Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपूर महानगरपालिका : काँग्रेसमधील ‘मुलाखती’ की ठरवून केलेली नाट्यछटा?

✍️ nilesh thakre
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २२ डिसेंबरला दाताळा राेड वरील जिजाऊ सभागृहात काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती म्हणजे केवळ औपचारिकतेचा दिखावा ठरल्याची तीव्र चर्चा आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते आहे. बाहेरून लोकशाही प्रक्रियेचे भास निर्माण करण्याचा हा प्रयत्न असला, तरी आतखान्यात उमेदवारांची यादी आधीच ठरलेली आहे, अशीच भावना या ‘मुलाखतीं’दरम्यान उपस्थितांमध्ये निर्माण झाली.

खरे तर काँग्रेस पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये लक्षणीय यश संपादन केले. या विजयामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र या यशाचे खरे श्रेय कुणाला जाते, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज पक्षाला आज नितांत आवश्यक आहे. अन्यथा “अर्ध्या हळदीत पिवळे होणे” ही म्हण काँग्रेसच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरल्याशिवाय राहणार नाही.

*”मुलाखतींचा देखावा आणि वास्तवातील दरी”*

या मुलाखतीचा वेळ दुपारी दाेन वाजता निच्छित करण्यात आला हाेता. इच्छुक उमेंदवारांनी दिड वाजेपासुनच गर्दी केली हाेती. परंतु नेहमी प्रमाणे नेत्यांच्या विलंबनामुळे तसे येण्यास उशीर हाेत असल्याने इच्छुक उमेंदवारांना चार वाजे पर्यंत तात्काळत वाट बघत राहवी लागली. घेतलेल्या मुलाखतींमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांना आपली व्यथा मांडणार हाेते.

प्रभागांतील उमेदवार हे आधीच ‘निश्चित’ असल्याची चर्चा दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे सभागृहात सुरू होती. मात्र मुलाखती आधीच उशीराने सुरू झाल्याने उमेंदवारांची व्यथा एकुन घेण्याच्या नेते मानसिकतेत दिसत नव्हते. अनेक मुलाखतींच्या प्रक्रियेत ना प्रश्नांची खोली होती, ना उमेदवारांच्या कामाचा, त्यागाचा, संघर्षाचा गांभीर्याने विचार केला गेला. खर तर नेत्यांनी एक एका उमेंदवाराची मुलाखात घ्यायला हवी हाेती. मात्र एका वेळेस सहा उमेंदवारांना एकाच वेळेस बाेलवल जात हाेत. एका वेळेस अनेक उमेंदवारा थातुर मातुर प्रश्न करित नेत्यांनकडुन लक्ष न दिल्या सारख केले जात हाेते. त्यात मुलाखती हे आमदार,खासदार जिल्हा, शहर अध्यक्ष तथा निवडणुक निरिक्षक घेणार हाेते. मात्र तसे झाले नाही? मुलाखती दरम्यान अनेक पक्षाचे पदधिकारी सुध्दा उपस्थित हाेते. त्यांच्या समाेर ह्या मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे या मुलाखती म्हणजे केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी उभा केलेला एक औपचारिक मंच होता, असेच चित्र दिसून आले.

जर उमेदवार आधीच ठरलेले असतील, तर मग पक्षांतर्गत मुलाखती घेण्याचा दिखावा का? कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उगाचच का वाढवायच्या? हा प्रश्न आज काँग्रेसमधील अनेक निष्ठावान कार्यकर्ते विचारत आहेत.

*”यश कुणामुळे मिळाले? प्रश्न टाळण्याची चूक ठरू शकते घातक”*

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांतील काँग्रेसचा विजय हा केवळ नेत्यांच्या भाषणांमुळे किंवा दिल्ली–मुंबईतील रणनीतीमुळे मिळालेला नाही. हा विजय मिळवून दिला तो गावपातळीवरील, प्रभागपातळीवरील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी. उन्हातान्हात फिरून, स्वतःचा पैसा खर्च करून, मतदारांशी थेट संवाद साधून पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी हा किल्ला जिंकून दिला.
मात्र दुर्दैवाने, अश्याच कार्यकर्त्यांना आज महानगरपालिकेच्या उमेदवारी प्रक्रियेत डावलले जात असल्याची भावना बळावत आहे.

जर या विजयाचे श्रेय नेमके कुणाला जाते याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाले नाही, तर काँग्रेस पक्ष स्वतःच्याच यशाचा गैरसमज करून बसू शकतो.
निकटवर्तीयांची ‘मक्तेदारी’ आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास
काँग्रेस पक्षात आजही एक कटू सत्य वारंवार समोर येते—नेत्यांच्या अगदी निकटवर्तीयांनाच तिकीट मिळते. पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणारा कार्यकर्ता मागे राहतो आणि ‘ओळखी’, ‘शिफारसी’ व ‘समीकरणे’ असलेले पुढे जातात. हा आरोप आज नवीन नाही, मात्र तो प्रत्येक निवडणुकीत अधिक ठळकपणे समोर येतो.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचे संकेत मिळत आहेत. जर असेच सुरू राहिले, तर पक्षातील प्रामाणिक, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ता जेव्हा हतबल होतो, तेव्हा पक्षाची मुळे कमकुवत होतात—आणि ही बाब कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत धोकादायक असते.

**”लोकशाहीचा गाभा की केवळ घोषणाबाजी?”**

काँग्रेस पक्ष स्वतःला लोकशाही मूल्यांचा रक्षक म्हणून मिरवतो. मात्र पक्षांतर्गत लोकशाहीच जर केवळ कागदावर आणि प्रसिद्धीपत्रकांपुरती मर्यादित असेल, तर सामान्य जनतेसमोर पक्षाची विश्वासार्हता कशी टिकणार? उमेदवार निवड ही प्रक्रिया पारदर्शक, प्रामाणिक आणि कामाच्या आधारावर नसेल, तर ‘लोकशाही’ हा शब्द फक्त घोषणाबाजीपुरता उरेल.

मुलाखती नावापुरत्या घेऊन, आधीच ठरलेल्या उमेदवारांना पुढे रेटण्याचा प्रकार हा पक्षाच्या दीर्घकालीन हिताला मारक आहे. अल्पकालीन सोयीसाठी घेतलेले निर्णय भविष्यात मोठी किंमत वसूल करतात, याचा अनुभव काँग्रेसने याआधीही अनेकदा घेतलेला आहे.

*”इशारा वेळेत ऐकला नाही, तर परिणाम अटळ”*

आज जे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत, ते उद्या गप्प बसतीलच असे नाही. काहीजण निष्क्रिय होतील, काहीजण कामात मन लावणार नाहीत, तर काही जण पर्यायांचा विचारही करू शकतात. ही परिस्थिती काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.

महानगरपालिका निवडणूक ही केवळ एक निवडणूक नाही, तर शहरी राजकारणात काँग्रेसची दिशा ठरवणारी लढाई आहे. ती जिंकायची असेल, तर कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपावा लागेल, पक्षांतर्गत लोकशाहीला खरे अर्थाने जागा द्यावी लागेल आणि ‘ठरवून दिलेल्या’ उमेदवारांच्या राजकारणाला आवर घालावा लागेल.

*”आत्मपरीक्षणाची गरज”*

चंद्रपूर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जर केवळ औपचारिकता ठरत असतील, तर तो काँग्रेस पक्षासाठी गंभीर इशारा आहे. यशाच्या नशेत आत्मपरीक्षण टाळणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. आज वेळ आहे—कार्यकर्त्यांचे ऐकण्याची, पारदर्शक निर्णय घेण्याची आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जपण्याची.
अन्यथा, काँग्रेसचा आजचा उत्साह उद्याच्या अपयशाची नांदी ठरल्याशिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page