चंद्रपुर जिल्ह्यातिल विधानसभा निवडणुकीची चाहुल लागताच इच्छुक उमेंदवार आता सक्रीय झालेले दिसुन येतात. चंद्रपुर / बल्लारपुर विधानसभे करिता कॉंग्रेस आणि भाजप पक्षाकडुन आपलिच दावेदारी मजबुत असल्याचे अनेक उमेंदवार बाेलुन दाखवत आहेत.
“पहिल्या पावसात निघणारे पिवळे बेडुक” जसे ओरडतात. अगदी तसेच निवडणुक जवळ येण्यापुर्वी कधी न दिसणारे नवे आमदार आता मि पण आमदार हाेणार? असे बाेंबा मारणारे देखील आता स्वत:चा प्रचार, प्रसार करतांना दिसुन येतात. या नव्या उमेंदवारांचा अती – आत्मविश्वास हा सध्या जाेमात आहे. मात्र निवडणुक झाली की हेच उमेंदवार स्व:तालाच प्रश्न करीत काेमात जातील.

यंदा पक्षाच टिकीट आपल्याच खिशात आहे असे म्हणना-या कॉग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेंदवारांची माहिती घेतल्यास. लक्षात येते की यांचे संख्याबळ आता साेळा पर्यंत गेले आहे. ही साेळा ही नावे पुर्ण पणे पक्षाचे अधिकृत नसुन इच्छुक उमेंदवारांचे आहेत.
( ही यादी लवकरच जाहीर करण्यात येईल ) परंतु भाजप पक्षातले इच्छुक उमेंदवारांनी सुध्दा येणा-या निवडणुकीत आपली दावेदारी मजबुत असल्याचे सांगत निवडणुकीचा प्रचार व प्रसार हळु हळु सुरू केला आहे. लाेकसभेत महिला उमेंदवाराला अक्षरक्षा मतदारांनी डाेक्यावर घेतल ते बघुन पुन्हा त्याची पुनवृती हाेईल या आशेने राष्ट्रीय पक्षाचा महिला देखील उमेंदवारी मिळावी म्हणुन प्रयत्नशिल आहेत.
या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षाच्या वतीने जसे की कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी/शिवसेना, राष्ट्रवादी भाजप/वंचित बहुजन आघाडी/ बि.एस.पी व ईतर पक्षातुन निवडणुक लढण्या-या इच्छुकांची माेठी गर्दी 2024 च्या निवडणुकीत हाेणार आहे. या यादीत पुन्हा वाढ हाेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कॉग्रेस पक्षात सुध्दा हिच परिस्थिती आहे तीच परिस्थिती भाजप पक्षात असल्याचे बाेलले जाते पण ते स्पष्टपणे दिसुन येत नाही. भाजप पक्षाकडुन मात्र इच्छुक उमेंदवार निवडणुक लढण्यास आता पासुन सज्ज झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लाेकसभेच्या निवडणुकीत चंद्रपुर जिल्ह्यातिल 6 ही विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेस पक्षाने ऐतिहासिक असे प्रचंड मते मिळवली. म्हणुन सहा ही विधानसभा कॉंग्रेस पक्षच जिंकेल असे ही आताच सांगता येणार नाही. परंतु कॉंग्रेस पक्षाला लाेकसभेत मिळालेले यश बघता कॉग्रेस पक्षाचे नेते कार्यक्रत्यांनी “अर्ध्या हरकंडात पिवळे” हाेवु नये. कॉंग्रेस पक्षाचे कार्यक्रते यंदा आम्हीच बाजी मारू म्हणुन अशी कार्यक्रत्यात चर्चा आहे. स्व:ताच्या प्रभागात ज्यांचे काम शुन्य आहे जे पुन्हा मनपाची निवडणुक निवडुण येतिल की नाही? असे असतांना येथिल आजी, माजी नगरसेवक ही आमदार हाेण्यास फुल फार्म मध्ये दिसुन येतात. त्यांना ही कदाचित विधान भवनाची भव्य ईमारत डाेळ्यापुढे दिसत असावी.
त्यात सांगायचे म्हनजे लाेकसभा आणि विधानसभेची निवडणुक ही पुर्ण पणे वेगळी असते. असे राजकिय जाणकार नेहमिच सांगत असतात. येणा-या विधानसभेची निवडणुक सुध्दा लाेकसभे प्रमाणे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या. एक्जिट पाेलची आकडेवारी खाेटी ठरवत पुन्हा एकदा चकीत करणारी ठरते की काय? असा अंदाज मतदारात व्यक्त केला जात आहे.

चंद्रपुर विधानसभेच्या मागे झालेल्या निवडणुकीत मुख्य पक्षाच्या उमेंदवाराला नाकारत मतदारांनी अपक्ष उमेंदवाराला माेठ्या मतानी निवडुन दिेले हाेते. मात्र यावेळेसची परिस्थिती ही अपक्ष उमेंदवाराला नक्कीच भारी पडणार. असे चंद्रपुरकरात दबक्या आवाजात चाैका चाैकात जाेरदार चर्चा हाेत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रपुर येथिल मतदारांना निवडणुकीत दिलेले आश्वासन हाेय. मात्र आमदारांनी निवडुण आल्या नंतर दिले गेलेले आश्वासन पाडले नाही असे जनतेचे म्हणने आहे.
अपक्ष आमदार म्हणुन चंद्रपुर येथिल जनतेनी निवडुण दिले असता. कधी या पक्षात तर कधी त्या पक्षाकडे आमदार साहेबांनी आपले झुकते माप दिले. ते मतदांच्या पचनी पडले नाही. सत्तेत वाटा मिळावा म्हनुन शिंदे गटाला समर्थन देत त्यांचा गाेट्यात जाऊन बसले. याची सुध्दा नाराजी मतदारात आहे. निवडणुकी पुर्वी निरंतर अनेक आंदाेलन करून प्रशासनाला आमदार साहेब वेठीस धरत हाेते. मात्र निवडुण झाल्या नंतर आधी असलेली तत्परता, आक्रमकता नंतर त्यांच्यात दिसुन आलेली नाही. “काम झाल माझ काय करू तुझ ” असे जनता आता आमदारांना बाेलत आहेत.

येणा-या विधानसभेचा निवडणुकीत शहरातिल काही डॉक्टर सुध्दा उभे राहण्यास तयार आहेत. “लग्नात बारशिंग बांधुन तयार असतात” ना अगदी तसे म्हनता येईल. ज्या डॉक्टरांना कधी रूग्ण सेवा पुर्ण पणे करता आली नाही. ते डॉक्टर आता समाजसेवा, व जनसेवेचा कागावा करतांना दिसतात व आमदार झालाेच म्हणुन “मुंगेरीलाल के हसिन सपने” बघत आहेत. याचे हे स्वप्न सार्थक हाेणार की नाही हे मात्र येणा-या निवडणुकीत बघण्या सारखे असेल?
पक्षासाठी कार्य करतांना कधीच न दिसणारे किंवा ज्यांना समाज कार्यात आपले कार्यच करता आले नाही. असे चंद्रपुर शहर पाेलिस ठाणेदार पदावर असणा-या सेवानिवृत ठाणेदार यावेळेस आमदारकीच्या शर्यतीत कॉग्रेस पक्ष “छन छन की सुनाे झनकार के पैसा बाेलता है” या गीताचा मान ठेवुन आपल्याच टिकीट देतील म्हणुन पुढे असल्याची माहिती समाेर येत आहे.
या पुर्वीच्या दाेन विधानसभा निवडणुकीत लढलेले व थाेडक्यात विधानसभेवर जाता जाता आमदार की पासुन वंचित राहणारे. या ही विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यास संपुर्ण महाराष्ट्रातात “मि वादळ वारा, मि वादळ वारा” दाैरा करित पक्षा करिता आपले याेगदान देत. मि सुध्दा आमदारकीच्या शर्यतीत मागे नाही असे सांगतांना दिसतात.
ज्या उमेदवाराने गेल्या दाेन विधानसभेत पक्षाकडुन टिकीट मिळवली. ते सुध्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यास तयार आहेत. त्यांनी चंद्रपुरकरांना एका संगीतम कार्यक्रमाची मेजवानी देवुन “अपने में हेै दम, हम किसी से नही कम” असे म्हनत शहरात विद्यमान आमदार व मंत्री यांनी प्रत्येक इव्हेंटला, जयंतीला बैनर पाेस्टर लावण्याची जी क्रांती घडवुन आनली त्यावर एक पाऊल पुढे टाकत जाेमात प्रचार प्रसार तसेच भेटीगाठी सुरू केल्याचे साेशल मिडियावर दिसुन येते.
आंबेडकरी समाजाचा आम्हीच एकमेव वारसा जपणारे आहाेत असे आंबेडकरी नेते नेहमिच सांगत असतात. लाेकसभेत आमच्याच मुळे कॉंग्रेसच्या उमेंदवाराला माेठा विजय मिळवता आला म्हणुन “आहे कुनाच याेगदान लाल दिव्याचा गाडीला” हेच लक्ष ठेवुन यावेळेस तरि अनुसुचित राखीव जागेची उमेंदवारी राष्ट्रीय पक्षाला मिळण्यासाठी प्रतीकात्मक. प्रतीकक्षेत आहेत.
गेली चार वर्ष कधी न दिसणारे आता बैनर पाेस्टरवर भावी आमदार म्हणुन स्वताला मिरवतांना दिसत आहेत. मतदारांचा नजरेत पडाव या करिता राेज नवे नवे प्रयाेग करत आहेत. तरी ही मतदार मात्र “ये पब्लिक है ये सब जानती है ये पब्लिक है” हे मनातच गीत गातांना दिसतात.
मात्र चंद्रपुर जिल्ह्यातिल राजकिय पक्ष कुनाला उमेदवारी देईल हे काही आताच नक्की सांगता येणार नाही. स्थानिकांना महत्व दिेल्या जाईल की, बाहेरील पार्सल देवुन पुन्हा एकदा चंद्रपुरच्या मतदारांवर. बाहेरचा नवा उमेंदवाराला लादल्या जाईल ? असा प्रश्न आता मतदार एकमेकांना करतांना दिसुन येतात.

आताचा मतदार हा जागृत झाला आहे. कुणाच्या सांगण्यावरून नव्हे तर आपल्या तर्क बुध्दीने याेग्य ते निर्णय घेवुनच आपला लाेकप्रतीनीधी निवळेल. हे या लाेकसभेच्या निकालानी दाखवुन सुध्दा दिले. मतदारांनी याच कारणामुळे सत्तेवर विराजमान असणा-यांचे “चारशे पार” चे स्वप्न माेडीत काढले. सत्ताधा-यांचे स्वप्न स्वप्नच राहुन गेले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा यंदा मतदारांनी माेहभंग केला.
चंद्रपुर लाेकसभा आणि विधानसभेत आपले वर्चस्व गाजवणारे सर्व पक्ष केवळ मात्र स:ताची बैनर, पाेस्टर, सांस्कृतिक साेहळे, मेळावे घेवुन जाहिरात करण्यात व्यस्त दिसुन येतात. पक्ष बांधनी बुथ प्रक्रिया, जन संपर्क, जनतेच्या समस्याचे निवारण व्हावे या कडे लक्षच देत नसतात. त्कांनी केलेली कामे हे वृतपत्राच्या कागदावरच ते दाखवत असतात. असे पक्षाच्याच काही कार्यक्रत्याच्या वतीने सागण्यात येते. त्यात राजकिय पक्षाचा अंतर्गत वाद, त्यात एकमेकाचे पायखेचण्याची रस्सीखेच, असले प्रकार घडत असुन ही ते मतदारांना दिसुन येत नसतिल काय? याचे ही चिंतन मंतन राजकिय पक्षाने करायला हवे. तुर्तास ऐवढेच………
टिप :- शासन प्रशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9420080687 या क्रमांकावर संपर्क करा.



