Saturday, April 18, 2026
Google search engine

अवैद्य वाळुची वाहतुक करतांना पाच टॅक्टर,जप्त महसूल विभागाची दमदार कामगिरी.

अवैद्य वाळुची वाहतुक करतांना पाच टॅक्टर,जप्त महसूल विभागाची दमदार कामगिरी.

रुपेश देशमुख ब्रम्हपुरी

प्राप्त माहितीनुसार असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव, पिंपळगांव भोसले व कोल्हारी, बेलगाव हे वैनगंगा नदी किनारी असुन या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळु साठा असतो. आणि या नदी पात्रातुन वाळू उपसा, साठा, विक्री, वाहतुक करण्याकरीता जिल्हाधीकारी कार्यालयाकडून ई-टेंडरींग करून नियम, अटी, शर्ती लागु करून कंत्राटदारास लिलाव केल्या जातो. परंतु सध्यातरी ब्रम्हपुरी तालुक्यातील कोणत्याही नदी घाटाचा लिलाव झालेला नाही. परंतु अन्हेर-नवरगांव पिंपळगांव नदी घाटावरून अवैद्यरित्या वाळुची वाहतुक होत असल्याची गोपनिय माहिती महसुल विभागाला मिळाली.

यामुळे नवनियुक्त – उपविभागीय अधिकारी पर्वनी पाटील, तहसीलदार सतिश मासाळ यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे – मार्गदर्शनाखाली घेऊन तहसीलदार सतिश मासाळ यांचे नेतृत्वात नायब – तहसीलदार आशिष तालेवार,व तलाठी यांनी अहेरनवरगांव, पिंपळगांव ते बेलगाव,ब्रम्हपुरीकडे येणारे ५/१०/२०२४ ला वाळु वाहतूक करणारे पाच टॅक्टर,अडवून वाळूसह ताब्यात घेतला तसेच मागील पंधरा दिवसांमध्ये १४ ट्रॅक्टर व एक हायवा अडवून वाळुसह ताब्यात घेतला आहे.

जप्त केलेल्या ट्रॅक्टर व एक हायवावर दंडात्मक कारवाही केलेली असून रुपये ४,४८,०००/-महसूल शासन जमा होणार आहे. इतर वाहनावर दंडात्मक कारवाई सुरू असून रुपये ८,००,०००/- करून गुन्हा नोंद केल्याचे कळते. या कारवाहीने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page