Friday, April 17, 2026
Google search engine

सावलीत स्पंदन सखी परिवारतर्फे हळदीकुंकू व सत्कार सोहळा उत्साहात.

सावलीत स्पंदन सखी परिवारतर्फे हळदीकुंकू व सत्कार सोहळा उत्साहात.

सावली प्रतिनिधी :

स्पंदन सखी परिवार बसस्टॅण्ड ग्रुप सावली यांच्या वतीने सावली येथील जुन्या नगरपंचायतच्या पटांगणावर नुकताच हळदीकुंकू, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम आनंदात पार पडला.

या कार्यक्रमात सावली येथील परिचित स्वच्छता दूत तसेच पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रशांत तावाडे हे नेहमीच लोकोपयोगी कार्यात सक्रिय असून गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असतात. स्वच्छतेचा वसा घेत गोळीबार चौक, जयभीम वाचनालय व बुद्धविहार परिसरातील केरकचरा नियमितपणे उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. तसेच लोकसहभागातून विविध विकासात्मक व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

या सामाजिक कार्याची दखल घेत स्पंदन सखी परिवार बसस्टॅण्ड ग्रुप सावली यांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू वाणाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पंदन सखी परिवारातील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page