Friday, April 17, 2026
Google search engine

घुग्घुस येथे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन

घुग्घुस येथे दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन

कल्याण सोदारी प्रतिनिधी घुग्घुस

घुग्घुस: येथील बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीतर्फे २६ व २७ जानेवारी रोजी बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिन व भारतीय संविधानाच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर घुग्घुस येथे करण्यात आले आहे.

२६ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता प्रथम सत्रात धम्म संमेलनाचे उद्घाटन व धम्मदेशना द्वितीय सत्रात संविधानावर येणारे आव्हाने व त्यांचे घटनात्मक मार्गाने निराकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृ संघटनासाठी योगदान आणि आजची स्थिती व उपाय, बहुजन चळवळीचे समोरील आव्हाने व उपाय. मातोश्री रमाई यांचे एक अंकी नाटक “मी रमाई बोलते”.

२७ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता प्रथम सत्रात उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचे आगमन, सत्कारमुर्ती प्रथम नगराध्यक्षा यांचा सत्कार व नवनियुक्त नगर सेवकांचा सत्कार. द्वितीय सत्रात डॉ. बाबासाहेबांनी महिलांना दिलेले अधिकार व आजच्या महिलांची स्थिती आणि उपाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रि मुक्ती व आजच्या काळाची परस्थिती.

सायंकाळी ४ वाजता तिसऱ्या सत्रात कल्याणकारी राज्यांचा संकल्पनेला सत्ताधाऱ्यांचे आव्हान व उपाय, भारतीय संविधानाची निर्मिती आणि फुले, शाहु, आंबेडकरी विचार, संघर्ष व दिशा.

२६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विनोदी सुप्रसिद्ध प्रबोधनकार यांचा कार्यक्रम व २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रख्यात प्रबोधनकार यांचा जल्लोष कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठया संख्येत कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page