चंद्रपुरातिल अवैध सावकारी करणारे सावकार यांचेविरुध्द तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे लेखी तक्रार करावी.
आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
अवैध सावकारी करणारे सावकार 1) ऋषीराज सोमाणी 2) रोहीत सोमाणी 3) सुनिता राधेश्याम सोमाणी 4) राधीका सोमाणी 5) अजय हर्षदारय संघवी 6) प्रिती मनोज संघवी 7) स्तुती ऋषीराज सोमाणी आणि 8) अशोक मुलजीभाई ठक्कर यांचेविरुध्द अवैध सावकारी प्रकरणातून सावकारांनी चंद्रपुरातिल अनेक कास्तकारांच्या जमीनी स्वतःच्या नावे करुन घेतल्या आहेत. त्या संदर्भात मा.जिल्हा पाेलिस अधिक्षक यांच्या आदेशा नुसार आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर कडुन तपास सुरु आहे.
या सर्व अवैध सावकारांन मार्फत कुनाचा ही आर्थिक व्यवहार झाला असल्यास किंवा कुनाच्या जमिनी या सावकारांनी गहाळ केले असल्यास अशा सर्व तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे लेखी तक्रार अर्ज, व सर्व कागदपत्रासह तक्रारी दाखल करावे असे आव्हान आर्थिक गुन्हे शाखेचे <span;>तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, सचिन यादव यांनी केले आहे.
वरील नमुद 01 ते 07 सावकारांविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर गु.रं.नं. 80/2025 कलम 420, 465, 467, 471, 474, 34, 120 (ब) R/W महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39, 45, R/W नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 (क), R/W कलम 3 MPID कायदा 1999 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तसेच अशोक मुलजीभाई ठक्कर या सावकाराविरोधात पोलीस स्टेशन दुर्गापूर अप क्र.218/2022 कलम 420, 406, 467,468 भा.दं.वि. सहकलम 3 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधिल हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम 1999 आणि पो.स्टे. रामनगर अपराध क्र. 685/2024 कलम 115 (2), 3 (5), 333, 351 (2) BNS 2023 अन्वये गुन्हा नोंद आहे.
तरी चंद्रपूर जिल्हयातील लोकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांचे शेतजमीनी, प्लॉट, घर किंवा जंगम मालमत्ता अवैध सावकाराकीतून बळकावल्यास असल्यास त्यांनी लेखी तक्रार व समक्ष आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर राहून तक्रार दयावी.
वरील सावकारांविरोध कोणत्या नागरीकांना गोपनिय माहिती दयावयाची असल्यास त्यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. त्याकरीता तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, सचिन यादव, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे मोबाईल क्र. 9594083141 वर संपर्क साधावा.



