
चंद्रपुर जिल्हा पाेलिस यांच्या वतीने नागरीकांना जाहीर आवाहन
सत्यमेव जयते
सण उत्सवानिमित्त बाहेरूपांवी गेल्यानंतर घरात चोरी होऊ नये म्हणुन घ्यावयाची दक्षता
चंद्रपुर जिल्हा पाेलिस महाराष्ट्र
घर कुलपबंद करुन बाहेरगांव जातांना शेजारी आपला पहारेकरी या म्हणी प्रमाणे आपल्या शेजाऱ्यास आपल्या कुलूपबंद घरावर लक्ष ठेवण्या बाबत कळवावे.
घराच्या दरवाज्यास उच्च प्रतीचे कुलूप व कोंडा लावावे.
बाहेरुन दिसणारे घरातील लाईट चालू स्थितीत ठेवावे.
शक्य असल्यास आपल्या घराच्या आवती भोवती चांगल्या प्रतीचे (Night Vision) CCTV कॅमेरे लावण्यात यावे.
आपल्या गल्लीत काहीतरी विक्री करण्याचे उददेशाने अनोळखी इसम आल्यास त्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी, शक्य झाल्यास आपल्या मोबाईल मध्ये त्या इसमाचा फोटो काढून घ्यावा. बाहेरगांवी जातांना संबंधीत पोलीस स्टेशन ला कळवावे.

शक्य झाल्यास घरातील सोन्या, चांदीचे दागीने किंवा घरातील मौल्यवान वस्तु व रोख रक्कम घरातील कपाटात न ठेवता बँकेमध्ये, लॉकरमध्ये ठेवावे. आपल्या घराच्या आजुबाजुच्या परिसरातील लाईट रात्रीचे वेळी चालू स्थितीत राहतील याबाबत प्रयत्न करावे.
आपल्या वार्ड, गल्लीत किंवा गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करुन आळीपाळीने आपल्या वार्ड, गल्लीत किंवा गावात रात्र गस्त ठेवावी. शक्यतो बाहेर गावी जातांना आपल्या घरात एखादा व्यक्ती घरी हजर राहतील याची दक्षता घ्यावी.
HELP LINE: 112
Police Control Room: 07172-251200/263100/273258
Email: sp.chandrapur@mahapolice.gov.in Website: www.chandrapurpolice.gov.in
HSP Chandrapur X spchandrapur chandrapur_police



