
ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे चार नेते
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. दरम्यान, ईव्हीएम तयार करणाऱ्या कंपनीच्या संचालक पदावर भाजपच्या चार नेत्यांची नेमणूक करण्यात आली असल्याने आता यावरून वादंग निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावर सरकारला धारेवर धरले आहे तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आक्षेप घेतला आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करते. ही कंपनी ईव्हीएम मशीनमध्ये असणाऱ्या चिपमध्ये लागणारा गुप्त कोडही तयार करते. दरम्यान, या कंपनीच्या संचालक मंडळात भाजपच्या चार नेत्यांची नियुक्ती करण्यात आली.
विरोधकांचे निवडणूक आयोगाला पत्र
.. तर ईव्हीएममध्येही छेडछाड हाेण्याची संकेत
ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जर चंद्रावरील उपग्रह, उपकरणे जमिनीवरून नियंत्रित केली जाऊ शकतात, तर ईव्हीएममध्ये फेरफार करणे शक्य असल्याचे दावा देशभर वारंवार केला जातो. विरोधक तर कायम हा प्रश्न उपस्थित करीत असतात.

निवडणूक आयोग यावर गप्प का?
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले की, ईव्हीएम बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर संचालक म्हणून कार्यरत असलेले भाजप पदाधिकारी असल्यास ही मशीन सुरक्षित कशी आहे. रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की हे निवडणुकीच्या पावित्र्याचे रक्षण कोण करेल? निवडणूक आयोग यावर गप्प का? निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावे. तसेच भाजपच्या या चार नेत्यांची पदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.



