Saturday, April 18, 2026
Google search engine

लाेक कला जागृती मंच आयाेजित “गांधी कभी मरते नही” हिंदी नाटकाचा चंद्रपुर येथे यशश्वी प्रयाेग.

लाेक कला जागृती मंच आयाेजित “गांधी कभी मरते नही” हिंदी नाटकाचा यशश्वी प्रयाेग.

दिंनाक 27/10/24 राेजी सायंकाळी 7:00 वाजता इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृहात महाराष्ट्रातिल कलाेकप्रिय नाट्य कलावंत, गायक ,लेखक, दिग्दर्शक तथा प्रबाेधनकार अनिरूध्द वनकर यांनी दिग्दर्शित केलेले “गांधी कभी मरते नही” या नाटकाचा पांचवा प्रयाेग नुकताच इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृह चंद्रपुर येथे यशश्वी रित्या पार पडला.

अनिरूध्द वनकर हे एक उत्तम गायकच नसुन ते एक मुरलेले नाट्य कलावंत सुध्दा आहेत. त्यांनी अनेक नाटकात अभिनय केला असुन संपूर्ण महाराष्ट्रात ते आपल्या प्रबाेधनात्मक गायकीच्या माध्यमातुन, देशात सुध्दा त्यांनी आपला एक वेगळी ओडख निर्माण केली आहे.

“गांधी कभी मरते नही” हे नाटक बघतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्यातिल माहीत नसणा-या अनेक बाबी नाट्य रसिकांन समाेर आनण्यात अनिरूध्द वनकर यांनी केलेले प्रयत्न साफ दिसुन येत हाेते.वॉटसप्प च्या माध्यमातुन इतिहासाची चुकीची माहिती सामान्य नागरीकांन पर्यंत कशी काय पाेहचवली जाते आहे. याचा संदेश या नाटकाचा माध्यमातुन या वेळेस देण्यात आला.

या नाटकात काम करणा-या प्रत्येक कलावंतानी अभ्यास पुर्वक आपल्या अभिनयानी या नाटकात प्राण टाकले. गांधी यांची भुमिका करणारा कलावंतात प्रत्यक्षा गांधी समाेर उभे आहेत की काय? असेच वाटत हाेते.

नाटकाची प्रकाश याेजना तर सुरेश हाेती परंतु नाटका संगीतबध्द केलेल्या गाण्यांनी सभागृहात असणारे सर्व नाट्य रसिक आनंदित झाले हाेते. नाटक सुरू हाेण्यापुर्वीच नाटक बघायला नाट्य रसिकांनी चिक्कार गर्दी केली हाेती. तसे तर अनिरूध्द वनकर यांच्या प्रत्येक कार्यक्रमात नेहमिच गर्दी असते परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कलावंतानी “गांधी कभी मरते नही” या नाटकाचे प्रथमच दिग्दर्शन करून सर्वांना चकित केले.
अनिरूध्द वनकर यांनी या नाटका करिता महाराष्ट्रातिलच नव्हे तर इतर राज्यातिल कलावंताना या नाटकात काम करण्याची संधी दिली हाेती. नाटकातच नाही तर संगीतातल्या अनेक कार्यक्रमात सुध्दा नव्या कलावंताना अनिरूध्द वनकर आपल्या व्यासपिठावरू संधी प्राप्त करून देत असतात.

हे नाटक पुर्ण पणे व्यवसाईक नाटक असुन लाेक कला जागृती मंच्याच्या वतीने व अनिरूध्द वनकर यांनी चंद्रपुरकरांना निशुल्क बघण्याची साेय करून दिली हाेती.

कार्यक्रमाच्या शेवटी कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वेशभुषेत येणारा कलावंतानी येवुन संविधान हातात घेवुन संविधान वाचवण्याचा माैलाचा संदेश दिला. दिड तासाच्या नाट्य प्रयाेगात एकाही रसिकांनी आपला जागा साेडली नाही. हे या नाटकाचे महत्वाचे ठरले असे मला वाटते.

संपूर्ण नाटकात अनिरूध्द वनकर यांना शाेधणा-या नाटक रसिकांना निराश न करता नाटकाच्या शेवटी एक गायकाच्या रुपात अनिरूध्द वनकर यांची एंट्री कमालीची हाेती. अनिरूध्द वनकर हे या नाटकाचे लवकरच शंभर प्रयाेग करतिल अश्या शुभेच्छा प्रत्येक नाट्य रसिकांनी अनिरूध्द वनकर यांना दिलाच असावे. “ज्यानी गांधी कभी मरते नहीं” हे नाटक बघीतल नाही त्यांनी संधी मिळाली तर नक्की बघायला हवे. याच दरम्यान अनिरूध्द वनकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर एक नवे नाटक रसिकांन समाेर लवकरच घेवुन येणार अशी घाेषणा देखिल केली.

या नाटकात अजुन एक महत्वाचे म्हणजे महात्मा गांधी यांच्या साेबत सरदार पटेल, शहिद भगत सिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मतभेद असुन यांच्या लाेकांनी गांधीजींची हत्या करण्याचा विचार ही कधी केला नाही. परंतु आरएसएसच्या लाेकांबराेबर कसलेही मतभेद नसतांना नथ्थुराम घाेडसे यांनी गांधी यांना का बर मारले ? असा प्रश्न चिन्ह? निर्माण केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page