Saturday, April 18, 2026
Google search engine

जीवन जगण्यात व्यस्त व्हा, कामात नाही.

जीवन जगण्यात व्यस्त व्हा, कामात नाही

शीर्षकावरून इथे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं असेलच. पण मी तुम्हाला इथे तुम्हाला जगण्याचा मंत्र देण्यासाठी लिहित नाही आहे. मी एक सूत्र तुम्हाला देणार आहे. हो बरोबर वाचलंत तुम्ही, एक सूत्र देणार आहे. ते सूत्र म्हणजे “चोवीस तास अपुरे असतात, पण आठवड्याचे १६८ तास काही कमी नाहीत.” पटत का बघा?

आपल्या महत्त्वाकांक्षा, स्वप्नं खूप असतात. पण वेळ मात्र आपल्याकडे फारच कमी असते. साधारणपणे आपण चोवीस तासात आपली सर्व कामं उरकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच रोज पुन्हा रिपीट करतो. त्यामुळे आपल्याला रा्ज थकवा येताे म्हणुन रोज तेच तेच केल्याने कंटाळा येत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही खरंच आयुष्य जगता आहात का हे तुम्हाला ठरवायच आहे ?

तुम्ही कामात व्यस्त असता हे मान्य आहे पण मग जगण्यात कधी व्यस्त होणार आहात हे महत्वाचे आहे? आयुष्याने तुम्हाला फस्त केल्यावर तुम्ही जगणार का? नाही ना चला सोडा ते मग, आपण चोवीस तासांच्या जागी सात दिवसांच्या १६८ तासांचं गणितच मांडूया ना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट होईल.

खरं तर आपण १६८ तास म्हटले पण त्यात दिवसाचे झोप, जेवण – बनवणं आणि खाणं या सर्व गोष्टी रोज करायच्या आहेतच. यात आपण दर दिवशी झोपेच्या आठ तासांप्रमाणे ५६ तास पकडुया. चहा, नाश्ता, जेवण बनवणं आणि खाणं याचे दर दिवशी तीन तासांप्रमाणे २१ तास पकडुया. प्रवास रोज करावा लागत असेल तर त्याचे दर दिवशी दोन तासांप्रमाणे १४ तास पकडुया. म्हणजे आपल्या दैनंदिन कामात ९१ तास गेले तर तब्बल ७७ तास राहतात. आता नोकरी करत असाल तर पुन्हा त्यातून आठ तासाच्या नोकरी प्रमाणे ५६ तास वजा करा. उरले २१ तास असतातच. चला यातून सुद्धा काही इमर्जन्सी आली, प्रवास लांबला, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबावं लागलं यासाठी आणखी सहा तास वजा करू. म्हणजे उरले १५ तास. याचाच अर्थ संपूर्ण आठवड्यात तुमच्याकडे फक्त तुमच्याकडे असे १५ तास असतात. बर या संपूर्ण गणितात मी रविवार सुद्धा पकडला आहे. जो तुमच्यासाठी तुमच्या कामाच्या वेळापत्रकानुसार बोनसही ठरू शकतो. आणि प्रत्येक शनिवार किंवा दुसरा आणि चौथा शनिवार सुद्धा सुट्टी असेल तर मग सोने पे सुहागाच असते. मी इथे जसं गणित मांडलं आहे तसं तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार मांडा आणि तुमच्याकडे असलेला मोकळा वेळ नोंदवून ठेवा.

तर मी काढलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला १५ तासांचा मोकळा वेळ सात दिवसात मिळतो. म्हणजेच प्रत्येक दिवशी दोन तास दहा मिनिटे हातात. आता तुमच्या कोणत्या जगण्याच्या म्हणजे आवडीच्या गोष्टीं आहेत ते तुम्ही ठरवून घ्या, तुमच्या कोणता ताे छंद ताे आनंद कोणत्या दिवशी तुम्हाला घ्यायचा आहे याचं एक वेळापत्रक तयार करा.

अनेकांची तक्रार असते की व्यायाम करायला, पेपर वाचायला, चालायला जायला, किंवा गिटार, पियानो, बासरी, तबला वाजवायला, गाण्यांचा, चित्रकलेचा सराव करायला वेळ नसतो. यातलं आपण व्यायाम घेऊ. व्यायाम करताना तुम्हाला योगसाधना, एरोबिक्स, स्ट्रेचिंग, अप्स आणि जिमचे व्यायाम करायचे असतात. पण हे सर्व करायला पुरेसा वेळ नसतो.

एक तर एकच कोणती तरी पद्धत तुम्ही फॉलो करा आणि सगळ्या करायच्या असतील तर तुम्ही त्याचं वेळापत्रक बनवा. तुम्ही योगसाधना करताना प्राणायाम (कपालभाती, भ्रामरी ), डीप ब्रीदिंग, अनुलोम विलोम इ.हे पाउण तास करू शकता. व्यायाम झाला की दहा मिनिटे शवासन नक्की करा. (तुम्ही झोपणार नाही याची काळजी घ्या.) यात एक तास जाईल. उरला एक तास दहा मिनिटे. हा वेळ तुम्ही रात्री जेवून झालं की आपला छंद जोपासण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अर्धा तास एरोबिक्स करा आणि अर्धा तास पेपर वाचा. एरोबिक्सने थकायला होतं म्हणून ते पूर्ण एक तास ठेवलं नाही. यादिवशी योगसाधना करायची नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करायची. पण दहा मिनिटे शवासन नक्की करायचं. उरलेला एक तास पुन्हा रात्री पुस्तक वाचण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी, मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे सात दिवस ठरवून घ्या.

कामात असताना दर तासाने पाच ते दहा मिनिटे उभं राहून एखादा व्यायाम प्रकार नक्की करा. झोपण्याच्या दोन तास आधी इमर्जन्सी नसेल तर कटाक्षाने मोबाईलला आपल्यापासून लांब ठेवा.

हे सर्व करत असताना तुमच्या कामाच्या वेळापत्रकानुसार सकाळी शक्य तितक्या लवकर उठण्याचा सराव करा. सकाळी साडेचार वाजता उठून तुम्ही आपला दिवस सुरु केलात तर दिवस उत्तम जाईल याला एक शास्त्रीय कारण आहे, पण त्याविषयी पुन्हा केंव्हा तरी. साडेचार वाजता उठणं शक्य नसेल तर ६ किंवा सहाच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा. किंवा रोज उठता त्याच्या अर्धा तास आधी एक दिवस उठा. तसेच दोन दिवस उठा मग चौथ्या दिवशी आणखी अर्धातास लवकर उठा. आपण आपल्या शरीराला सवय लावू तशी ती लागते हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं काम करत असताना सुद्धा जगण्याचे मार्ग शोधून काढू शकता आणि वेळ नाही हे कारण पुसून टाकू शकता. कसा वाटला हा प्लान, कमेंट करून मला नक्की कळवा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page