Saturday, April 18, 2026
Google search engine

संधीसाधू, लाचार राजकारणी नेत्यांनी महाराष्ट्र नासवला.

संधीसाधू, लाचार राजकारणी नेत्यांनी महाराष्ट्र नासवला.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हे महाराष्ट्रातिल, पत्रकार, मतदार वर्ग, राजकिय अभ्यासक तथा अजुन ही मतदाराचा हक्क न बजावणारा साेळा वर्षीय युवा वर्ग तथा पहील्यांचदा मतदान करणारे युवकांना न पटणारा अनाकलनीयच नव्हे तर अचंबित करणारे आहेत.

लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देऊन हवेत उडणाऱ्या महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने लाेकसभेत जमिनीवर आणले. त्यांचा अती आत्मविश्वास हाेरपडुन काढला. महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता लक्षात येताच महायुतीने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करताना सत्तेचा आपल्या विधानसभा निवडणुकीत कसा फायदा उचलायचा ह्याचे गणित लक्षात घेत अक्षरषा पेैश्याचा राेख रक्कमेचा पाऊस पाडत लाडकी बहीण योजना अमलात आणली. त्याला राज्यातिल महिलांनकडुन प्रचंड प्रतिसाद ही मिळाला. कारण देशातिल वाढती महागाई, तसेच राज्यातिल सुशिक्षित युवकांची बेरोजगारी पाहता जे मिळतंय ते स्वीकारा कारण ती काळाची गरज होती आणि जे देणार आहेत त्यांची हि योजना पुढे सतत चालू राहावी ह्यासाठी महिलांनी खास करून महायुतीला भरघोस मतदान केले का असा प्रश्न? उदभवताे

त्याचाच फायदा महायुतीला मिळाला असे महायुतींच्या नेत्यांचा दावा आहे हा किती खरा असेल हे महायुतीच्या नेत्यांनकडे बघुन जानवते. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीची आर्थिक बाजू कमकुवत होती त्याच बरोबर लोकसभेला मिळालेल्या प्रतिसादाची, यश संपादनाची हवा महाविकास आघाडीचे नेत्यांच्या डोक्यात गेली हाेती असे ही म्हणता येईल.

मुख्यमंत्री पदाच्या वादाने अंतर्गत धुसफूस ही महाविकास आघाडीत सुरु झाली. त्यात ही भाजप पक्षा सारखे संघटन मजबुत नसल्याचा फटका देखिल कांग्रेस पक्षाच्या हारण्याचे मुख्य कारण असुन शकते.

महाविकास आघाडीच्या लाडक्या बहिणीला वाढीव रक्कम देण्याच्या घोषणेवर महिलांनी विश्वास ठेवला नाही. महायुतीला मतदान करताना उमेदवार नव्हे तर मतदारांनी फक्त चिन्ह लक्षात ठेवले ( कारण अनेक वर्षा पासुन घडी़ आणि धनुष्यबाण हे चिन्ह खास करून ग्रामिण मतदारांच्या लक्षात आहे ) म्हणून संजय राठोड, गोपीनाथ पडळकर, राम कदम, धनंजय मुंढे, संतोष बांगर, नितेश राणे आणि असे अनके हुकमी बदनाम वाचाळ लंपट, चरित्रहीन उमेदवार यंदा निवडून आले.

गुजरातच्या एका अति धनाढ्य उद्योगपतीने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे म्हणून गुजरातेतून रोख चौतीशे कोटी रक्कम असलेले कंटेनर महाराष्ट्रात पाठवले. त्याच पैश्यांनी दोन हजार ते दहा हजार चे पाकीट मतदारात वाटप करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात जनतेत हाेत आहे. त्याच बरोबर निवडणुकीत मतदारांसाठी महायुतीच्या उमेंदवारांनी दोन वेळची बिर्याणी आणि दारूची सोय करून मतांची बेगमी केली अशी चर्चाही सर्वत्र केली जात आहे.

चौतीशचे कोटी हि मोठी रक्कम अतिधनाढ्य उद्योगपतीने खैरात म्हणून नक्कीच दिली नसणार. कारण याच अतिधनाढ्य उद्योगपतीचे बाहत्तर हजार कराेडचे कर्ज केंद्र सरकारच्या मध्यस्थिने माफ करण्यात आले हे विशेष.   
याच अतिधनाढ्य उद्योगपती करिता महाराष्ट्राचा गुजरात करण्याचे, मुंबई केंद्रशासित राज्य करण्याचा डाव, मुंबईतिल महत्वाच्या मोक्याच्या जागा हडप करण्याचे कारस्थान, विरोधी पक्षांना पुर्णतास संपवण्याची योजना, राष्ट्रीय बँकांवर वर्चस्व, अश्या अनेक गोष्टी स्वार्थ साधणाचा मनोदय महायुतीचा असण्याची दाट शक्यता वाटते.

ज्या मतदारांनी, किंवा उमेंदवारांनी आर्थिक खैरात स्वीकारली त्यांना ती पाच वर्षे पुरणार आहे काय ? केंद्रात जसा विरोधी पक्ष नव्हता आणि केंद्र सरकारने जो देशात हुकूमशाही मनमानी कारभार केला त्याची प्रचिती महाराष्ट्रात सुद्धा यंदा दिसू शकते हे नाकारता येत नाही. महाराष्ट्राची निवडणूक हि पारदर्शी झालेली नाही हे निकालावरून सिद्ध होते. यास सर्वस्व जवाबदार निवडणुक आयाेगाचे अध्यक्ष आहेत अश्या चर्चा राजकिय अभ्यासक असलेले अनुभवी पत्रकार सांगत आहेत.

बिन्नीचे धडाडीचे उमेदवार प्रशासनाला हाताशी धरून षडयंत्र करूनच पाडले अशी शंका येते. विरोधी पक्षातील निवडून आलेल्या उमेदवाराची चोहोबाजूनी कोंडी करून नामोहरम करण्याचे हे कारस्थान होऊ शकते. सुसंस्कृत, पुरोगामी, प्रतिष्टीत महाराष्ट्रात इतक्या अचंबित करणारी खालच्या दर्जाची निवडणूक या पुर्वी ईतिहासात कधीच झाली नव्हती. महायुतीचा जरि विजय झाला असला तरी ही शहर असाे कि ग्रामिण येथिल मतदारात मात्र कुठे ही आनंद उत्सव हा दिसुन येत नाही. कारण या पुर्वी असविधानिक पध्दतीने बसलेली सरकार यंदा ही त्याच प्रमाणे निवडुण आली अश्या चर्चा आता मतदारात हाेतांना दिसत आहेत.

ह्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते महायुती जिंकली पण शिवरायांचा,बाबासाहेबांचा महाराष्ट्र मात्र हरला. पुराेगामी महापुरूषांचा विचार हा केवळ नावा पुरतीच राहीला हेच आता म्हणावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page