Saturday, April 18, 2026
Google search engine

संघटन कसे असावे..? प्रत्येकाने वाचा

संघटन कसे असावे..?
✍🏽 प्रत्येकाने वाचा – nilesh thakre

🔳 संघटन चालविण्यासाठी संघटन कौशल्य आवश्यक आहे, त्यासाठी सभासदांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे,ज्या संघटनेकडे प्रशिक्षणाची यंत्रणा आहे, तीच संघटना आपले ध्येय गाठण्यासाठी यशस्वी होत असते. अप्रशिक्षित सभासद संघटनेच्या ध्येयधोरणावर कार्य करतीलच याची शाश्वती कमीच आहे. शिवाय असे संघटन दिशाहीन असते.

🔳 संघटनेचा उद्देश


संघटनेच्या सभासदांना आपल्या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे,यांची नेहमीच माहिती असेल, तरच ती संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकते.

🔳 ध्येय

संघटनेचे ध्येय हे श्रेष्ठ व उचित असले पाहिजे,क्षणभर व दोन-चार लोकांच्या स्वार्थासाठी संघटना नसते, तर दबलेल्या-पिचलेल्या लोकांचा आवाज म्हणजे संघटना असते. हे संघटनेचे ध्येय उराशी बाळगून जी संघटना कार्य करते,ती इतिहास घडवते. स्वार्थी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना इतिहास कधीच माफ करत नाही.

🔳 आचारसंहिता

ज्या संघटनेला आचारसंहिता असते ती संघटना कमी वेळामध्ये प्रगती करू शकते. आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करणारी संघटना जनतेला आकर्षित करते. बेशिस्त, हेकेखोर आणि गर्विष्ठ प्रवृत्ती बाळगणाऱ्या वृत्तीच्या संघटनेमध्ये लोक जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून नेता ते कार्यकर्ता सर्वांना आचारसंहिता महत्त्वपूर्ण आहे.

🔳 वैचारिक अधिष्ठान

संघटनेच्या सभासदांमध्ये वैचारिक अधिष्ठान निर्माण झाले पाहिजे, जर वैचारिक अधिष्ठान नसेल तर ते संघटन म्हणजे गुराढोरांचे संघटन होऊन जाईल. यासाठी सभासदांना सातत्याने प्रेरित करण्यासाठी प्रशिक्षण यंत्रणा तसेच आदर्श नेतृत्व समोर असले पाहिजे. तसेच सभासदांनी चौफेर पुस्तके वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे,एक मेकांसाेबत चर्चा-संवाद केला पाहिजे, व स्वत: आणि संघटनेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले पाहिजे.

🔳 कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

वरिष्ठ पदधिका-यांनी कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरित करणारे विविध प्रकारचे मार्गदर्शन केले पाहिजे.

🔳 निधीची तरतुद

संघटनेच्या पदधिका-यांना संघटनेच्या कार्यासाठी निधीची तरतूद करण्याचे कौशल्य आवश्यक आहे. कारण संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निधीची आवश्यकता असते, म्हणून संघटनेच्या कार्याला योग्य पध्दतीने मांडून जनतेकडून निधी जमा करता आला पाहिजे. निधीचा योग्य वापर करून हिशोबामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे.

🔳  लढ्याचे स्वरुप, संघटनेची कार्यपध्दती इत्यादी बाबी लक्षात घेऊन जे संघटन ऊभे राहते. ते संघटन यशस्वी होते.संघटन चालविण्यासाठी सभासद लागतो. त्याचे चारित्र्य,शील, नैतिकता,स्वभाव,क्षमता,निष्ठा व शिक्षण याबाबी महत्वपूर्ण ठरतात.

🔳 संघटनात्मक कार्यासाठी क्षेत्र मर्यादा महत्वाची असते. संघटन हे सामाजिक असते. त्यामुळे सर्वांच्या विचाराला प्राधान्य दिले जावे. परंतु एकवाक्यता महत्वाची होय.

🔳  संघटनेत विविध स्वरुपाची कामे असतात. संघटनेतिल पदधिकारी तथा सभासदांनी इतरांचा द्वेष व मत्सर न करता प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करावे. बौध्दिक व शारीरिक स्वरुपाची कामे सारख्याच पातळीवरची असतात.
संघटनेला बुध्दिजिवी वर्गाने वेळ, पैसा व बुध्दी दिली पाहिजे. तरुणांनी वेळ व बळ दिले पाहिजे. एक मिशन स्वरुपात संघटनेतिल सर्व लाेक कामकरत असतील तर ती संघटना कायम टिकते.

🔳  संघटनेचा पैसा हा सार्वजनिक असतो. त्याचा हिशोब काटेकोरपणे ठेवला पाहिजे. संघटनेचे पद ही मिरवायची बाब नसून दिलेली जबाबदारी पार पाडण्यास मिळालेली संधी असते. पदासाठी न भांडता संघटनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी काम केले तर संघटनेला नक्कीच यश मिळते.

🔳 संघटनेतील पदधिकारी, सभासदांना प्रशिक्षणाची गरज असते. ती वेळोवेळी कार्य शाळा आयाेजित करून पूर्ण केली पाहिजे.

संघटनेतील सर्व सभासदांनी, कार्यकर्त्यांनी, चळवळीचा अभ्यास केला पाहिजे. सर्वांच्यात परस्पर दृढ विश्वास असल्याशिवाय संघटन कधी ही टिकू शकत नाही. यासर्वबाबींची पूर्तता जी संघटना काटेकोरपणे करेल ती संघटना नक्कीच यशस्वी होईल.

प्रत्येकांनी यावर गांभीर्याने विचार करावा.
तसेच पुराेगामी विचार हे तळागतात जनसामाण्यात पाेहचण्याकरिता त्यांच्या मनात रूजवण्यासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी स्वताहुन प्रयत्नशील असावे.

निलेश ठाकरे, राज्य सचिव – राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page