घुग्घूस येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, घुग्घूस तर्फे सामान्य गरीब जनतेची मोठी आर्थिक फसवणूक – अमित बोरकर शिवसेना ( उबाठा ) घुग्घुस
कल्याण सोदारी प्रतिनिधी चंद्रपूर तालुका
घुग्घुस: येथील गरीब जनतेला कोणतीही पूर्वसुचना न देता घरी जाऊन महिलांना जबरदस्तीने पोलिसांच्या मदतीने घेराव घेऊन पैसा वसुली व मालमत्ता जप्तीची कारवाईने मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक नाहक त्रास करीत आहे.
घुग्घूस ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित घुग्घूस (रजि.नं. ३५९ ) ने घुग्घुस येथील गरीब जनतेला मागील पाच वर्ष पूर्वी कोरोना काळामध्ये कर्जाच्या स्वरूपात लोन वाटण्यात आले तेव्हा पासून आज तागायत पर्यंत लोणची वसुली मोठ्या प्रमाणात टक्केवारी वाढवून करण्यात आली,त्यामध्ये लोनची काही लोकांची वसुलीमध्ये अंतर पडल्यामुळे त्या वसुली धमकावून जोर जबरदस्तीने पैसा व मालमत्ता जप्ती करण्यासंदर्भात मोठी कारवाई करून जनतेला वेठीस धरत असल्याची माहिती घुग्घूस मध्ये वाऱ्यासारखी पसरली असल्याने अमित बोरकर शिवसेना (उबाठा ) घुग्घूस यांना माहिती होताच संबंधित पोलीस विभागाशी चर्चा करून माहिती घेतली असता असे लक्षात आले की सदर पोलीस हे कुठल्याही पद्धतीच्या सदर कारवाई संबंधित संस्थेचा जप्ती कारवाईचा अर्ज नसून सुद्धा तसेच आपसी संगणमताने कायदा धाब्यावर बसवून सदर विषयाच्या कारवाईस पुढे संस्थेला साथ देत आहे ही बाब लक्षात येताच शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने अमित बोरकर सदर समस्या ग्रस्त महिलांना घेऊन चंद्रपूर येथे वरिष्ठ अधिकारी पोलीस विभाग तसेच कायदेशीर कारवाई संदर्भात योग्य कारवाई जर केली नाही तर पुढील सात दिवसात सदर संस्थे विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्या चा इशारा अमित बोरकर शिवसेना (उबाठा ) यांनी दिला आहे यावेळेस अमित बोरकर, गणेश उईके, मारुती जुमानले व इतर उपस्थित होते.



