Saturday, April 18, 2026
Google search engine

निवडणुकीत जातीचे समीकरण कशाला हवे?                 

                                                                                     जातीच्या समिकरणाची मांडणी करून निवडुक लढणा-या नेत्या बद्दल समाजातील मतदारांनी विचार करायला हवे? प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आपन आपल्या जातीचाच नेत्याला उमेंदवारी मिळावी म्हणुन बैठकी घेवुन माेर्चे बांधनी करत असताे. म्हनुन त्या नेत्याला अनेक वर्षा पासुन आपन किती ही पक्ष बदलवले तरि ही आपला समाज आपल्या पाठीशी उभा आहे. आपनच निवडुण येवु या भ्रमात असताे.

आपल्या समाजातिल उमेंदवार निवडुण आला नंतर मग त्या नेत्यांचा समाजातिल लाेकांना किती फायदा हाेताे ? हाेत असेल तर कीती हाेईल याची ही समाजातील विचारवंत लाेकांनी पताळनी करून बघायला हवी.

समाजातिल नेता निवडुण आल्या नंतर त्या अनुषंगाने कुनीच पुढे येवुन पताळनी करत नाही हे ही तेवढेच खरे आहे. तुमचे नेते निवडुण आल्या नंतर ही तुमच्या व समाजाच्या काही कामी पडत नाही हे तुम्हाला स्पष्ट पणे दिसुन येईल. तसेच हाेत असेल तर मग तुमच्या जातीचे ते नेते तुमते कसे काय असु शकतात?

त्याचे बरेच उदाहरण आपल्या देता येईल. शिक्षण संस्था तुमच्याच नेत्यांच्या मालकीच्या असून तुम्हच्या पाेरांना तिथे जागा मिळत नाही. डाेनेशनच्या नावा खाली आपल्याच समाजातिल लाेकांची सर्रासपणे आर्थिक लुट केली जाते.

सहकार संस्था तुमच्याच नेत्याची असून तुम्हाला तीथे हमीभावाला सुध्दा भाव भेटत नाही. उद्योग संस्था हि तुमच्याच नेत्यांची असून तुम्हाला व तुमच्या पाल्यांना त्यात नोक-यात स्थान नाही, अनेक कंपण्यात माेठे कंत्राट ही तुमच्याच नेत्यांचे असुन तीथे सुध्दा तुमच्या पाल्यांना राेजगार उपलब्ध हाेत नाही.

ऐवढेच कशाला राजकीय सत्तेत तुमच्यामुळे विराजमान झालेले नेते बसलेले असुन शासन, प्रशासन दारी तुम्हाला न्याय मिळत नाही. ज्या नेत्यांच्या मागे राब राब राबता परंतु सत्तेच्या प्रवाहात येण्यास हेच नेते तुम्हाला संधी प्राप्त करून देत नाहीत. कारण तीच संधी नेत्यांना आपल्याच पाेरांना किवा नातेवाईकांनाच मिळवुन द्यायची असते. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का -? नाही ना, ते तुम्ही करणार सुंध्दा नाही? त्याचे बरेच कारण सुध्दा आहेत. ते आता तुम्हालाच शाेधुन काढावे लागतील कारण त्या प्रश्नाचे उत्तर ही तुमच्याचकडे असेल.

म्हनुन या नंतर जातीचे समिकरण न बघता जाे याेग्यरित्या जनतेची सेवा करणारा, जनसामान्य वर्गाला न्याय मिळवुन देणारा, स्वतात मानुसकी जपनारा, जाती धर्मात द्वेष न करता मानव धर्म पाडणारा, आपल्या क्षेत्रातिल शिक्षण घेणा-यांना उत्तम दर्ज्याचे शिक्षणाची साेय उपलब्ध करून देणारा, आराेग्य सेवेला महत्व देणारा, आपला क्षेत्रात स्वच्छते करिता काळजी घेणारा तथा बेराेजगारांना राेजगार उपलब्ध करून देणारा उमेदवार असेल. तर त्याच उमेंदवाराला, मतदारांनाे निवडुण देण्याचा आपन मानस करायला हवे.

तरच सध्याच्या राजकारणात आपन मतदार वर्ग समाजाच्या उमेंदवारांना न बघता एका चांगल्या व्यक्ती महत्व असलेल्या उमेदवाराला निवडुण आनाल. तेव्हाच राजकारणात निच्छित पणे नक्की बदल घडलेल आपल्या दिसुन येईल. नाही तर जे आत्ता पर्यंत राजकारणात जातीचे समिकरण बघुन उमेंदवाराला निवडुण देणे सुरू आहे. तेच पुन्हा पुन्हा असेच वर्षाणु वर्ष सुरू राहील हे नक्की….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page