Saturday, April 18, 2026
Google search engine

महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणुकीत अक्षरक्षा पेैश्याची ढगफुटी हाेवुन महापुर आल्याची जाेदार चर्चा.

महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणुकीत अक्षरक्षा कधी नव्हे एवढा पेैश्याची ढगफुटी हाेवुन महापुर आल्याची जाेदार चर्चा.

नकुतेच विस नाेव्हेबरला महाराष्ट्रातिल विधानसभा निवडणुका पार पडल्या. परंतु कधी नव्हे ऐवढ्या प्रमाणात मतदारांन मध्ये पैसा वाटला गेल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेत हाेत आहे.

काल परवा अमेरीकेतील एका वृत्त वाहीणीवर बातमी झळकली. गेल्या पन्नास वर्षाच्या ईतिहासात कधी न बघीतल असेल किंवा कधी न ऐकण्यात आले असेल अशी धक्कादायक बातमीची चर्चा जाेमात हाेत आहे.

समाज कारणा कडुन आधी राजकारणाकडे जाता येत हाेत. मात्र आता राजकारण सरड आर्थिक कारणाकडे जात आहे असे स्पष्टपणे चित्र दिसुन येत आहे. या निवडणुकीत उमेंदवारांना कडुन मतदारांना पैश्यानी लुभावण्याचा माेठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला असुन निवडणुक आयाेग मात्र कुंभकर्णि झाेपेत हाेता असेच म्हणावे लागेल.

निवडणुक आयाेगाच्या आदेशाने पाेलिस प्रशासनाने काही नाम मात्र रक्कम पकडुन स्वताची पाठ थाेवली असेल. परंतु अनेक मतदार संघात सर्रासपणे पैसे वाटण्यात आले हे ही तेवढच सत्य आहे.

प्रशासन मतदारांना निरंतर जागृत करण्यात काम करत आहे. मतदार मात्र स्वताला विकण्यास तयार असल्याने, उमेंदवार ही मतदारांना विकत घेण्यास बाेल्या लावतांना अनेकांंनी उघडपणे बघीतले आहे. अश्याच प्रकारे जर का निवडणुका हाेत असतिल, पैसै घेवुन मत विकत घेता येत असतिल, तर निवडणुक आयाेगानी निवडणुका घेणेच बंद करायला हवे? नाही तर राजकारणात गुंड प्रवृतीचे उमेंदवार व पैश्याचा जाेरावर राजकारणात येणारे उमेंदवार सत्तेत बसतिल हे मात्र तेवढच खर असेल.

मतदार हा जागृत असल्याचे साेंग करून पैसै घेवुन गप्प बसलेला आहे. आज महाराष्ट्र दिवसेन दिवस मागे पडत असुन गुजरात राज्य हा महाराष्ट्र राज्याच्या एक पाऊल   पुढे जात आहे. महाराष्ट्राचा काही नालायक राजकाणी नेत्यांनी गुजरात येथिल नेत्यांन समाेर शरणागती पत्करलेली आहे. हे मतदारांना का बर दिसत नसेल, मतदारांनी विचार करून मत दान करायला हवे मात्र आजचा मतदार हा मतदान करतेवेळी काेनता उमेंदवार संपुर्ण परिवारवाला किती पैसै देवु शकताे याच विचारात असताे.

संविधानाने दिलेला हक्काचा व शस्त्राचा हाच उपीयाेग जर मतदार करत असतील तर येणारी वेळ मतदारांनकडुन हा हक्क ही हिरावला जाण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही.

मतदानाच्या दाेन दिवसापुर्वीच ‘लक्ष्मी’ बाजारात अवतरली हाेती.

जिल्ह्यात विधानसभा निवडणूक चुरशीची झाल्याने प्रत्येक मतदारसंघात पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना निवडून देण्यासाठी लक्ष्मी थेट मतदारांच्या घरात सहजच उतरवली होती. एका मताला पाचशेच्या चार ते सहा नोटा मिळू लागल्याने मतदारांचाही चांगला भाव वधारला होता. मतदारांनीही ‘गंगेत घोड न्हाऊ द्या’ म्हणत लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेतल्याने एका दिवसातच किरकोळ बाजाराला तेजीचे रूप आल्याचे दिसत होते. अनेक ग्राहकांनी दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीला किरकोळ बाजारात उतरवून वाटेला लावून देण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात चांगली खरेदी-विक्री झाली असून, कडक नोटांनी अनेक दुकानदारांचा गल्ला भरून निघाला आहे. काहींनी दुसऱ्या दिवशी बाजारात नोटा काढून आता जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीकडे लक्ष निवडणुकीनंतर बाजारातील चित्र व मतदारांची हौस भागल्याने आता जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकांकडे अनेकांचे डोळे लागून राहिले आहे. नेहमीच अशा निवडणूक येवो, असा आशावाद समाजात चवीने चर्चिला जावू लागला आहे.

मतदारांनी आपल्यावरील अनेक दिवसांपासून थकीत असलेली उधारी मिटवून टाकली आहे. मतदारांना मिळणारी रक्कम इतकी भरभक्कम असल्याने काहींनी सवयीप्रमाणे ऑनलाइन होणारा व्यवहार बंद ठेवून कोऱ्या करकरीत नोटांनी व्यवहार भागवून आनंदाने मोकळे झाले आहे. मागील अनेक निवडणुकीत दारू, चिवडा, मटण ही पारंपरिक पद्धत बंद झाली असल्याचे चित्र दिसून आले. आता निवडणूक विचार, आचार, नैतिकता, प्रामाणिकता, नागरी समस्या, जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या समस्यांना दूर लोटत केवळ पैशाच्या महापुरात वाहून गेली आहे. देशातल्या एका माेठ्या कॉरपाेरेटर ने तीन हजार चारशे कराेड रूपये महाराष्ट्रातल्या निवडणुकी करीता कंटेनरने पाठवण्यात आल्याचा खुलासा महाराष्ट्रातल्या एका राजकीय अभ्यासक असलेल्या माेठ्या पत्रकारांनी केला आहे. त्यात याच लक्ष्मीचा वापर अधिक झाल्याच्या चर्चा चवीने चर्चिल्या जात आहेत. साम, दाम, दंड, भेद याच तत्वांवर आधी निडणुका लढवल्या जात हाेत्या. मात्र आता तसे काही ही हाेतांना दिसत नाही. पेश्याची महापुर पाहुन कार्यकर्ते व मतदार या निवडणुकीवर फिदा झाले आहेत. या अनैतिक तत्वाचा भविष्यात नक्कीच गंभीर परिणाम होणार हे मात्र तेवढेच खरे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page