Saturday, April 18, 2026
Google search engine

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात अजगराने विळखा घातला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात अजगराने विळखा घातला आहे.

म्हणून त्या अजगराला हद्दपार करणे ही काळाची गरज आहे.

रुपेश देशमुख ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी वासियांना आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांना माहित असायला हवे. गेल्या 10 वर्षात ब्रम्हपुरीला अजगराने विळखा घातला आहे त्या अजगरा पासून ब्रम्हपुरी मुक्त करणे अत्यंत जरुरी आहे. ब्रम्हपुरीत जो विकास सांगितलं जातो तसं काहीही निदर्शनात दिसत नाही फक्त सरकारी बिल्डिंग, गटार बांधकाम हे प्रत्येक तालुक्यात सरकारनेच केले आहे. नवीन काही नाही परंतु ब्रम्हपुरी भ्रस्टाचाराने बरबटून गेली आहे, नगर परिषद मधील भ्रस्टाचार, सगळ्या ग्रीन आणि रिजर्वेशन जागा पैसे घेऊन काढून टाकण्यात आल्या, ज्या तलावामुळे ब्रह्मपुरीत पाण्याची पातळी आहे तो तलाव सुद्धा दोनदा विक्रीचा करारनामा झाला,
ब्रम्हपुरीत एकमेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान आहे त्यांचे व्यावसायिक गाळे भूमिपूजन करून टाकले,
निवडणूकीच्या तोंडावर अनेक भूमिपूजन झाले प्रत्येक्षात कोणतेच काम चालू झाले नाही,


अड्याळ टेकडी च्या बाजूला ग्रामपंचायत ची परवानगी न घेता ४५ करोड रुपयाचे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन करून गुरुदेव सेवा मंडळ आणि बौद्ध बांधवामध्ये मुद्दामून निवडणूक तोंडावर वाद लावण्याचा प्रयत्न केला,
मौशी च्या प्रकरणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष याचाच हात होता, नागरिकात चर्चा होत आहे.
विपश्यना केंद्रात 51 भगवान गौतम बुध्दाचे मूर्तिचे वाटप केले पण प्रत्येक्षात घरी आणलेली मूर्ती परिवारातील विरोधामुळे स्थापन करू शकले नाही याचा अर्थ फक्त दोन धर्मामध्ये भांडण लावण्याच्या प्रकार, वेळोवेळी पक्ष बदलून आपली भूमिका सुद्धा बदलण्याचा प्रयत्न झाला


बाजार समितीत खूप मोठा भ्रष्टाचार झाला अशी लोकात चर्चा आहे,
तेथील गाळे शेतकऱ्यांना न देता आपल्याच लोकांना देऊन गरजू शेतकऱयांना किरायाने देण्याचे पाप याच लोकांनी केले आहेत.
आणि इतका पैसा जमा केला कि, त्यांचे कार्यकर्ते उघड पणे सांगतात कि निवडणूकीला 100-200-500 करोड ची तरतूद आहे
मग हे असा कोणता व्यवसाय करतात त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला ते जन्मजात एवढे श्रीमंत होते का? जसे इंग्रज देश्यात आले आणि सगळे लुटून नेऊन देशाला बरबाद केले तसेच तर नाही ना?
ज्यांचा ब्रम्हपुरी सोबत दुरदुरचा काहीच समंध नाही ते आपल्या सुखदुःखात नाही तर राज्य करायला आले हे समजा.

कुणबी समाजाच्या श्रीमती प्रतिभाताई धानोरकर पतीच्या निधनाने दुःखी असताना जो व्यक्ती मुलीला तिकीट द्या म्हणून चंद्रपूर ला पाठवून तिथल्या पदाधिकारी यांना हाताशी धरून त्रास देतो तो आपला होऊ शकेल का? ही विचार करण्याची गोष्ट आहे,
कुणबी समाजाने मेळावा घेतला तर काँग्रेस पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री महिंद्र ब्राम्हणवाडे हे तिन्ही काँग्रेस चे कुणबी समाजाचे पदाधिकारी आहेत त्यांचीसुद्धा बदनामीकारक पोस्ट स्वतः SC समाजाच्या ग्रुपवर टाकली कि माझ्या विरुद्ध मेळावा घेतला , विचार करा जो व्यक्ती पक्षाच्या लोकांना बदनाम करते तेही दुसऱ्या ग्रुपवर कश्यासाठी तर दोन समाजात भांडण लावण्यासाठी.

महिलांना लाडकी बहीण १५०० रुपये मिळतात त्याचा विरोध केला,
राम मंदिर चे भूमिपूजन च्यावेळी विरोध करणारे हेच महाशय प्राणप्रतिष्ठा वेळी प्रभू श्रीराम ला प्राण देणार का? म्हणून टिंगल टवाळी करणारे व ब्रम्हपुरी मध्ये श्री भगवान गणेश्याच्या वेळी देखावा कुठला तर प्रभू श्रीरामाचा म्हणजे किती विरोधाभास, रामजन्मोत्सव, हनुमान जयंती आपले लोक करतात का असे कार्यकर्त्यांना विचारणारा माणूस आपल्या धर्माबद्दल आस्था असेल असे बिलकुल वाटत नाही.

म्हणून ही शेवटची संधी आपल्याला आहे या इंग्रजांचे विचार रूपी आमदार ला त्यांचे जागी वापस पाठविण्याचे धाडस आपण करावे अशी हात जोडून विनंती, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील लोकांना करण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page