
निवडणुक जवळ येताच समाजाचे दलाल हाेतात सक्रिय
विधानसभेची चाहुल लागताच समाजाचे दलाल सक्रिय झाले आहेत? आप आपल्या समाजाला घेवुन राजकारणातल्या या बाजारात स्वताच्या समाजाला विकुन स्वता जब्बर मालामाल हाेण्याचा जणु काही समाजाच्या ठेकेदारांनी प्रत्येक निवडणुकीत प्रणच घेतला की काय? हीच परिस्थिती प्रत्येक निवडणुकीत दिसुन येते असते. असे काही ठेकेदार समाजाचे नेतृत्व करता खरे पण निवडणुक आली की, माझ्या समाजाचा मतदार वर्ग हा माेठ्या प्रमाणात आहे आणि मि म्हनेल तीथे, माझ्या समाजातिल मतदार त्याच उमेंदवारांना मत देतिल असे सांगत निवडणुकीत उभे असलेल्या उमेंदवारांकडुन आतल्या दारातुन आपली पाेळी शेकतात जाेंदरा घेत असतात. म्हणजे ( “मि नाही त्यातली” “कळी लाव आतली” ) या म्हणी प्रमाणे दलाली खात असतात.
हे दलाल निवडणुक आली की, प्रत्येक समाजात आढळुन येतिल. दलाली करणारे असे काही समाजाचे ठेकेदार आहेत ज्यांना आपन दुर्मिळ दलाल म्हटल तरि चालेल. दुर्मिळ हा शब्द यांच्यासाठी वापरत आहे. कारण समाजातिल हे दलाल वारंवार लाेकांन समाेर येत नाहीत. मात्र निवडणुक जवळ आली की, निवडणुकीत उभे राहणा-या उमेंदवारांंन बराेबर स्वताच संपर्क करतात. म्हणुन प्रत्येक समाजात अश्या प्रकारची दलाली करणा-या दलालाच्या पहिल्या पावसात निघणा-या पिवळ्या बेडका सारखी प्रजाती आहे असेच म्हणावे लागेल. म्हणुन या दलालांना दुर्मिळ म्हणावे लागत आहे.

या दलालात विशेष करून सामाजिक कार्यक्रते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षात काम करणारे पदाधिकारी, समाजाच्या लाेकांना सामाजिक तत्वाचे ग्यान देणारे समाजाचे ठेकेदार, धार्मिक संस्थेचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थेचे प्रमुख, तसेच जनाधार नसलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा जे दलाली भेटावी म्हणुन उमेंदवारांच्या संपर्कात राहुन माेठी रक्कम जमवण्याचा प्रतिक्षेत असतात.
हे दलाल वर्षभरात समाजातिल महापुरूषांच्या जयंत्या, उत्सव, साेहळे, शिबिर घेवुन छाेटे माेठे कार्यक्रम राबवत आपल्या पाठीशी संपूर्ण समाज आहे याचा दिखावा करत असतात. जेने करून निवडणुकी दरम्यान समाजाच्या नावाने स्वताला विकत घेणा-उमेंदवारा कडुन जाेंदरा मिळवता यावा म्हणुन स्वताचा माध्यमातुन समाजाचा लिलाव करत असतात.
कारण अश्या लाेकांच्या मागे कधीच समाज नसताे. आपल्या जवळ पास पन्नास ते शंभर लाेकांचा जमाव दाखवुन आपल्या मागे संपूर्ण समाज असल्याचे हे दलाल साेंग करत असतात.
अश्या दलाली करणा-या समाजाच्या ठेकेदारांकडुन त्याच्या पाठीशी उभे राहणा-या समाजाच्या लाेकांनी मात्र सावध राहयला हवे?
कारण तुमचे ठेकेदार कधी तुम्हाला न कळत विकतिल याची काही ग्यारंटी नाही. मुख्यता राजकारणात जातीचे समिकरण व्हायलाच नव्हे.
जेने करून समाजाला विकणा-या ठेकेदारांंना तुम्हाला विकण्याची संधीच उपलब्ध हाेणार नाही. मतदारांनी समाजाचा उमेंदवार आहे म्हणुन निवडुण द्यायला नकाे आहे. निवडुण येणारा जनप्रतीनिधी हा एकाच समाजामुळे मत घेवुन निवडुन येत नसताे तर त्याला प्रत्येक समाजाच्या मतदारांनकडुन मत दिल्याने ताे निवडुण येताे.

निवडणुकीत उभे राहणा-या उमेंदवारांना सुध्दा यांचे भान ठेवायला हवे. राजकारणात पक्ष हा महत्वाचा नसुन उभा असणारा उमेंदवार हा मानुस म्हणुन छान असायला पाहिजे. ज्यात जनतेच्या कामाकरिता तळमळ असायला हवी, अश्या उमेंदवाराला मात्र पक्षश्रेष्ठी उमेंदवार देत नाही. म्हणुन अनेक पक्षात वर्षाणु वर्षे काम करणा-या निष्ठावान व प्रामाणिक कार्यक्रत्यांना डावलुन वेळेवर येणा-या आयाराम गयारामालाच उमेंदवारी मिळत असते.
हे सर्व निवडणुकीत समाजातिल ठेकेदारांच्या सक्रियतेमुळे घडत असते. असा अंदाज वर्तवल्या जात आहे. म्हणुन निवडणुक जवळ येताच समाजाचे दलाल सक्रिय हाेतात.



