Saturday, April 18, 2026
Google search engine

चंद्रपुर विधानसभा हि लढत दुहेरी की चाैरंगी.

चंद्रपुर विधानसभा हि लढत चाैरंगी की दुहेरी मतदार मात्र संभ्रभात.

चंद्रपुर – विधानसभेसाठी चाैरंगी लढत? हाेण्याची शंका वर्तवली जात आहे.
एकीकडे महायुतीचे उमेंदवार किशाेर जाेरगेवार तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेंदवार प्रविण पडवेकर यांंनी निवडणुक पूर्वतयारी म्हणून मतदारांची राजकीय मोहिमा आखत मैदानावरील स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपुर येथिल राजकारण ढवळून निघाले आहे.  निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राजकीय नेत्यांनी कार्यक्रत्यांनी वेगवेगळ्या मोहिमा आखत मैदानावरील स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.

आता दिनांक 4 नाेव्हेबरला अर्ज परत घेण्याची मुद्दत संपली असुन दाेन्ही मुख्य पक्षातुन टिकीट न मिळालेले कॉंग्रेस पक्षाचे उमेंदवार राजु झाेडे तसेच भाजप पक्षाचे उमेंदवार ब्रिजभुषण पाझारे हे यांना पक्षातिल टिकीट न मिळाल्याने झाले. त्यामुळे
हे दाेन्ही उमेंदवार आता अपक्ष लढण्यास सज्ज असुन चंद्रपुर विधानसभा 71 येथिल राजकीय घडामोडी आता गतिमान झाल्या आहेत.

निवडणुकीत पक्षाच्या असलेल्या उमेदवारांसह त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मोहिम हाती घेतल्या आहेत. सर्वच पक्षांच्या राजकीय यात्रा व अभियानांमध्ये राज्य व देशपातळीवरील विषयांवर चर्चा हाेत आहेत. स्थानिक प्रश्नांचा ऊहापोह होताना कुठल्याच राजकिय पक्षाकडुन सध्या तरि दिसत नाही. तरीही पब्लिसिटीच्या माध्यमातून मतदारांवर आप आपल्या भूमिका बिंबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दिनांक 6 नाेव्हेंबर पासुन उमेंदवारा मार्फत विधानसभा मतदारसंघात जाऊन अभियानाची सुरूवात केली जाणार आहे.
तसेच निवडणुकीच्या मैदानात आता इतर उरवरीत इतर उमेंदवार उतरणार असल्याची शक्यता आहे. सध्या चंद्रपुरात चाैरंगी लढतीची चर्चा सध्या रंगली आहे. परंतु खरी लढत ही कॉंग्रेस व बिजेपी पक्षातच असेल असे मतदारांकडुन बाेलल्या जात आहे.

जरि किशाेर जाेरगेवार यांनी भाजप पक्षात प्रवेश करित आपला दावा मजबुत असल्याचा कागावा केला असेल, परंतु त्यांच्यासाठी हि निवडणुक सहज साेपी जाणार नाही. हे जाेरगेवारांना आधीच माहीती असल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षात प्रवेश घेण्याकरिता सुरवाती पासुनच आपल्या स्तरावर स्वताहुन परिश्रम घेत हाेते. जमिनीस्तरावरावरची माहिती घेतल्यास चंद्रपुर विधानसभा येथिल जनतेच्या वतीने जाेरगेवार हे यंदा निवडुन येणार नाही असे कयास लावल्या जात हाेते. परंतु जाेरगेवार यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने व पक्षाची टिकीट मिळवुन आपले पारडे जड असल्याचे दाखवुन दिले.

जाेरगेवारांमुळे गेल्या 30 वर्षापासुन भाजप पक्षात असणारे ब्रिजभुषन पाझारे यांना टिकीट देता व यांच्यावर झालेला अन्याय बघता त्यांनी अपक्ष लढणार हे स्पष्ट केले हाेते. मात्र भाजपच्या हॉयकंमाडने पाझारे विरूध्द दाखवलेली वृती याकडे बघतांना बीजेपी पक्षाचे कार्यक्रते जाेरगेवार यांच्यासाठी या निवडणुकीत काम  करतिल की नाही किंवा ते किती परिश्रम घेतिल हे बघणे अपेक्षित राहील. काेनत्याही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकांच्या निमित्ताने जशी तयारी व्हायला हवी तशी अजुन पर्यंत तरि सुरु झालेली नाही.

मतदारांना लुभावण्यास एकापाठोपाठ एक राजकीय अभिनीयान आता सुरू हाेईल. त्यात कॉंग्रेस पक्षाचे उमेंदवार राजु झाेडे पण लढण्यास सज्ज आहेत ते स्वबळावर किती मत घेतिल त्याचे कॉंग्रेस पक्षाला किती नुकसान हाेईल हे निवडणुक नंतरच कळेल.

या ही निवडणुकीत ही “छन छन की सुनाे झनकार” ये दुनिया है काला बाजार के पैसा बाेलता है” या गाण्या प्रमाणेच निवडणुक हाेण्याची चिन्ह दिसुन येत आहे. आता सर्व काही मतदारांवर अवलंबुन असेल हे मात्र नक्की…..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page