Saturday, April 18, 2026
Google search engine

माेबाईल चाेरी प्रकरणी एका बालकास अटक

दिनांक २८/१०/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे येवुन दिलीप देवराव नवघरे, वय ५६ वर्ष, रा. विश्वकर्मा चौक, बालाजी फिर्यादी नामे वार्ड, चंद्रपुर यांनी रिपोर्ट दिली कि, तक्रारदार यांची मुलगी हि दिनांक २४/१०/२०२४ रोजी ०५:०० वा ते ०६/३० वा चे दरम्यान घराचे वॉल कंपाउंडवर विवो कंपणीचा वाय ०२२ प्लस मोबाईल ठेवुन शौचालयाकरीता गेली व फ्रेश होवुन घरात आली असता सदरचा माबाईल दिसुन न आल्याने शोध घेतला असता मिळुन आला नाही. सदर

मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमानी चोरून नेले आहे अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक. ८९१/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.स. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे पुढील तपासामध्ये मुखबीरव्दारे खबर प्राप्त करून अतीशय अल्पशा कालावधी मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकास सदर गुन्हयासंबंधाने ताब्यात घेवुन विचारपुस करून सदर गुन्हयातील मुद्देमाल जप्त करून तसेच त्याचेकडुन इतर ०७ वेगवेगळया कंपणीचे अन्ड्रॉईड मोबाईल कि.अं. ७०,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री सुधाकर यादव सा., मा. पोलीस निरीक्षक, प्रभावती ऐकुरके मॅडम, पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि श्री. निलेश वाघमारे, पोउपनि संदीप बच्छिरे, सफौ महेंद्र बेसरकर, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, संतोष कावळे, शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम व महिला पोहवा भावना रामटेके यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page