रुपेश देशमुख ब्रम्हपुरी
!! बरवे झालो देवा कुणबी झालो! नाहीतर दंभेची असतो मेलो ॥ जगतगुरु संत तुकाराम महाराज
कुणबी म्हणजे” कुण” आणि “बी” शेतात बी पेरणारा म्हणजे शेतकरी बलाज्य, लढवय्या दिशा देणारा, नेतृत्व करणारा इतर समाजाला घेऊन जाणारा, शिक्षित, संस्कारीत, पाटील, महाजन, मुनीम, मालगुजार असा संपन्न असलेला संपूर्ण महाराष्ट्रात व्यापलेला मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भात मोठया प्रमाणात असलेला 50 च्या वर पोटजातीने विभागलेला लोकसंख्येच्या 30 टक्के असलेला समाज आज दिशाहीन झाला आहे. राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात 40 टक्के असलेल्या समाजाला कोणतीच पार्टी प्रतिनिधित्व / नेतृत्व देऊ शकत नाही याचे कारण आपल्या समाजातील पक्षाला विकलेले कार्यकर्ते. शिक्षणात स्पर्धा वाढल्यामुळे SC, ST चे वर्चस्व मुळे नोकरीत संधी नाही, शिष्यवृत्ती नाही, शहरात राहण्यासाठी होस्टेल ची व्यवस्था नाही, त्यामुळे युवक दिशाहीन झाला आणी व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. जुने लोक प्रवाहासोबत बदलले नसल्यामुळे प्रगती होऊ शकली नाही. आपल्याच शेती आणी मोक्याच्या जागा घेऊन, सिंधी, मारवाडी, गुजराथी, मुसलमान मोठ्या प्रमाणात व्यवसायात उतरून आपल्या मुलांना नोकरीच्या माध्यमातुन गुलामी करावी लागते. महिला सक्षम झाल्या परंतू आपल्या छोट्या परीवारापलीकडे मोठा दृष्टीकोन नसल्यामुळे समाजाला दिशा देऊ शकले नाही. जे नौकरीवर लागले त्यांनी वडिलोपार्जित परिवाराकडे लक्ष दिले नाही त्यांनी फक्त स्वतःवर आणि परिवारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सामाजीक उन्नतीत उणीवा राहिल्या, सरकार वर्षाला शेतीमाल, सबसिडी आणि कृषी बजेट च्या माध्यमातून 4 लाख करोड़ रुपये खर्च करतो त्यांचा उपयोग काही विशिष्ट लोकांना होतो, त्यामुळे शेती व्यवसाय
तोट्यात आहे. आणी महत्वाचे कुणबी समाज नियोजन शून्य असल्यामुळे आर्थिक उन्नती होऊ शकली नाही. आता निवडणूक जवळ येत आहे आपल्याच समाजातील काही लोकांना पैसे आणि पद माध्यमातून समाजाला तोडण्याची सुपारी दिली जाईल आपल्यात भांडणे लावले जातील आपल्याच लोकांकडून वेगवेगळे प्रलोभान दिली जातील पण समाजाला एकसूत्र ठेवायची जबाबदारी आपली आहे. आता आपल्याला बदल करायचा आहे, तो सगळ्यांनी मिळून ठरविले तर नक्कीच शक्य आहे. बदल करायचा म्हणजे सगळ्यात अगोदर आपला हक्काचा माणूस विधासभेत, आमदार लोकसभेत खासदार, जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजार समिती मध्ये पाठवून आपले संपलेलं अस्तित्व पुन्हा निर्माण करायचे आहे, नाहीतर “एक था कुणबी समाज “अशी परिस्थिती निर्माण होईल.
कुणबी समाज ओबीसी मध्ये येतो राज्यात 350 पेक्षा जास्त जाती आणि देशात 3000 पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये आहेत आणि त्यांचे प्रतिनिधित्व कुणबी समाज करतो पण SC-ST प्रमाणे सामाजिक दृष्ट्या मागासले अशी तरतूद संविधानात नसल्यामुळे त्यांचा पाहिजे तसा फायदा ओबीसी समाजाला झाला नाही म्हणून वारंवार आंदोलन करावी लागतात, आणि पुन्हा राज्यात एक नवीन मागणी मराठा समजाकडून कुणबी दाखले द्या! इथे आमच्याच मुलांना धाड जेवण मिळत नाही आणि ते मराठा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात कुठे तरी याचा विरोध झाला पाहिजे त्या करिता आपला आमदार हवा आहे, महत्वाचे म्हणजे आपल्याच ब्रम्हपुरी क्षेत्रातील आमदार कडे 3 वर्ष ओबीसी मंत्रालयाची जबाबदारी होती काय बदल झाला याचे विसलेशन न केलेले बरे, कुणबी समाजाच्या वतीने आमची मागणी असेल संविधान बदल करून राज्यात 30-35 टक्के मागास असलेल्या कुणबी समाजाला संविधान बदल करून वेगळे आरक्षण मागण्याची गरज आहे.
ब्रम्हपुरी मुलांना व्यवसाय करायला गाळे उपलब्ध नाही, मिळाले तर 10-15 लाख पगडी द्यावी लागते जे बेरोजगारी आणि रोजगार ची भाषा करतात पण त्यांचे जवळ रोडमॅप आहे, ब्रम्हपुरी ला साधी MIDC उपलब्धता नाही, किंवा तसा प्रस्ताव सुद्धा पाठविला का? अशी शासंकता आहे, बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना गाळे उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा व्यवसाय समंधी माहिती घेऊन वाटप करायला पाहिजे, तर काही लोक गाळे घेऊन किरायाने देतायत. प्रत्येक तालुक्यात व्यवसायाकरिता MIDC, मुलासाठी शैक्षणिक होस्टेल ची व्यवस्था, शैक्षणिक स्पर्धा परीक्षा तयारी शिबिराचे आयोजन, व्यावसायिक मार्गदर्शन मेळावे, महिलासाठी गृहउद्योग, कौशल्य विकास, शेतीकरिता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, व्यावसायिक शेती कशी करायची, व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर असे वेगवेगळे उपक्रम समाजाच्या माध्यमातून घेतले तर समाज नक्कीच शिखरावर पोहचल्या शिवाय राहणार नाही. कुणबी समाज हा दऱ्या उचलणारा नाही तर पुन्हा नेतृत्व करणारा समाज निर्माण झाला पाहिजे तरच पुन्हा सक्षम समाज तयार होईल.
” कुणबी खडा तो सबको हिला डाला ” जय कुणबी !! जय तुकोबा!! जय शविराय !! जय जिजाऊ !!
श्री. अनिरुद्ध ढोरे
अध्यक्ष तालुकास्तरीय कुणबी समाज संघटना अमीर
मैयोजक महाराष्ट्र राज्य कृती समिती, महाराष्ट्र



