय. पण हा सोशल मीडिया एकत्र आणण्याऐवजी लोकांत अंतर वाढविण्याचे काम करत आहे. मुलांची विक्री करत आहे, लोकांचे जीव घेत आहे.

समाजाला बाजार आणि माणसांना प्रॉडक्टचे रूप
लोक एकमेकांचे सेल्फी, रील स्टेट्स, स्टोरी पाहात आहेत, लाइक करत आहेत आणि विसरून जात आहेत. कोणतीही स्टोरी, रोल किंवा स्टेटस कायम नसते. काल कोणते स्टेट्स ठेवले, हेदेखील लक्षात नसते. तरीही स्पर्धा सुरू आहे.
एवढ्या मोठ्या सोशल मीडिया युनिव्हर्समुळे आयुष्य सुकर झाले आहे का? जग सुंदर झाले आहे का? आयुष्यातील अडचणी कमी झाल्या आहेत का ? याचे उत्तर रोल्स, स्टेट्स, स्टोरीतून मिळतील का?
सोशल मीडियाची सुरुवात १९९० च्या काळात झाली. त्यात जियोसिटीज, क्लासमेटस डॉट कॉम आणि सिक्स डिग्रिज डॉट कॉमसारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा मानवाच्या आयुष्यात प्रवेश झाला, सिक्स डिग्रीज हा अद्वितीय प्लॅटफॉर्म होता, कारण ती वास्तवातल्या लोकांसाठी त्यांच्या वास्तवातल्या नावाचा उपयोग करून सर्वांना जोडली जाणारी पहिली ऑनलाइन सेवा होती. यात प्रोफाइल, मित्रांची यादी, शाळा या सारख्या वैरिष्टांचा समावेश होता.
२००० च्या दशकाच्या प्रारंभी फ्रेंडस्टर आणि मायस्पेससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने व्यापक लोकप्रियता मिळवली. त्यानंतर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर अन्य एलॅटफॉर्म आले, पण या व्यासपीठावरून मानवी भावनांचा अंत होताना दिसत आहे. वास्तविक जगाच्या ठिकाणी आभासी जगाचा विस्तार दिसत आहे. समाजाला बाजार आणि माणसांना प्रॉडक्टचे रूप दिले जात आहे. ही सर्व परिस्थिती कशी काय बदलणार?

मध्यंतरी आत्महत्या या विषयावर रिल बनवणाच्या एका तरुणाचा गच्चीवरून पाय घसरला आणि तो मरण पावल्याची घटना घडली होती. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या राहणीमानात गुणमात्मक सुधारणा घडवून आणते, परंतु त्याचा वापर बेलगाम आणि अनावश्यक रीतीने करण्यात मग्न राहणे हे वेळ वाया घालवण्याबरोबरच घातक ठरू शकते, ही बाब अशा उदाहरणांवरून स्पष्ट होते.
हातात स्मार्टफोन आणि त्यात सामावलेले सोशल मीडियाचे जग है खूपच सुंदर आणि रमणीय वाटू लागते. प्रसिद्धी मिळवण्णाची चटक, ओळख निर्माण करण्यासाठी आणि लोकांची मान्यता मिळवण्यासाठी सोशल मीडियाने अनेक मार्ग दाखविले आहेत, अगदी फुकटात. पण त्याची किंमत चुकवावी लागते तेव्हा आपल्या हातून बरेच काही निघून गेल्याचे लक्षात येते. सोशल मीडिया खूपच शक्तिशाली आहे. काहीही करण्याची शक्ती यात सामावलेली आहे. कधी टिकटाक, तर कधी इन्सटाग्राम तर काही पिचेंट तर वाईयू किंवा फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी तरुण-तरुणी, जोडपे सर्व मर्यादा पार करताना दिसत आहेत हे मात्र खरे…




