Saturday, April 18, 2026
Google search engine

मौजा घुग्घुस सर्वे क्रमांक २७५मधील सार्वजनिक भूखंडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी

मौजा घुग्घुस सर्वे क्रमांक २७५मधील सार्वजनिक भूखंडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी

कल्याण सोदारी तालुका प्रतिनिधी घुग्घुस

घुग्घुस , १३ फेब्रुवारी २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस परिसरातील सर्वे क्रमांक २७५ मधील १०.८००चौरस फूट सार्वजनिक ओपन प्लेस प्लॉटवर अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ब्रिथ ऑफ लाइफ मल्टीपरपज सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष प्रणयकुमार बंडी यांनी या संदर्भात घुग्घुस नगरपरिषदेच्या प्रशासक/मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून, हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवून सार्वजनिक भूखंड नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

नियमांच्या विरोधात नोटरीद्वारे विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वे क्रमांक २७५मधील ६,३०० चौरस फूट आणि ४५००चौरस फूट असे दोन सार्वजनिक ओपन प्लेस प्लॉट आरक्षित होते. मात्र, या भूखंडांपैकी ६,३०० चौरस फूट क्षेत्र जमिनमालकाने सहा लोकांना नोटरीद्वारे विकल्याचा आरोप आहे. ही विक्री पूर्णतः बेकायदेशीर आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे शासनासोबतच परिसरातील प्लॉटधारकांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे ही अवैध विक्री तत्काळ रद्द करून संबंधितांवर कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नगरपरिषदेकडून सार्वजनिक भूमी ताब्यात घेऊन विकासकामे करण्याची मागणी

नगरपरिषद व शासनाने या वादग्रस्त भूमीवर त्वरित ताबा मिळवून सार्वजनिक हितासाठी विकासकामे करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

सर्वे क्रमांक २७४ चा भूगोल:

२२खासगी प्लॉट – एकूण ७२४६०चौरस फूट क्षेत्रफळ

रस्त्यासाठी – २२७६० चौरस फूट क्षेत्र

सार्वजनिक ओपन प्लेस –१०,८००चौरस फूट (४५००+६३००चौरस फूट)

वादग्रस्त भूखंडाचा परिसर:

अमराई रोड, बहादे प्लॉट, हनुमान मंदिर चौकाजवळ, घुग्घुस.

प्रशासन कोणती पावले उचलणार?

आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, प्रशासन या अनधिकृत बांधकामाविरोधात कोणती कारवाई करते आणि कधीपर्यंत हा सार्वजनिक भूखंड नगरपरिषद ताब्यात घेते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page