Friday, April 17, 2026
Google search engine

वराेरा नाका येथिल वाहतुक सिग्नल सुरू हाेने अत्यंत गजेचे

चंद्रपुर

चंद्रपुर शहराच्या लाेकसंख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयात सुध्दा चार चाकी दुचाकी तसेच जड वाहणांची राेज माेठ्या प्रमाणात नाेंदी हाेत आहेत.

औद्यगिक शहर म्हणुन संपुर्ण राज्यात या शहराची एक वेगळी ओडख आहे. त्यामुळे ईतर राज्यातुन येणारा कामगार वर्ग चंद्रपुर शहरात येत असताे.

म्हणुन वाहणाची संख्या देखिल दिवसेन दिवस वाढत जात असुन एका घरी किमान दाेन तीन ते दुचाकी व एक चारचाकी वाहण असतेच असते. परंतु शहराचे रस्ते मात्र जैसै थै तसेच असल्या कारणाने वाहतुकीस नेहमिच अडचन हाेत आहे.

अनेक चाैकात वाहतुक सिग्नलची नितांत गरज असुन त्या त्या चाैकात वाहतुक पाेलिस कर्मचारी सुध्दा असायला हवा. वाहतुक सिग्नल करिता बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, चंद्रपुर मनपा, तसेच वाहतुक पाेलिस प्रशासनाचे जानिव पुर्वक दुर्लक्ष हाेत असते. या पुर्वी जुण्या ठीकानी असलेले काही सिग्नल मात्र बंद दिसुन येतात.

परंतु आवशक असलेल्या वराेरा नाका चाैकात वाहतुक सिग्नल सुरू व्हायला हवे हाेते. या चाैकात चंद्रपुर शहराकडे जाणारा रस्ता, रामनगर कडुन शहराकडे जाणारा रस्ता, तुकुम ताडाेबा राेड व बंगाली कँम्प बायपास राेड कडे जाणारा उडान पुल मार्ग, तसेच शहरातुन नागपुरकडे जाणारा मार्ग असा हा वराेरा नाका चाैरस्ता असुन या चाैकात अनेक अपघातात झाले असुन अनेकांनी आपले प्राण गमावले आहे.

अपघात झाले तरि ही प्रशासन माैनी बाबाचीच भुमिकाच घेतांना दिसते.

वराेरा नाका येथे वाहतुक सिग्नल देण्याची मागणी फार जुनी आहे. हि मागणी सामाजिक संघटना तसेच चंद्रपुर येथिल नागरिकांनी केली हाेती. तेथिल वाहतुक सिग्नल अजुन पर्यंत सुरू झाले नाही. मात्र जेथे गरज नसतांना तीथे मात्र म्हणजे ND हॉटेल चाैकात वाहतुक सिग्नल सुरू करण्यात आले.

वराेरा नाका येथे सिग्नल उभे करून तर ठेवले पण सुरू केव्हा हाेईल या प्रतिक्षेत चंद्रपुरकर आहेत.

वाहतुक निरिक्षक प्रविण पाटील यांनी जेव्हा पासुन वाहतुक निरिकक्षकाचा पदभार घेतला तेव्हा पासुन चंद्रपुरातील वाहतुकीची डाेके दुखी बरीच नियंत्रनात आहे असे म्हनता येईल. त्यांनी स्वताहुन लक्ष देवुन अनेक विभागाशी पाठ पुरावा करित वराेरा नाका चाैकात सिग्नलची व्यवस्था केली. मात्र ते सिग्नल अजुन ही सुरू करण्यात आले नाही.

या संदर्भात पाटील यांच्या कडुन वराेरा नाका वाहतुक सिग्नल बद्दल माहीती घेतल्यास सिग्नलची टेस्टींग सुरू असल्याचे कारण सागण्यात आले. दुसरे कारण वाहतुक पाेलिस कर्मचा-यांचे संख्याबळ नसल्याने वाहतुक पाेलिस तेथे उपल्बध्द करता येत नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली. तरि ही या सात दिवसचा आत हे सिग्नल सुरू करून तीथे वाहतुक पाेलिस दिसतील असा शब्द त्यांनी बाेलतांना दिला.

राेज अपघात हाेण्याची दाट शक्यता असणारा हाे चाैक असुन लवकरात लवकर वाहतुक सिग्नल झाल्यास समाेर येणारे अपघात टाळता येतील? म्हणुन विलंब न करता वराेरा नाका येथिल वाहतुक सिग्नल सुरू हाेने अत्यंत गजेचे आहे. अशी मागणी सतत चंद्रपुरकर करित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page