Saturday, April 18, 2026
Google search engine

स्पीडगन सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा

स्पीडगन सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा

“वाहन धारक त्रस्त, प्रादेशिक परिवहन विभाग मस्त”

चंद्रपूर ते नागपूर हा प्रवास आपल्या खाजगी वाहनाने करून बघा सर्वप्रथम तुम्हाला जाने येणे करण्यासाठी  २३५/- रुपये टोल भरावा लागतो. पण तुम्हाला मात्र कल्पना सुध्दा नसेल, की रस्त्याच्या अगदी एका बाजुला काना कोपर्‍यात तसेच दिवस/ रात्री घाट उतारावर कायद्याची झुल पांघरून रंग-बेरंगी गाडी सोबत पांढरे/खाकी कपडे घातलेले रस्ते लुटारू दबा धरून बसलेले असतात.

आपण आपल्या सुखमय प्रवासाच्या आनंदात मग्न असतो आणि भामट्या प्रवृतीने लुटारू उतारावर लपून, दबा धरून बसलेले असतात. चक्क तुमचा खिसा दोन  हजार रुपयांत कापलेला असतो तुम्हाला त्याची तीळमात्र शंका नसते. राज्यभरात अनेक महामार्गांवर हा प्रकार आता निरंतर सुरु झाला आहे.

विषय आहे तो, महामार्गावरील (प्रादेशिक परीवहन) आरटीओ च्या ऑटोमेटिक स्पीडगन वाहनांचा…. गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक या स्पीडगन मुळे चांगल्रेच त्रस्त झाले आहेत. अलिकडे शासनाने वाहतूक नियमात मोठे बदल केले आहेत. दंडांची रकमेत सुध्दा प्रचंड वाढवलेली आहे. त्याचे चटके पुढे सर्वांनाच असाह्य होणार आहेत. त्याची झलक आता कुठे सुरु हळु हळु झाली आहे. महामार्गांवर आता जागोजागी आरटीओच्या गाड्या उभ्या राहतात. त्यात मागे एक ऑटोमॅटिक स्पीडगन कॅमेर्‍या सह लावलेली गाडी उभी असते. येणाऱ्या वाहनावर ही गन रोखली, की तिचा वेग आणि गाडी नंबर त्यात रेकोर्ड होतो. गाडी ओव्हर स्पीड असली, की त्याची माहिती ऑनलाईन त्यांच्या सर्व्हरला जाते. त्याबाबतचा दणकून एक हजार रुपये दंड त्या वाहनाच्या क्रमांकावर लावला जाते. इकडे गाडीमालक किंवा ड्रायव्हरला माहिती नसते. याच प्रकारे इतर वाहनांनी नियम मोडल्याचे मोबाईल फोटोही सर्व्हरला जातात. त्यावरही जबर दंड त्या वाहन नंबरच्या खात्यावर लावला जातो. हा दंड ऑन लाईन भरावा लागतो किंवा रांग लावून भरावा लागतो. जेव्हा केव्हा गाडीची विक्री किंवा अन्य काम आरटीओ ऑफिसला निघते तेव्हा ही भल्या मोठ्या दंडाची यादी गाडी मालकाच्या हातात पड़ते. तो दंड भरल्या शिवाय कुठले काम होतच नाही.

दंड भारलेला नाही तर कोर्टाच्या फे-या अन्य कारवाईची वाटच पाहात असते. ही एकतर्फी लूट सहन करण्याशिवाय वाहन धारकास काहीच पर्याय उपलब्ध नसतो. पूर्वीच्या काळात अनेक युद्धे होत असत युद्धातही थाेडी फार प्रामाणिकता तसेच नितीमत्ता पाळली जात असे, शत्रूवर सरळ वार कधिच केला जात नसे आधी शत्रूला “सावधान” म्हणून सावध केले जात असे मग शत्रुवर वार केला जात असे. परंतु आता हे लपून छपून हल्ला करतात. हायवे वरच्या स्पीडगनवर असलेला ट्राफिक पुलिस/ आरटीओना आता दोघांपैकी कोणत्या योद्ध्याची उपमा द्यावी हे ज्याने त्याने त्या त्या पध्दतीने वाहन धारकांनी आपापल्या अनुभवावरून ठरवायचे आहे.

बहुतेक वाहन धारकांची हिच ओरड आहे की हे ऑटो स्पीडगन वाहन ठरवून कोपर्‍यात, अडचणीच्या जागी, उतारावर, घाटउतारावर लावलेले असते. वाहनांचा उतारावर वेग आपोआप वाढतो शिवाय वाहन चालकास ते दिसू नये व बेसावध शिकार जाळ्यात अडकवावी , असा उद्देश त्यामागे या शासकिय लुटारूंचा दिसून येतो. शहरात देखील चौकातील किंवा नो एन्ट्रीचा वाहतूक पोलिस कुठेतरी टपरी आड/झाडा आड लपून बसलेला असताे आणि नवख्या वाहन धारकास जानिव पुर्वक नो एन्ट्रीत आधी येवु देतो व मग लगेच येवुन रस्त्यावर वाहनांसमाेर अवतीर्ण होवून शिटी मारतो. नंतरचे आपल्या सर्वांना ठाउकच असते.

मध्यंतरी अशा वाहतूक शिपाई जवळ ओरिजिनल शासकीय व खाजगी बनावट अशी दोन प्रकारची पावती पुस्तके असण्याचाही विषय चांगलाच गाजला होता. एका वाहतूक कर्मचार्‍याने तर चक्क कोर्टातच वाहतूक विभगाच्या प्रचंड वसूलीचा लेखाजोखा मांडला होता. पर प्रांतिय राज्यातील वाहन क्रमांकाच्या गाडीला शिट्टी मारून थांबविणे हा तर या मंडळीचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. ( जड वाहन ) ट्रकवाले तर जागोजागी लुट करण्यासाठीच असतात? चेकपोस्ट वाले, एसटीबी वाले, वाहतूक पोलिस व अन्य सर्वांचा समज असतो . बऱ्याचदा कागदपत्रे पूर्ण असले तरी वाहन चालकांना एन्ट्री द्यावी लागते. हा सरड प्रकार बळ जबरी वसुलीचा आहे असेच म्हनावे लागेल. मग काही वेळा हे ड्रायव्हर्सही एन्ट्री घेणार्‍यांना इंगा दाखवितात. कारण हे पुर्ण पणे यांच्यामुळे वैतागलेले असतात. मग हेच ट्रक ड्रायव्हर्स एकत्र होवून एन्ट्री गोळा करणाऱ्या एसटीबी वाल्यांना हायवेवर पळवून – पळवून मारतात. असले प्रकरण सुध्दा माेठ्या प्रमाणात घडलेले असुन त्याचे व्हिडिओ शुटींग करून सोशल मीडियावरही टाकल्या गेले आहे. पुढे आरटीओ, ट्राफिक वाले उभे असले की ड्रायव्हर लोक  येणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरांना ‘आगे शैतान खडा है ‘  असे म्हणून इशारा देवून सावध करतात.

वाहन धारक हा मनसोक्त लुटीसाठीचेच ग्राहक असतो. असा शासकीय वसुलीसाठी शासनाचा व खाजगी वसुलीसाठी सर्व यंत्रणांचा पक्का समज झालेला दिसुन येताे. कारण हीच वसुुली पांढरे पाेशाख खाेर डकैत यांच्यात सुध्दा वाटप केला जाताे की काय? अशी चर्चा जन सामाण्यात नेहमिच हाेत असते. आता हायवेवर जागोजागी लपून छपून ऑटोमॅटिक स्पीडगन लावून वसूलीचा नवा फंडा सुरु करण्यात आला आहे . सुरक्षित प्रवासासाठी स्पीडगन लावण्यास ही काही हरकत नाही. पण याप्रकारे घाट उतारावर व जाळे अंथरूण सावज अडकविण्याची जी घाणेरडी प्रवृती सुरू आहे, ती हरकत घेण्या सारखी आहे.. वास्तविक या ऑटो स्पीडगनची मोहिम सुरु करण्या अगोदर हायवेवर दर दहा कि.मी वर स्पीड लिमिटचे फलक लावणे ही आवश्यक होते.

हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीड लिमिट असतात. सरळ रस्त्यावर वेगळे स्पीड लिमिट, शहरी, ग्रामीण वस्ती सुरु होते तेव्हा वेगळे स्पिड लिमिट, डोंगराळ भागात, तसेच घाटात वेगळे स्पिड लिमिट, शैक्षणिक संकुल लगत वेगळे स्पिड लिमिट, कॅन्टॉनमेंट परीसरात वेगळे स्पिड लिमिट, अभयारण्य परिसरात वेगळे स्पिड लिमिट असते. आपण गाडी चालवत आहोत त्या सेक्शन मध्ये मान्यताप्राप्त स्पीड लिमिट काय आहे ? हे गाडी चालकास कळण्यासाठी जागो जागी फलक लावणे यांना आवश्यक वाटत नाही काय ? जर असे फलकच लावलेले नसतील व चालकाला आपण चालवत असलेल्या सेक्शन मध्ये स्पीड लिमिट काय आहे हे माहितच नसेल तर लिमिटच्या वर एक दोन कि.मी गेले तरी सापळा लावून त्याच्याकडून एकतर्फी भरमसाठ वसूली करणे कितपत योग्य ठरेल ? स्पीडगनवाले नियमाप्रमाणे लहान गाडी ९० किमी, ट्रक व दुचाकी ७० किमी वर दंड वसूल करतात असे म्हटले जाते. राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण वाले आमचा रस्ता शंभर ते एकशे दहा स्पीडवर गाडी चालविण्यासाठी बनला आहे असे म्हणतात केंद्रिय रस्ते मंत्री ना.नितीन गडकरी तर नागपूरहून मुंबईला सात तासात पोहोचणार असे म्हणतात. देशभरातच ते असे कुठून कुठे किती कमी वेळात पोहोचणार याचे मंत्री म्हणून अधिकृत आकडे जाहिर करत असतात. त्या आकड्यांचे व अंतराचे गणित लावले तर ते सर्व शंभर व शंभरच्या वरचेच स्पीडचे आकडे असतात हे कसे काय ? मग प्रश्न असा पडताे की हे स्पीडगन वाले बरोबर आहेत, की  मंत्री महोदय ? हे कुणी ठरवावे ? नागरिक स्पीडगन वाल्या अधिकाऱ्यांना विचारतात, की जागोजागी स्पीड लिमिटचे फलक न लावताच तुम्ही सापळे लावल्यागत ही वसुली कां करतात ? त्यावर ते उतर देतात, की “असे स्पीड लिमिटचे जागोजागी फलक लावण्यासाठी आम्ही टोल प्लाझा वाल्यांना पत्रे दिली आहेत. मग प्रत्यक्ष असे फलक लावले जाण्याआधीच तुमची वसूली कां सुरु आहे ? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे. पण काही नाही सर्व एकतर्फी ही हुकमशाहीच आहे. आधीच प्रचंड वैतागलेल्या जनतेला अजुन किती त्रास देणार ? सहन शक्तीची किती परिक्षा पाहणार ? एक दिवस या सर्व बाबीचा जनता आपल्याला नक्कीच गाेड स्वाद देईल हे मात्र तेवढेच खरे…..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page