Friday, April 17, 2026
Google search engine

शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातिल नागरिकात संताप.

चंद्रपुर शहराच्या अगदी मध्यभागी जयंत टॉकीजच्या जागेवर आठ मजली मॉलचे बांधकाम सुरू आहे. त्या करिता भुमिगत असलेला नाला ब्लाक करण्यात आला असे दिसुन येते. दाेन दिवसापुर्वी केवळ अर्धा तास आलेल्या वरच्या पावसामुळे संपुर्ण परिसर जलमय झाले हाेते.

या बांधकामामुळे परिसरातल्या नागरीकांना विणा कारण नाहक त्रास सहन करावा लागत असुन परिसरातील लाेकांनकडुन संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपुर मनपाकडे याबाबतच्या तक्रार येवुन सुध्दा मनपा अधिकारी मात्र मृग गिळुन गप्प बसले आहेत.

त्याचे मुख्य कारण म्हणजे हे मॉल शहरातिल राजनेतिक तसेच माेठ्या व्यापा-यांचे असल्याचे कळते. त्या कारणाने बांधकामाचे सर्व नियमावलीला बगल देत या मॉल चे काम दिवस रात्र जाेमात सुरू आहे.

आलेल्या पावसाचे छायाचित्र खालिदिलेले आहेत.

नगर रचनाकार मनपा येथुन माहिती घेतल्यास बांधकाम हाेत असलेल्या जागेला दाेन राेड असल्यास कुठले ही बांधकाम करतांना राेड मॉरजिंग साेडुनच बांधकाम करावे लागते. परंतु या कामात तसे केले असे दिसुन येत नाही. जवळ पास एक वर्षा पुर्वी मंजुर झालेला व मुख्य रसत्याकडुन ख्रिच्छन कॉलनीकडे येणा-या सिमेंट राेडचे बांधकाम एक दा नव्हे तर दुस-यांदा काही महिण्या पुर्वीच करण्यात आले हाेते. मात्र या बांधकामामुळे झालेल्या सिमेंट राेडच्या बाजुची माती पुर्णता खचल्यांने तिथुन येणा-या चारचाकी वाहणा करिता हा मार्गच बंद करण्यात आला असुन केवळ दुचाकीसाठी हा मार्ग सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे घटना स्थळी केव्हा ही अपघात हाेण्याची दाट शक्यतेला नाकारता येत नाही.  

मुख्य रसत्याला जाेडणारा व मॉलच्या बाजुने येणा-या राेडमुळे या भव्यदिव्य ईमारतीच्या बांधकामसाठी कुठला ही त्रास हाेवु नये म्हणुन, वाहतुक पाेलिसांनी बेैरिकेट लावुन सुरक्षा दिली आहे काय? असा प्रश्न परिसरातल्या नागरिकांकडुन केल्या जात आहे. या बाबत वाहतुक निरिक्षक यांचा कडुन माहिती घेतल्याल चंद्रपुर मनपा आयुक्त यांच्या सांगण्यावरून अपघातात हाेवु नये म्हणुन बेैरिकेट लावण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हेच बांधकाम काम जर सामान्य किंवा मध्यमवर्गिय नागरिकांचे असते, तर चंद्रपुर मनपाच्या आयुक्तांनी तात्काळ याेग्य ती कारवाही करण्याचे आदेश नक्कीच दिले असते. आणि मनपा कर्मचा-यांनी त्वरित जाऊन बांधकाम थांबवले असते. परंतु कायदा नियम हे सर्व सामान्य जनतेकरिताच असते ही म्हन मात्र मनपानी खरी करून दाखवली.

माेठ्यांन व्यक्तींना कायदा व नियमाचे उलंघन करण्यास शासन, प्रशासनाकडुनच मुभा दिली जाते काय? असा सवाल आता परिसरातिल नागरिकांकडुन केल्या जात आहे. या बांधकामाच्या परिसरातिल नागरिकांनी चंद्रपुर मनपा आयुक्तांना तक्रार करून देखिल सुध्दा, मनपा प्रशासन कारवाही करण्यास टाळाटाळा करतांना दिसुन येत आहे.

अनेक वृत्तपत्रात पत्रकारांनी या बाबतच्या बातम्या प्रकाशित केल्या हाेत्या. परंतु त्या पत्रकारांनी आपल्या स्तरावर मॉलच्या बातम्या कार्यालयातल्या टाेपलीत टाकत जाेंदरा घेवुन चिरीमिरीने विषय संपवत पुर्ण विराम दिल्याचे नागरीकात चर्चा आहे. तक्रारी येवुन सुध्दा मनपा एक्शन माेडवर का येत नाही? यात प्रशासन व मॉल ओनर यांच्यात काही करार तर नाही असा नागरिकांन मार्फत संशय व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page