Friday, April 17, 2026
Google search engine

अखेर बलात्काराच्या गंभीर आरोपीला मिळाला जामीन !

चंद्रपूर:पत्नीला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे सांगून आरोपीने शेजारील महिलेला आपल्या घरी बोलावून तिला थेट ताडोबा येथील वर्ल्ड लाईफ रिसॉर्ड वर नेऊन कॉफी मधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.ती शुद्धीवर आल्यावर आरोपीच्या अन्य दोन साथीदारांनी कुणाला काही सांगितलेस जीवाने जाशील अशी धमकी दिल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या कथित घटनेची रामनगर पोलिसांनी दखल घेत बलात्कार,जीवे मारण्याची धमकी अशा विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली होती.यातील प्रमुख आरोपी मुख्तार शाह यांच्या नातेवाईकांनी एड.राजेश सिंग यांची भेट घेऊन आरोपीने बलात्कारा सारखा गंभीर गुन्हा केलाच नाही,त्याला षढयंत्र रचून फसविले गेल्याची बाब त्यांना सांगितली.आणी त्याचा जमीन करून देण्याची विनंती केली.

दरम्यान एड.राजेश सिंग यांनी कायद्याच्या बाजूने आवश्यक त्या सर्व पैलूंचा कसोशीने अभ्यास केला.त्यात त्यांना कथित पीडित मुलगी घटनेच्या दिवशीच म्हजेच दिनांक 18 फेब्रुवरि 2025 रोजी आरोपीच्या वॉट्सअप वर चॅटिंग करत असल्याचे आढळून आली.त्यातच आरोपीसोबत पीडितेचे घरापासून रिसॉर्ड पर्यंत जाणे,कॉफी पिणे,घटने नंतर उशिरा पोलीस स्टेशन मद्ये तक्रार करणे या सर्व बाजू खटकू लागल्यात.एड.सिंग यांनी न्यायालया समोर या बाजू मांडून आरोपीला जमीन देण्याची विनंती केली.अलीकडेच न्यायालयाने या घटनेतील प्रमुख आरोपी मुखतार शाह याला अटी आणी शार्थिवर जामीन दिला आहे.

आरोपीवर लागलेले आरोप खरे की खोटे हे लवकरच न्यायालयात सिद्ध होईलच पण आरोपीचे वकील एड.राजेश सिंग यांनी या केसमधील बारकावे तपासून आरोपीला जामीन मिळवून दिल्याने वकील मंडळीत ही केस चर्चेचा विषय बनली आहे.आणी या केस मधील विशेष महत्वाची बाब म्हणजे पीडिता आणी आरोपी हे मुस्लिम समाजाचे आहेत.एकंदरीत या केसमद्ये आरोपीला जामीन मिळणे अशक्य आहे म्हणून हात वर करणारे वरिष्ठ वकीलही एड.राजेश यांच्या तार्किक युक्तीवादाने भारावून जावून त्यांना अभिनंदन केले आहे.एड.राजेश सिंग यांनी स्थानिक न्यायाल्यापासून तर उच्च न्यायालया पर्यंत अनेक केस लढल्या आणी जिंकल्या असून त्यांना समाजिक,शैक्षणिक,आणी क्रीडा क्षेत्रात काम करणे विशेष रुपाने आवडते.ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भाचे कायदेशीर सल्लागारही आहेत.

एड.राजेश सिंग यांनी न्यायालयासमोर मांडली सत्यता…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page