निलेश ठाकरे
राज्यसभा हे वरिष्ठांचे सभागृह मानले जाते. ते तसे असावे, अशीच त्याची रचना केली आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, विद्वान, सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत कलाकार नेहमीच्या निवडणूक प्रणालीपासून दूर असतात; पण त्यांच्या मार्गदर्शनाची देशाला गरज असते.

त्यामुळेच अशा व्यक्तींना विविध पक्ष आपापल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवितात. परंतु हा संकेत आता हळूहळू बाजूला पडून जो निवडणुकीत पराभूत झाला किंवा ज्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे, आहे अशा व्यक्तींना आता राज्यसभेवर पाठविले जाते.
एकदा एक नेते लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, तेव्हा त्यांना राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुचविला गेला. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला. जर मला जनतेनेच नाकारले आहे, तर आडमार्गाने पुढे जाणे मला योग्य होणार नाही. तो जनतेचा अपमान ठरेल असे तेव्हा त्यांनी म्हटले. परंतु आता तसे प्रामाणिक नेतेच नाही जे मतदारांचा आदर करतील. आताच्या नेत्यांची तर राजकारणाच्या या बाजारात स्वताला विकण्यासाठी मिळालेली संधी नेते कधीच साेडत नाहीत. म्हणुन म्हणतात ना “जिस्म बेचने वाली औरत अपनी इज्जत जरूर बेचती है, लेकिन अपना जमीर अपना इमान बेचने वाले नेताओ से वाे औरत ही भली है” जाे अपने परिवार के लिए ये सब करती है !

जनता, मतदार यांच्या मतांचा आदर करण्याचे दिवस आता केव्हाचेच संपले आहे. आता राजकारण पुर्ण पणे आर्थिक कारणाकडे गेलेले दिसुन येते. म्हनुन आताचे राजकीय पक्ष सुध्दा जाे व्यक्ती पक्षाला फंड उपल्बध्द करून देताे. अश्याच व्यक्तींना राज्यसभा आणि विधान परिषदेवर पक्षा मार्फत घेतले जाते.
मतदांरांनी निवडणुकीत नाकारलेल्या उमेंदवारांना राज्यसभेवर राजकीय पक्ष पाठवत असतील तर याला मतदारांचा अपमान म्हणायचा नाही का? हेच नव्हे तर राज्यातिल किंवा देशातील निवडणुका असतील तेव्हा ही जाे उमेंदवार निवडणुकीत पैसा लावु शकताे अश्याच उमेंदवाराला उमेंदवारी दिल्या जाते. मग पक्षात प्रामाणिक पणे काम करणा-या कार्यक्रत्यांचे काय? असा प्रश्न डाेळ्या पुढे उदभवताे.
निवडणुकीच्या वेळेस या पक्षातुन त्या पक्षात येणा-या व वेळ पडली तर स्वताला विकुन साैदेबाजी करणा-याला आपन काय म्हणायच. याचा ही कुठे तरी विचार आता व्हायला हवा. परंतु राजकारणात आता पैश्या व्यतिरिक काहीच उरलेल नाही. मान, सन्मान, प्रतिष्ठा, जर पैश्यानीच मिळत असेल तर, मग भविष्यात कदाचित निवडणुकाच हाेणार नाही.

मतदारांनी आपन निवडुन दिलेला उमेंदवार हा भ्रष्ट्राचारी आहे, हे माहीत असुन सुध्दा त्याच मतदाराला आपन वारंवार का, निवडुण देत असताे? हे मतदारांना माहित नसेल का? असे असतांना जे लाेकशाहीला घातक आहे. नेमके तेच डाेळ्या पुढे दिसुन येते, तरि सुद्धा मतदार हा न बघीतल्या सारखा करत असेल. तर या बाबीचे आता चिंतन मंतन हाेणे अत्यंत गरजेचे आहे.
शासन प्रशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9420080687 या क्रमांकावर संपर्क करा.



