Saturday, April 18, 2026
Google search engine

अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (विद्यापीठ अव्वल) मध्ये कु. कादंबरी रमेश कोवले गोंडवाना विद्यापीठात प्रथम आली.

अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (विद्यापीठ अव्वल) मध्ये कु. कादंबरी रमेश कोवले गोंडवाना विद्यापीठात प्रथम आली.

कल्याण सोदारी तालुका प्रतिनिधी घुग्घुस,

घुग्गुस :- कु.कादंबरी रमेश कोवले हिने गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठांतर्गत सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या तांत्रिक विज्ञान प्राविण्य परीक्षेत संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून बुधवारी त्यांना पदवी प्रदान केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . ती जिल्हा तालुका च़द्रपुर घुग्गुसच्या अमराई वार्ड ०२ मधील चांदशा वली दर्गाजवळ राहते. ती लहानपणापासून कु. कादंबरी कोवले शिक्षण क्षेत्रात अव्वल
आहे, १०वी आणि B.E CSE मध्ये देखील अव्वल आहे.
गोंडवाना विद्यापीठाचा १३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभ ०२ ऑक्टोबर रोजी झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर विद्यापीठाच्या कु.कादंबरी रमेश कोवले यांचा संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात मास्टर (एमई) प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल कुलगुरू पी.एस.बोकारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बोकारे यांनी पदवी प्रदान केली. कु.कादंबरी रमेश कोवले गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातून संग्णक शास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमई) करत होती. 2023 च्या उन्हाळ्यात झालेल्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी परीक्षेत त्याने विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरू, व्यवस्थापक यांच्या हस्ते त्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. कु.कादंबरी कोवले यशाबद्दल सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page