एकीकडे संपुर्ण जगात जागतिक महिला दिन म्हनुन महिलांनाचा सन्मान, सत्कार केला जाताे. प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेत पुरूष वर्गा पुढे जाऊन महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. क्षेत्र कुठलेही का असेना महिलांना आता कमी लेखता येणार नाही. याच महिला आपल्या कुटुंबाची जवाबदारी पार पाडत शासकिय सेवा देतांना दिसुन येतात. परंतु शासकिय सेवा देणार्या महिला भ्रष्ट्राचार करण्यात आता पुरूषाच्या मागे नाही तर समाेर जात आहेत. हेच एक क्षेत्र उरलेल हाेत की काय ज्याचा पुढे शासकिय सेवा देणार्या महिला मागे पडल्याया असाव्या म्हनुन अधिकारी, कर्मचारी पदावर असतांना ही जाेंदरा ( पैसा ) घेतल्या शिवाय आणि भेटल्या शिवाय शासकिय सेवा देणार्या महिलांना करमेना. प्रत्येक शासकिय कार्यालयात माेठ्या महत्वाचा पदावर महिला अधिकारी, कर्मचारी विराजमान दिसुन येतिल. याच महिला आता पुरूषांचा पाठाेपाठ फुक्कट मिळणारी मलाई खाण्यात मुस्तेद झालेल्या आढळुन येतिल. असे काेनतेही शासकिय कार्यालय शाेधुन मिळणार नाही ज्यात गाव खेड्यातुन, शहरातुन कार्यालईन कामाकरिता आलेल्या नागरिकांनकडुन फाईल पुढे सरकवण्यास अल्प कालावधीतच काम करून घेण्यास शासकिय सेवा देणार्या महिला जाेंदरा घेत नसतिल. सध्याचे चित्र भयानकच आहे म्हनावे लागेल. म्हनुन भ्रष्ट्राचारी पुरूषांच्या एक पाऊल पुढे जात लाच घेणार्या महिलांची संख्या दिवसेन दिवस वाढतच जात आहे. प्रत्येक महिला तसीच असेल असे नाही. काही महिला आपले कर्तव्य प्रामाणिक पार पाडत असतात.

परंतु सध्याचा शासकिय सेवेत असणार्या महिला अधिकारी, कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास कसली ही भीती न बागळता भ्रष्ट्राचार करण्यात अश्या महिला अग्रसेन आहेत हे नाकारता येणार नाही. सातव्या वेतन आयोगाने पगारात भरमसाठ वाढ सुध्दा झाली. त्या रेशोत आणि वरखातही वाढली पाहिजे. हे गणित यंत्रणेने मांडले. बहुतेक प्रशासकीय यंत्रणा या एकाच मोहिमेवर झपाटून कामास लागली आहे. वर पासून खालपर्यंत. विशेष म्हणजे महिला अधिकारी भ्रष्ट्राचार करणार नाहीत हा समजही आता खोटा ठरला आहे. अनेक महिला अधिकारी लाच घेतांना लाचलुचपत विभागा मार्फत पकडल्या गेल्या आहेत. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ही मोहिम राबविण्यात आम्ही सुध्दा मुळीच मागे नाहित, ही बाब बऱ्याच महिला अधिकाऱ्यांनी सिध्द करून दाखवली आहे. अश्या जाेंदरा घेणार्या महिलांची त्यांचा कुटुंबाप्रती विचार करित त्रस्त झालेले नागरिक तक्रार करित नाही.

याचाच गैर फायदा घेत या महिला आपल्या पदाचा गैर वापर करून मिळेत तेवढा गल्ला जमवण्यातच स्वताला ध्यन्य मानतात. कारण अश्या महिलांना वरिष्ठ अधिकारी यांचा पाठबळ लाभला असताे. लाच मागणारे पुरूष असाे की महिला अश्यांवर दया माया न दाखवता नागरिकांनी तक्रार करायला पुढे यायला पाहीजे तरच कुठे प्रशासकिय सेवेतल्या भ्रष्ट्राचारावर आढा बसेल.



