
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, एक वाहन जप्त
कल्याण सोदारी प्रतिनिधी चंद्रपूर तालुका
घुग्घुस (चंद्रपूर) : शहर पोलीस ठाण्यासमोर अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पोलिस ठाण्यासमोर होणाऱ्या अवैध अहोरात्र वाहतुकीवर पोलिसांची नजर नाही. मात्र आज सकाळी मंडल अधिकारी किशोर नवले व तलाठी घुग्घुसचे मनोज कांबळे यांनी कारवाई करत नायब तहसील कार्यालयात ट्रॅक्टर उभा केला. ही कारवाई गुरुवार, ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ०६.१५वाजता झाली. पुढील तपास सुरू आहे.



