Friday, April 17, 2026
Google search engine

सोशल मीडियावर वाढली अश्लीलता



मुले बिघडली,
तसेच मुले आणि कुटुंबातील पालकांचा संवाद झाला कमी.

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यांसारखी समाजमाध्यमे सध्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहेत. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले, मुली बिघडत जात आहेत.

अभ्यासाच्या नावाखाली मुले अधिकाधिक वेळ मोबाइलवर रील आणि शॉर्ट्स पाहत आहेत. याचा सर्वांत घातक परिणाम म्हणजे मुलांचा त्यांच्या कुटुंबाशी असलेला संवाद सतत कमी होत चालला असल्याचे समोर आले आहे.

मुलांच्या मनात गुन्हेगारी विचार सतत वाढत आहेत. आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण असायला हवे असे ९३% टक्केपेक्षा अधिक लोकांनी म्हटले आहे.

या सर्व मुद्द्यांवर एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. यामध्ये सहभागी ९७% टक्केपेक्षा अधिक लोकांनी सोशल मीडिया हे अश्लीलतेला प्रोत्साहन देत असल्याचे मान्य केले. याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे.

९३% टक्के जणांनी नको बघायला हवी ती पोस्ट पाहिली.

सर्वेक्षणात सहभागी १३% टक्के लोकांनी मान्य केले की समाजमाध्यमांवर त्यांनी कोणती ना कोणती आक्षेपार्ह पोस्ट पाहिली आहे. रील बनविण्याच्या स्पर्धेलाही ९४% टक्के जणांनी चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया सामाजिक विकृती पसरवतोय? याला ही नाकारता येत नाही. सध्याचा परिस्थितीचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की, प्रत्येक घरी असलेला इडियट ( टिव्ही ) बॉक्स हा निरंतर विकृती पसवरताेय.

सिने जगात ही दिवसेन दिवस अश्लीलतेचा प्रचार प्रसार माेठ्या प्रमाणात हाेतांना दिसुन येताे. टिव्ही मालिकांनी तर नाते संबधाची तर चक्क वाटच लावुन ठेवली. सह कुटुंबासहित टिव्ही मालिकी बघने ही आता शक्य राहीले नाही.

पडद्यावर तर सिने नटीच्या अंगावरचे कपडे नसल्या सारखेच असतात. असे चित्रपट थेटरला जाऊन सह कुटुंब बघुच शकत नाही. तसेच दिवसन दिवस अश्लीलतेचा प्रचार प्रसार साेशल मिडिया, प्रिंट मिडीया टिव्ही जाहिरातीतुन प्रचंड प्रमाणे हाेत असते.

माेबाईल क्रांतीमुळे आजची मुल किती ही अडव्हांस झाली असली तरी सुध्दा भारतीय संस्कृती मात्र आपल्याच जपता आली नाही. पच्छिमी देशातल्या वाढत्या संस्कृती प्रमाणेच आता जगण्याचा निर्धार भारतियांनी केलाला दिसुन येताे. मात्र या उलट इतर देशानीच आपल्या भारत देशाचा संस्कृतीतील अनेक महत्वाच्या गाेष्टी आत्मसात केल्या.

आज प्रत्येक पुरूष, स्त्री, मुल, मुली साेशल मिडीयावर एक्टिव्ह असतात. त्या पासुन दुर राहु शकत नाही. सरवर डावुन असल की अनेक कामे लगेच थांबुन जातात. इंटरनेट मुळे सर्व देश एकमेकाशी जाेळल्या गेलेत आहेत. त्याच प्रमाणे साेशल मिडियाच्या क्रांतीने जगात अनेक लाेक एकमेकाशी जुळल्या गेले आहेत.
हे जरी खर असल तरि सुध्दा आपल्या देशात साेशल मिडीयाच्या वाढत्या प्रचार, प्रसारामुळेच अश्लीलता ही माेठ्या प्रमाणा वाढली याला ही नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page