चंद्रपूर – संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यात असताना महापालिका प्रशासन गेली अनेक वर्षे कुंभकर्णी झोपेतच राहिले हे कुनाला ही सांगण्याची गरज नाही. अतिक्रमाणाच्या अनेक तक्रारी असुन सुध्दा गेली कित्येक वर्ष चंद्रपुर मनपा या बाबीकडे स्वताहुन दुर्लक्ष करित हाेती. शहरवासीयांचा रोष पाहून मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी तातडीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली.

महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई निरंतर सहसा लहान व्यापारी आणि लहान व्यावसायिकांवरच कारवाही करण्यास लक्ष केंद्रित करायची आणि मग वर्षभरासाठी काेनत्या बिळात जाऊन लपायची हे त्यांनाच ठावुक असेल. या वेळीही अतिक्रमाण काढण्याचा सुरुवातीला असाच प्रकार घडला. सत्तेत असलेल्यांच्या बाजूने अतिक्रमणधारकांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उदारपणे संरक्षण दिले. ईतरांचे अतिक्रमाण काढण्यात तत्परता दाखवली. मात्र, काही जागरूक समाजकार्य करणारे गृहस्थांनी याला विरोध केल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथक सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. मात्र 14 मे रोजी नागपूर रोडवरील ‘क्रोमा’ व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमण हटवताना महापालिकेचे अधिकारी ची पक्षपाती भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे नागरिक व छोट्या दुकानदारांमध्ये मनपाच्या अश्या भुमिके बद्दल असंतोष वाढत आहे. या अचानक अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित करावी लागली. ही बाब मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. क्रोमा इमारतीसमोरील काम बंद पडल्याने रस्त्यावरील पायऱ्या हटविण्याचे काम बंद पडले. या पायऱ्यांच्या धर्तीवर पुढे जात भगवान ऑटोमोबाईल्स व इतर दुकानदारांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विरोधी पथकाच्या या पक्षपाती वृत्तीमुळे इतर दुकानदार व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशीच बाब 15 में ला सुध्दा घडली. गिरणार चाैका पासुन अतिक्रमाण काढण्यास सुरवात झाली. तिथे सुध्दा मनपाच्या वतीने कारवाही करतांना पक्षपात उघडपणे दिसुन येत हाेता. कारवाही करतांना राेडच्या फुटफाथवर आलेल्या दुकान व्यवसाईकांच्या पायर्या तसेस फुटफाथ समाेरिल शेडला जेसीबी मशिनने उधवस्त करण्यात आले. सराफा व्यापारी यांचे अनेक शेड फुटफाथ च्या बाहेर असुन कुनाचे काढले तर कुनाला काढण्यास वेळ देण्यात आल्याने या ही कारवाही करतांना सह्यायक आयुक्त श्री.बाेबाटे तसेच श्री.भारती यांचावर दुकान व्यवसाईकांनी राेष व्यक्त केला. सराफा अध्यक्षांनी बाेतलतांना सांगीतले की आम्हाला कुठलाही नाेटीस न देता ही कारवाही करण्यात आली आहे. जर का आधिच आम्हाला केलेल्या अतिक्रमाणाची लाईन आखुन दिल्यास आम्ही स्वताहुन आमचे अतिक्रमाण काढले असते.

परंतु स्वताहुन अतिक्रमाण धारक अतिक्रमाण वाढवतात. कुनी ही स्वताहुन केलेले अतिक्रमाण काढतनाही हे ही तेवढेच खरे आहे. परंतु प्रशासन कारवाही करण्यास सज्ज हाेते तेव्हाच अतिक्रमाण धारकांना जाग येत असते. ही कारवाही करांना एका सराफा व्यापारी दाेन तास अतिक्रमाण धारकांना साेबत अतिक्रमाण न ताेडण्यास मज्जाव केला. त्यात काही स्थानिक राजकिय नेत्यांना ही मनपा अधिकारी यांना वेठीस धरले. शहरातिल माेठ्या अतिक्रमाण काढण्याची माेठी माेहीम राबवत असतांना. अतिक्रमाण आयुक्त, अतिक्रमाण प्रमुख गराडे तसेच अतिक्रमाण अधिकारी पंचबुध्दे हे अनुउपस्थित दिसले. तसेच मनपाच्या वतीने पाेलिस बंदाेबस्त सुध्दा बराेबर दिसुन येत नव्हता. मनपाने ही कारवाही अचानक पणे माेहीम चालवत का बर सुरू केली या वर प्रश्न चिन्ह निर्माण हाेत आहे. आधी मनपाने शहरातिल सर्व मुख्य रसत्यावरिल अतिक्रमाण धारकांना एक सर्वे करून लाईन आखुन दिल्यास व अतिक्रमाण धारकांना दहा दिवसाचा कालावधी देवुन स्वयंम पुर्तीने अतिक्रमाण काढण्याकरिता सांगीतल्यास अतिक्रमाण धारक काढतिल ही न काढल्यास दहा दिवसा नंतरचा कालावधी संपल्यास मनपा प्रशासनांनी विलंब न करता तात्काळ कारवाहीची माेहिम राबवल्यास मनपा प्रशासनावर आराेप प्रत्याराेप हाेणार नाही याची दक्षता आयुक्तांनीच घ्यायला हवी. परंतु आयुक्त पालिवाल महाेदय मनात आले तसे करण्यास सक्षम दिसुन येतात. कुठली ही कारवाहीची माेहिम राबवतांना जनलामाण्याचा विचार प्रशासनानी करायला हवा असे चंद्रपुरकांन कडुन बाेलल्या जात आहे.



