Friday, April 17, 2026
Google search engine

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षाराेपन

चंद्रपूर,

  1. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षण आणि हरित चंद्रपूरच्या दिशेने पाऊल उचलत, लाईट मेटल कंपनीच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे युनिट हेड श्री वाय जि एस प्रसाद, यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री किरण मोरे उपस्थित होते.
  2. या कार्यक्रमात कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारच्या फळझाडे, शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात लाईट मेटल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रशांत पुरी, सहाय्यक महाप्रबंधक विद्या पाल आर.टी.ओ. कार्यालयातील अधिकारी श्रीमती योगिता राणे, श्री मोडक ,श्री पल्लेवाड ,मोटर वाहन निरीक्षक व श्री प्रवीण अदेंकिवार कार्यालयीन अधीक्षक तसेच अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी करण्याचे अथक प्रयत्न श्री शिवाजी विभुते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी केले
  3. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वृक्षारोपण हा फक्त एक उपक्रम नसून, भविष्यासाठी घेतलेले एक जबाबदारीचे पाऊल असल्याचे वक्तव्य मान्यवरांनी केले.
  4. स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून, अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page