- चांगली माणंस आणि राजकारण.
- उद्या राजकारणात येवुन नव्या पिढीतिल युवकांनी देशाचा नेता हाेणार असल्याचे स्वप्न बघायला हवे. कारण राजकारणात चांगली मानंसे येणे फार गरजेचे आहे. जर आजची युवा पिढी समाजकार्य करता करता राजकाणात येत असेल तर त्यात बिघडल काय?
- परंतु तसे न हाेता वयाची साठी, सत्तरी गाठलेली मानंसेच आज राजकारणात आपले वर्चस्व गाजवतांना दिसुन येतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराने थकलेले हे राजकारणी काही झाले तरि आपला रूतबा आपले पद साेडायला मुळीच तयार नाहीत. मग ते राजकारण असाे किंवा विविध संघटनेतिल पद असाे, पण अस का बर हाेत हाच नेमका हाच मला प्रश्न नेहमी अस्वस्थ करताे.
- कारण राजकारण हे चांगल्या माणसांचे काम नाही, ही धारणा सर्वसामान्य नागरिक च बाळगून असतील तर एक वेळ मि समजू शकताे. पण तसे नसुन समाजातील विविध घटकांना जवळून पाहणारे तथा घटना आणि घडामोडींचे सामाजिक आणि अन्य कसोट्यांवर विश्लेषण करू शकणारे घटकही जर अश्याच धारणा बाळगून असतील, तर या देशाचे पुढे काय होणार आहे? हे काही निच्छित पणे मला सांगता येणार नाही.
- आज काही राजकारण्यांमुळे राजकारणाला वाईट आणि नालायक ठरवण्याची जणु फॅशन आली आहे की काय असेच वाटते? त्याचा कारण ही तसेच आहे. सध्या विद्यमान घडीला नेत्यांना विकत घेणे, पक्ष पडवणे, नेत्यांना आमिष दाखवणे म्हणजे राजकारणाचा दर्जाच खालच्या पातळीवर गेला असे एक राजकीय नेते स्वताच म्हणतात कदाचित त्यात सत्यता आहेच याला नाकारता येत नाही.
- म्हणजे राजकारण्यांना वाईट व नालायक ठरवण्याची तशी फॅशन खरीच आली आहे की काय असेच वाटु लागले, हा मुद्दा वेगळा पण राजकारण आणि राजकारणी म्हणजे वाईटच, अशी सध्या तरि विद्यमान परिस्थितीथ सर्वसामान्यांची धारणा नक्कीच झाली आहे.
- त्यातूनच राजकारण, निवडणूक हे चांगल्या माणसांचे काम नाहीच, अशीही पक्की समजूत या वर्गाने करून घेतली आहे. त्यामुळेच हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक ‘वाईट’ सिद्ध होत चाललेय. फळ्यावर काढलेली एक रेषा न पुसता, लहान करण्याचे गुरुजींकडून शाळेत मिळालेले आव्हान त्या वेळी पेलले नव्हते खरे पण त्या प्रयोगानेच एक दृष्टिकोन दिला आहे. वाईटाचा प्रभाव कमी करायचा असेल तर चांगल्याचा प्रभाव हा वाढवला पाहिजे. राजकारणाचेही तसेच आहे. राजकारण हे क्षेत्र वाईट लोकांच्या प्रभावाखाली गेले असेल तर चांगल्या लोकांचा प्रभाव सुध्दा राजकारणात वाढवला पाहिजे. चांगली माणसे राजकारणात आल्याशिवाय तिथली वाईट माणसे कमी होणार आहेत का? पण वाईटापासून,अर्थात राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून चांगल्या माणसांना लांब राहायचे सांगताना आपण या देशाच्या भवितव्याला आणखी अंधारात आणि खोलात ढकलत आहोत, हे भल्याभल्यांच्या लक्षात येत नसल्याचे जानवते. राजकारणाकडे चांगल्या माणसांनी ढुंकूनही पाहायचे नसेल, तर वाईट माणसांसाठी तर हा मार्ग सोपाच होत जाणार.
- सत्ता आणि संपत्ती सहज मिळवणे शक्य असताना वाईट प्रवृत्तीची माणसे तर तिकडे आकर्षित होणारच. किंबहुना, ते जर तिकडे वळले नाहीत तरच कुणाला ही आश्चर्य मानायला नव्हे. तसे घडले की आपण चांगल्या माणसांना तिथून आणखी लांब जायला सांगणार आणि वाईटांचा मार्ग आपनच आणखी सोपा आणि प्रशस्त करून देणार, हेच सध्या सुरू आहे.
- यात दोष कोणाला द्यायचा? ज्यांनी या क्षेत्रापासून चांगल्या माणसांना दूर ठेवण्याचे जाणते आहेत त्यांना? म्हनजे ज्यांना माहित असुन ही अजाणतेपणी ज्यांनी काम केले तेच दोषी आहेत, हे सर्वत्र उघड आहे. युद्ध सैनिक लढतात आणि जिंकल्याचे श्रेय जाते सेनापतींकडे. खरे तर भारतासारख्या लोकशाहीच्या प्रबळ असलेल्या देशात युद्धाचे यश अपयश थेट देशाच्या नेतृत्वाशी जोडले जाते, हे आपण पाहत आलो आहोत.
- पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशाची निर्मिती करण्याचे श्रेय सार्या देशाने त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिले हाेते. त्यात फार लांबचे उदाहरण घ्यायला नको. कारगिल युद्धाच्या वेळी कोण सेनापती होते, हे किती भारतीयांना आज आठवत असेल, हे सांगता यायचे नाही पण अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने त्या युद्धात पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला, हे कोणालाही विसरता येत नाही. हे श्रेय उगाच मिळते का?
- जर शत्रुराष्ट्राशी लढण्यासाठी सैन्यात दाखल होणार्या मुलांचा अभिमान बाळगला जात असेल तर त्या युद्धाचा निर्णय घेणार्या, त्याची रणनीती ठरवणार्या आणि यश अपयशाशी जवळचा संबंध असणार्या राजकीय क्षेत्राला आपण अस्पृश्य का मानायचे? भ्रष्टाचार, वाईट प्रवृत्ती या केवळ राजकारणातच शिरल्या आहेत, असे आहे का? नाही ज्यांना सैन्यात जाण्याचा अभिमान बाळगला जातो, त्या सैन्यदलात आता किती ‘दलदल’ झाली आहे, ते इथे मला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी महिन्या-दोन महिन्यांपासूनची वृत्तपत्रे काढून एकदा ती चाळून घेतली, तर सारे काही स्पष्ट होऊ शकेल.
- अर्थात, राजकारणातल्या भ्रष्टाचाराचे हे समर्थन नाही. उलट हा भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठीच तिथे चांगल्या माणसांची अधिक गरज आहे, हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आता राजकारणात चांगली माणसे निवडून येणे अशक्य, असे राजकारणाला वाईट ठरवून वाळीत टाकू असे म्हनणारी मंडळी म्हणत असतात. हे खरे आहे की आपल्या व्यवस्थेतील ‘निवडणूक’ सहज, सोपी राहिलेली नाही. पण याचा अर्थ असाही नाही की, चांगल्या माणसांना निवडून येणे आता अशक्यच आहे. अर्थात, चांगली माणसे म्हणजे कोणती माणसे? कोणाला आपण चांगले म्हणायचे आणि कोणाला वाईट? हे आधी स्पष्ट असायला हवे. त्यातच स्पष्टता नसेल तर समजुतीचा गोंधळ वाढत जाईल, जे सध्या आपल्या समाजाचे झालेय. कसा असतो सज्जन मानुस अर्थात चांगला माणूस? तर तो चंद्रासारखा शीतल असतो; पण त्याच्यावर कोणतेही लांछन नसते. चंद्रावर असलेल्या डागापासून हा भूतलावरचा चंद्र मुक्त असतो. हा सूर्यासारखा परोपकारी असतो पण सूर्यासारखा ताप, उष्णता त्याच्या ठायी नसते, अर्थात, ही झाली चांगल्या माणसाची अलंकृत व्याख्या.
- त्यात आजच्या पार्श्वभूमीवर स्पष्टता आणायची असेल, तर ही संकल्पना आणखी सोपी करायला हवी. राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने मतदारांसाठी चांगला माणूस किंवा चांगला उमेदवार कोणता, हे स्वता मतदारांनी ठरवायला हवे? तेव्हा कुठे राजकारणात चांगली माणंस दिसुन येतिल. नाही तर गुन्हेगारी प्रवृतीच्या लाेकांचे राजकारणात वाढता काैल बघता ताे अजुन ही दिवसेन दिवस वाढतच जाईल हे मात्र खरे…..
चांगली माणंस आणि राजकारण.



