
पक्ष फोडा, बंडखोरांना विरोधमुक्त भारताचे स्वप्न दाखवा सत्ताधारी पक्षाचा अजेंडा.
भाजपचे विरोधी पक्षमुक्त भारताचे स्वप्न हळूहळू पूर्ण होत आहे. महाराष्ट्रात विरोधकांना 50 जागाही मिळवता आल्या नाहीत. भाजप अशी रणनीती अवलंबते की विरोधकांचा सफाया व्हायला वेळ लागत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अतिशय कुशलतेने याचे बळी ठरले आहेत. तुम्हाला एक तर तुरुंगात जायला आवडेल की भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ धुतले जावे ते आवडेल यांचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागताे, म्हणुन ताे पक्ष सोडून युतीचा आश्रय घेतो, जो त्याला आश्रय देतो त्याचे पाप शुद्ध करतो. आम्ही म्हणालो, “राजकारणात आणि मुत्सद्देगिरीत सर्व काही न्यायिक आहे. भगवान रामाचा आश्रय घेऊन सुग्रीव आणि विभीषण यांने सुध्दा सिंहासन मिळवले हाेते.
कायद्यानुसार, कोणत्याही पक्षाचे एक तृतीयांश आमदार किंवा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यास किंवा दुसऱ्या पक्षात सामील होण्यास स्वतंत्र असतात. भाजप हा चुंबक विरोधी पक्षातील महत्त्वाकांक्षी पक्ष आहे, असंतुष्ट नेत्यांना दमकाठी देवुन किंवा माेठी रक्कम देण्याचे आमिष दाखवुन स्वतःकडे आकर्षित करण्यात भाजप एकदम मुस्तेद आहे.
___________________________________________________
भाजप बूथ स्तरावरून आपली ताकद उभी करतो.
भाजपचे पन्नाप्रमुख नेमके काय आहेत? काय करतात?
हे विरोधी नेत्यांना सुध्दा माहीत नाही व कधी त्यांनी ते समजुन सुध्दा घेतल नाही. मतदार यादीतील एका पानावरील सर्व नावांशी संपर्क साधून त्यांना पक्षासोबत आणण्याची जबाबदारी पन्नाप्रमुख यांची आहे. विधानसभा क्षेत्रीय येणा-या प्रत्येक प्रभागातल्या बुथवर प्रभावी कामगीरी करण्याची त्यांना आधी पासुन ट्रेनिंगच देण्यात येते. अनेक सामाजिक संघटना, मंदिर, बाेध्द विहार, संस्था, तीथे हाेण-या कार्यक्रमा प्रसंगी तन, मन, धणानी, भाजपाता सहभाग कसा राहिल त्यात ताे पुढे असताे.
प्रत्येक आरएसएसच्या बूस्टर डोसने भाजप पक्ष हा वर्षाणु वर्ष मजबूत झाला आहे. कोणत्याही विरोधी पक्षाकडे इतके मजबूत आणि शिस्तबद्ध केडर सध्या तरी नाही. काहीही झाले तरी ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, केजरीवाल यांसारखे नेते भाजपचे विरोधी मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही आहेत हे महत्वाचे. नांदेडच्या प्रियांका गांधी आणि रवींद्र चव्हाण यांच्या विजयाने काँग्रेसनेही लाेकसभेतिल आपला शंभरीचा संख्या बळाचा टप्पा पार केला आहे.
म्हणुन महायुति दिवसेन दिवस आपला फतेह निर्माण करत जात आहे. आज विद्यमान परीस्थितीत मतदारांनी निवडुण दील्या नंतर आमदार, खासदार, नगरसेवक, यांच्यात नैतिकता, प्रामाणिक पणा काहीच शिल्लक राहीलेला नाही. केवळ मात्र आजचे राजकारण हे आर्थिक सक्षम हाेण्यासाठीच आहे व राजकारणात यश संपादन करायच असेल तर पैसा लावणारा उमेंदवारच हवा हे वस्तु स्थिती आहे.
भाजपचा इतिहास शाेधला तर नक्की कळेल की हा पक्ष आधी पासुनच ईतर पक्षां साेबत युती करत करत माेठा पक्ष हाेत गेला आहे. नंतर मात्र याच भाजप पक्षाने आपले,धाेरणात बदल करून एक नवी युक्ती अवलंबवली पक्ष फोडा, दुस-या पक्षातिल बंडखोरांना दमकाठी देवुन ईडी.सिबीआय. पाेलिस यंत्रणाती भिती दाखवुन विरोधमुक्त कॉंग्रेसचे नव्हे तर भारतातुन सगळ्याच पक्षाचे विराेधमुक्त स्वप्न दाखवा, आणि आपले राजकारण करून आपले स्थान सत्तेचा नेहमीसाठी टिकवुन ठेवा. हेच एकमात्र उदेश व सत्ताधारी पक्षाचा अजेंडा भाजपचा दिसुन येताे.
गेल्या पंधरा वर्षाचा कालावधीत हाच धाेरणात्मक कार्यक्रम राबवुन भाजप पक्ष विजयाची मलाईचा स्वाद चाेखत नसल्याचा राजकिय अभ्यासकांचे मत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातिल विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालने भाजपचा खरा चेहरा हा देशा पुढे दिसुन आला आहे. त्यात माेठ्या फरकाने विजय मिळवण्याचा निकाल भाजपने स्वता फिरवला असा संदेह विराेधकांना जात असल्यामुळे पुन्हा एक दा ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा सर्व खेळ निवडणुक आयाेगाचा असल्याचा व निवडणुक आयाेगानी भाजपला सत्तेत आण्यासाठी जानिव पुर्वक केला असल्याचे विराेधकच नव्हे तर मतदारांच्या काही पत्रकारांचे ही मत आहे.
आता प्रत्येक विराेधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर बंदी आण्याकरिता जन आंदाेलन करण्याची घाेषना केली आहे.



