Friday, April 17, 2026
Google search engine

मल्टिस्पेशलिटी खाजगी रुग्णालयांत दरफलक, रुग्णहक्क सनद लावने अनिवार्य.

निलेश ठाकरे

चंद्रपुर शहरात अनेक मल्टीस्पेशलिटी खाजगी रूग्णालय आहेत. त्यात दिवसेन दिवस वाढ हाेतांना दिसते. मात्र याच खाजगी रूग्णालयात अनेक रूग्णांंना उत्तम आराेग्य सेवा मिळावी म्हनुन शहरातल्या खाजगी रग्णालयात रूग्णांना भरती केल्या जाते.

मात्र अश्या खाजगी रूग्णालयाच्या बर्याच तक्रारी समाेर येत आहेत. त्यात महत्वाची तक्रार म्हनजे दरफलक, रुग्णहक्क सनद फलका साेबत न लावने हे हाेय. चंद्रपुर शहरातच नव्हे तर ईतर जिल्ह्यातिल बहुतांश खाजगी रुग्णालयांत उपचाराचे दर न लावल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची सर्रास पणे आर्थिक लूट होत आहे.

यामध्ये वाढीव बिल लावणे, जादा दर आकारणे असे प्रकार सर्रास पणे होत आहेत. यावर केंद्र सरकारच्या परिपत्रक प्रमाणे प्रशासनाने तात्काळ सर्व खाजगी रुग्णालयच्या आवारात दर्शनिय स्थळी रूग्णांनाच्या नातेवाईकांना दिसेल अश्या ठीकानी मनपाच्या वतीने दरपत्रक व रूग्णहक्क सनद लावण्यास नाेटीस बजावण्यात आले.
मात्र नियमा प्रमाणे दरपत्रक लावल्यास. रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयातील विविध दरांची माहिती मिळेल आणि त्यानुसार ते रूग्णाला डिसचार्ज करतांना दरपत्रक प्रमाणे बिल अदा करतील. वरील नियम न पाळणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे परवाने चंद्रपुर मनपाने तात्काळ रद्द करावे असे त्या नियमावलीत स्पष्टपणे नमुद आहे.

शहरातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राइट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. हे रूग्णालयाच्या ओनर असलेल्या डॉक्टरांनी विसरू नये.

शासनाच्या कायद्याकडे दुर्लक्ष करणाच्या रुग्णालयावर मनपाच्या वतीने तात्काळ कारवाई करावी आणि सर्व खाजगी रुग्णालयांना आवारात दर पत्रक लावण्याची सक्ती करावी.

परंतु शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रूग्ण हक्क सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही. खाजगी रुग्णालयांत आता रुग्णहक्क कायद्यानुसार उपचार व रुग्णसेवांचे दर याची माहिती मिळाली पाहिजे. ही माहिती रुग्णांना व त्यांचा परीवारांना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने आदेश काढलेला आहे. परंतु त्याची अमलबजावनी होत नाही. रुग्णहक्कच्या सनदमध्ये रुग्णाला प्राप्त झालेले अधिकारामध्ये आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क आदींचा समावेश या यादीत आहे.

या करिता मनपा प्रशासनानेच नव्हे तर जिल्ह्यातिल नागरिकांनी ही जागृत राहने गरजेचे आहे.

टिप :- शासन प्ररशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page