
सध्या नवीन हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली किमान २५-३० हजार कोटी रुपये नागरिकांच्या खिशातून जाणार आहे…
सध्या नवीन हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली देशातील करोडो गाड्यांच्या नंबर प्लेट बदलण्याचे फर्मान सरकारने काढले आहे. यासाठी १८ कंपन्यांना काम दिल्याचे सरकारी वेबसाईट वर नमूद केलेले आहे. देशात ३५ कोटी वाहने आहेत, आणि या नंबर प्लेट साठी वाहनधारकांना खर्च करावे लागणार आहेत.
५००-१५०० रुपये. म्हणजे किमान २५-३० हजार कोटी रुपये नागरिकांच्या खिशातून जाणार आहे…
आपण यावर विरोध करू शकत नाही, कारण सुरक्षा शब्दाच्या नावाखाली सगळे भक्तगण आपल्यावरच तुटून पडतील. कोर्टात PIL घेऊन जावे तर कोर्ट आधी लाख रुपये डिपॉजिट भरायला लावतं, जरी ते पैसे आपण खिशातून भरले तरी कोर्ट पुढे जाऊन PIL सुरक्षेच्या नावाखाली नामंजूर करणार आणि ते लाख रुपये जप्त करणार, दोन तीन हजार रुपयांच्या विरोध करण्याच्या नादात लाख रुपयांचा चुना लागणार आणि ज्या लोकांसाठी आपण हा खेळ केलाय ते लोक आपल्यालाच वेड्यात काढणार…

सरकारला सुरक्षेचं एवढं पडलं आहे तर सरकारने स्वतः खर्च करावा, प्रत्येक खर्च लोकांच्या माथी का मारावा. आपण टोल भरतोय, राेड टॅक्स भरतोय, इन्कम टॅक्स भरतोय, GST भरतोय.कायदेशीर मार्गाने कुणी विरोध करायच्या भानगडीतच पडलेलं नाही व पडणार सुध्दा नाही आता तरी जनतेनी सरकार निवडणु देतांना विचार करून मतदान करायला हवे. केवल धार्मिक राजकारण करून जर का? आपला खिसा सरकार रिकामा करत असेल तर अश्या सरकारला जनतेनी सत्तेतुन हद्दपार करायला हवे.



