
परभणी प्रकरणी कांग्रेस शहर सेलच्या वतीने निषेध आंदाेलन.
बाबासाहेबांच्या पुर्णकृती पुतळ्या जवळ निषेध आंदाेलन.
परभणी येथे परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्याची घटना दि.11 डिसेंबर 2024 रोजी घडली. जी अत्यंत निंदनीय आहे. व जाती धर्मात तेळ निर्माण करण्यात यावा या हेतु ने करण्यात आला की काय असा संशय आंबेडकरी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडल्या नंतर मात्र याचे प्रतीसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटले. याच्या निषेधार्थ आंबेडकरी संविधान प्रेमी जनतेने पुकारलेल्या बंद मध्ये काही समाज विघातक कृतीनी या आंदोलना गालबोट लावण्याचा प्रयत्न सुध्दा केला. हे सर्व घडत असतांना पोलिस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली.

काही पोलिसांनी तर दलित वस्त्यांमध्ये जाऊन विणा कारण तोडफोड आणि मारहाण सुध्दा केली. या घटनेचा निषेधार्थ दिनांक 16 डिसेंबर 24 राेजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा समोर दुपारी 12 वाजता अनुसुचित जाती विभाग शहर कॉंग्रेस कमेटी तथा शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले.
या वेळेस अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष सागर खाेबरागडे तथा सर्व पदधिकारी आणि कोंग्रेस कमेटीचे चंद्रपुर शहर ग्रामीण अध्यक्ष मा.रितेश ( रामु ) तिवारी हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. त्याच साेबत या निषेध आंदाेलनात शहर कांग्रेस कमेटीचे कार्यकर्ते तसेच अनुसुचित जाती विभागाच्या महिला पदधिकारी व कार्यकर्त्या माेठ्या संख्येने उपस्थित राहुन आपला सहभाग दिला. व अश्या समाज कंकटांवर कारवाही करून त्यांना कठाेर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.



