Friday, April 17, 2026
Google search engine

भ्रष्ट्राचार करायचा हाय, पण ही दाेस्ती तुटायची नाय

घुग्घुस -चंद्रपुर जिल्हा हा Black Gold City साठी ओडखला जाताे. या जिल्ह्यात अनेक काेळसा खदानी असुन त्यात माेठ्या प्रमाणात गैरप्रकार, भ्रष्ट्राचार हाेत असतात. या पुर्वी सुध्दा काेळसा चाेरी प्रकरणाचे अनेक भ्रष्ट्राचार वणी क्षेत्राचे समाेर आले आहेत. मात्र आता वेकाेली वणी क्षेत्र येथिल मुख्य प्रबंधक व एक माेठ्या कंत्राटदाराची ( टेंडर मिळवण्या करिता ) मैत्रीच्या चर्चा सर्वत्र वेकाेली वणी क्षेत्रात हाेतांना दिसते. सिव्हिल व ट्रॉसपाेर्टर तथा ठेकेदार यांनाचावर मुख्य प्रबंधकाची चांगलिच कृपा दिसुन येते.

म्हनुन अनेक टेंडर याच कंत्राटदारालाच आपल्या मैत्रीपुर्ण संबधामुळे मिळवत असताे. या दाेन्ही मित्राची पडद्याआड भागेदारी, हिस्सेदारी ही असल्याचे बाेलले जाते. म्हनुन अर्धवट काम करून ही वेकाेली मार्फत पुर्णपणे माेबदला सुध्दा मिळवण्यात हा कंत्राटदार निपुन आहे. मागील वर्षी वर्धा नदी येथिल मुंगोली घाटावर राफ्टर टाकण्याचे काम मिळवले व ते काम मुख्य प्रबंधकाच्या कृपेने मिळवुन काम केले सुध्दा. काम हाेताच काही दिवसातच हे राफ्टर पुर्ण पणे नदीच्या प्रवाहात वाहुन गेले.

यात थातुर मातुर काम करून माेठा गैरप्रकार, भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय निर्माण करण्यात येत असुन आराेप प्रत्याराेप ही झालेत. परंतु याची कुठली ही चाैकशी अजुन पर्यंत तरि झालेली दिसुन येत नाही.

यात दाेन्ही मित्रांनी चांगलाच गल्ला जमवला दिसुन येत असल्याची जाेरदार चर्चा हाेत आहे. हेच नव्हे तर घुग्घुस वणी राेडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे मागीलवर्षी अनेक वर्षांपासून बिल्डिंग तसेच इतर छोटे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असुन या स्टेडियमची पाहणी केली असता हे स्टेडीयम कुठल्याच खेडाळु करिता कामाचे नाही असे परिसरातल्या नागरिकांचे म्हनने आहे.

केवळ मात्र कागदावरच काम दाखवुन या स्टेडीयमच्या नावाने माेठी रक्कमेची उचलना केल्या गेली असल्याची धक्कादायक बाब समाेर येत आहे. या दाेन्ही कामाची रक्कम दाेन्ही मित्र मुग गिळुन गप्प आहेत. या पुर्वी वेकाेली वणी क्षेत्राच्या मुख्य प्रबंधकाने कंत्राट पध्दतीने वेकाेलित काम करण्यास घेणार्यांन कडुन चांगलाच जाेंदरा मिळवला हाेता. त्यात अनेकांन कडुन मनमानी रक्कम देवुनच कामावर घेतल्याची विशेष महिती मिळते आहे. ऐवढेच नव्हे तर कंत्राटदारावर मैत्रीची मुख्य प्रबंधकाची विशेष कृपा असल्याने वर्धा नदी जवळ वेकोलीच्या जागेवर २० ते २२ वर्षांपासून घुग्घुसच्या खुली खदान जागेवर सिव्हिल व ट्रॉसपाेर्टर तथा ठेकेदारचे

गॅरेज असुन त्या ठिकाणी रात्री आपल्याच पेलोडरने जेसीबी (माती) चोरी कररू वेकोलीच्या जागेवर अतिक्रमण करून आहे. त्याच साेबत पाणी आणि विद्युत चोरी असे हे निरंतर अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कंत्राटदाराला वेकोली अधिकारी यांनी परमीशन (अनुमती) दिली कशी? किंवा काेनत्या नियमात दिलेली आहे.

या सर्व गोष्टी व्हिजलेंसन (नागपूर ) अधिकारी यांच्या मार्फत चोैकशी करने अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी हाेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page