Saturday, April 18, 2026
Google search engine

चंद्रपुर येथिल अनधिकृत ले-आऊट मालकांविरुद्ध चौकशी सुरू.

चंद्रपुर येथिल अनधिकृत ले-आऊट मालकांविरुद्ध चौकशी सुरू केली

महिनाभरापूर्वी नोटीस बजावली होती.

इराई नदीच्या काठावरील पूरग्रस्त भागात अनेक अनधिकृत ले-आऊट धारकांनी प्लाट घेणा-या ग्राहकांना बेकायदेशीरपणे प्लॉट विकुन माेठा रक्कम बळकावली आहे. त्यात चंद्रपुरातिल प्लाट घेणा-या ग्राहकांची फसवनुक झाल्याची तक्रार ग्राहकांन मार्फत केल्या जात आहे.

याप्रकरणी कारवाई करत महसूल प्रशासनाने महिनाभरापूर्वी सुमारे 98 ले-आऊट मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी केवळ 15 ते 20 ले-आऊट मालकांनी कागदपत्रे सादर केली आहेत, तर इतरांनी नोटीस देऊनही अद्याप ही कागदपत्रे सादर केलेली नाही.

दरम्यान, नायब तहसीलदारांनी 8 अनधिकृत ले-आऊटची घटनास्थळी पाहणी केली आहे. तपास प्रक्रिया अशीच निरंतर सुरूच राहणार आहे. यानंतर तहसीलदारांना अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई सुध्दा केली जाणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे चंद्रपूर शहरालगतच्या दाताळा, कोसरा, देवळा, चोराळा, आर्वत, हिंगनाळा, शिवनिचोर, बोरींठ, पडोळी, खुटाळा या गावांतील काही भागात इराई नदीचे पुराचे पाणी पोहोचत असल्याने पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी ब्लू लाईन (पूरपिडीत रेषा) काढली होती.  तेव्हापासून या भागात कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली नसतांना काही सावकारांनी काही दलाली मार्फत पूरग्रस्त भागात बेकायदेशीर अनधिकृत ले-आऊटचे जाळे पसरवुन ग्राहकांना नाेटरी करून प्लाट विक्री केली. त्यामुळे आतापर्यंत शेकडो प्लाट धारक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. प्लाट केवळ नोटरीवर विक्रीकरण्यात आले आहेत. आणि इराई नदीच्या काठावर अनधिकृत ले-आऊट टाकणाऱ्या ९८ जणांना नोटिसा बजावल्याआणि जमिनीची कागदपत्रे सादर करण्याकरिता नाेटीस बजावले हाेते. काही लेआउट मालकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. ज्या पूरग्रस्त भागातील लेआउटची नाेटीस मिळाल्या नंतर कागद पत्र सादर केले नाही. त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत 8 ले-आऊटची तपासणी करण्यात आली असून ते पूरग्रस्त भागात असल्याचे आढळून आले आहे.  तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे.

राजू धांडे, नायब तहसीलदार, चंद्रपूर

पुरग्रस्त भागात नाेटरी आधारे सर्रासपणे भूखंड विकले जात आहेत.  महसूल विभागाच्या कारवाईनंतर या ले-आऊटमधील भूखंडांची विक्री मंदावली असली, तरी यापूर्वी खरेदी केलेल्या भूखंडधारकांनीही घरे बांधली आहेत.  अजूनही अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू असून या ले-आऊटमध्ये भूखंड खरेदी करणाऱ्यांना भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनधिकृत लेआउटची चौकशी प्रशासन करत आहे.  नायब तहसीलदार राजू धांडे हे गेल्या काही दिवसांपासून माेक्यावर तपासणी करत आहेत.  आतापर्यंत 8 ले-आऊटची तपासणी करण्यात आली असून, पूरग्रस्त भागात हे ले-आऊट बेकायदेशीरपणे बसविण्यात आल्याचे आढळून आले आहे.  काही ठिकाणी केवळ प्लॉटचे खडे टाकण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी कच्चा रस्तेही बांधण्यात आले आहेत. त्यामुळे प्लाट विकणा-यांचे धाबे दणानले असुन प्लाट घेणा-यांची फसवनुक झाल्याची लक्षात येताच ते सध्या चिंतेत पडलेले दिसुन येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page