
अंतर्गत हातमिळवणीमुळे प्रकार घडत असल्याची चर्चा
रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या विनामूल्य होत असताना खासगी लॅबची माणसं इथे रक्त, लघवीचे नमुने न्यायला येतातच कशी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चंद्रपुर येथिल सामान्य रूग्णालयात असला प्रकार निरंतर सुरू असल्याची पुन्हा या विषयाला वाचा फुटली आहे.
सामान्य रूग्णालयातिल डॉक्टरांच्या अंतर्गत हातमिळवणीमुळेच हे चंद्रपुरच्या सामाण्य रूग्णालयात घडत असल्याची चर्चा सध्या रूग्णालयाच्या नातेवाईकांकडुन समाेर आली आहे. यावर चंद्रपुर शासकिय महाविद्यालयाचे डिन यावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.
नाव न सांगण्याच्या अटीवर रूग्णालयाचे नातेवाईक त्यांच्या रुग्णाला घेऊन तपासनी विभागात गेले असता त्या ठिकाणी खासगी लॅबचा दलाल दिसले व ते लघवीचे नमुने नेण्यासाठी आल्याचे त्यांना दिसले. हे रूग्णालया समाेर असलेले खाजगी पँथेलॉजी लॅब येथिल प्रतीनीधी हाेते हे निच्छित.

शासकीय रुग्णालयात खासगी लॅबचे प्रतिनिधी येतात याबाबत ही पुर्वी पासुनच तक्रार आहे. परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही, त्यामुळे अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करून खासगी लॅबमध्ये चाचण्या होऊ नयेत यासाठीची नेमकी उपाययोजना डिन यांनी करायला हवा.
संध्याकाळी पुन्हा शासकीय रुग्णालयात हाच प्रतिनिधी दिसल्यानंतर शासकिय रुग्णालयात बाहेरील खासगी लॅब प्रतिनिधी व काही डॉक्टर हे संगनमत करून रुग्णांचे आर्थिक शोषण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
सामान्य लोकांपर्यंत सरकारी सुविधा पोहोचू नयेत, असे वातावरण तयार करण्यासाठी अशा अनैतिक कृत्यांना येथिल डॉक्टर व खाजगी पँथेलॉजीस्ट डॉक्टर यांच्या वतीने पाठिंबा दिला जातो का, असा प्रश्न उदभवताे बाहेरील लॅबमध्ये पाठवलेल्यांपैकी रक्कम डॉक्टर कमिशन म्हणून घेत असल्याच्या सुध्दा चर्चा आहेत. त्यामुळे डिन यांनी रुग्णांलयात खासगी लॅबचे अहवाल आहेतका ? याची यादी करून संबंधित डॉक्टरांवर याेग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता रूग्णांचा नातेवाईकांकडुन करण्यात येत आहे.
नाही तर निरंतर अशीच रूग्णालयाच्या नातेवाईकांची आर्थिक लुट हाेत राहील.



