Saturday, April 18, 2026
Google search engine

घुग्घुस शहरातील अवैध धंद्यांवर नवीन पोलीस निरीक्षकांची कठोर कारवाई अपेक्षित

घुग्घुस शहरातील अवैध धंद्यांवर नवीन पोलीस निरीक्षकांची कठोर कारवाई अपेक्षित

कल्याण सोदारी प्रतिनिधी चंद्रपूर तालुका

घुग्घुस;

घुग्घुस शहरात सध्या कोळसा चोरी, गोमांस कत्तल, अवैध दारू विक्री, अवजड वाहनांचे ओव्हरलोडिंग, रेती चोरी यांसारख्या अवैध धंद्यांचाच्या सुळसुळाट झाला आहे. विशेषतः, पोलीस पकड करताना केवळ ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करत असून, ट्रॅक्टर मालकावर कारवाई होत नाही. घुग्घुस पोलिस पेट्रोलिंग दरम्यान रेती चोरीच्या मुख्य ठिकाणी नजर ठेवतात, मात्र महसूल अधिकारी येण्याआधीच ट्रॅक्टर चालकांना सूचना देऊन त्यांना पळवले जाते. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

आपल्याच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालकावरही गुन्हा दाखल केला जातो. मग घुग्घुस पोलिस स्टेशनमध्ये तसे का होत नाही? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच, डिझेल चोरी, सट्टा पट्टी आणि बसस्थानकाजवळील अवैध प्रवासी वाहतूक यांसारखे अवैध धंदेही खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे शहराच्या शांततेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः, सुगंधी तंबाखू विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने या व्यवसायाला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन मिळत आहे.

नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीमुळे नागरिकांमध्ये या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा वाढली आहे. इतर शहरांमध्ये अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाईचे उदाहरण पाहायला मिळते. उदाहरणार्थ, पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या होत्या.

घुग्घुसमधील नवीन पोलीस निरीक्षकांकडूनही अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाईची अपेक्षा आहे, ज्यामुळे शहरातील अवैध धंद्यांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page