Friday, April 17, 2026
Google search engine

मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही

मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही

दिनांक १३,१४ रोजी होळी व धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या कालावधीत काही अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक १३ मार्च २०२५ ते दि.१४ मार्च २०२५ या कालावधीत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक-ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

‘तरी होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये’ याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे चंद्रपुर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

मुम्मका सुदर्शन, भापोसे) पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page