ब्ल्यू लाइनमध्ये अवैधरित्या ले – आऊट टाकणा-या बिल्डारांनी प्लाट धारकांची रक्कम परत करावी.
मनपाने केलेल्या कारवाहीमुळे बिल्डर ले – आऊट धारकांकाचे धाबे दणाणले.
चंद्रपुरातील इरई नदीकाठी लगत असलेले सात ले-आउट अवैध घाेषित करण्यात आले. त्या अनुषंगाने ब्ल्यू लाइनमध्ये ले-आउट टाकुन प्लाट विक्री करणा-या २३ बिल्डरांवर रामनगर पाेसिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु आपल्या हक्काची एक जागा असावी म्हणुन प्लाट घेणा-या प्लाट धारकांची आर्थिक फसवनुक झाली त्याच काय?
मनपा प्रशासनाने अश्या प्लाट धारकांची रक्कम परत मिळायला हवी म्हणुन अवैधरित्या ले – आऊट टाकणा-या बिल्डर व ले – आऊट धारकांवर याेग्य ती कारवाही करत प्लाट धारकांची रक्कम परत मिळवुन द्यावी.
शेवटी मनपा आधी असते कुंभकर्णी झाेपेत.
पुरातन वास्तु शिल्पा जवळ अवैध बांधकाम असाे किंवा नदी लगत ब्लु लाईन येथे अवैधरित्या ले- आऊट असाे किवा मुख्य रसत्या वरिल अतिक्रमाण असाे हे हाेतांना मात्र चंद्रपुर मनपा कुंभकर्णी झाेपेत असते. जेव्हा यांना जाग येते तेव्हा अनेक लाेकांचे आर्थिक नुकसान हाेत असते. याला जवाबदार मनपा येथिल अधिकारी कर्मचारी आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आधी या सर्व बाबी हाेतांना कल्पना असुन ही जानिव पुर्वक मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असते.
नुकतेच चंद्रपूर इरई नदीच्या तीरावर असलेल्या माैजा वडगाव, गोंविदपूर प्रभागातील ब्ल्यू लाइनमध्ये सात ठिकाणी अवैधरीत्या ले-आउट टाकून भूखंडाची विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला म्हणता येणार नाही तर घडला आहे.
याबाबतची तक्रार चंद्रपूर मनपाच्या सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते यांनी मंगळवारी रामनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार चंद्रपुरातील २३ बिल्डरांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६चे क.५३ (अ) नुसार गुन्हा देखिल दाखल करण्यात आला आहे.
निळ्या रेषेत घर बांधकाम केल्याने मागील आठवड्यात मनपा प्रशासनाने कारवाई केली होती.
या पुर्वी नदीकाठी परिसरातल्या ले -आऊट येथिल प्लाट नागरीकांनी घेवुन कसला ही आर्थिक व्यवहार करू नये म्हणुन मनपाच्या वतीने बैनर फलक सुध्दा लावण्यात आले हाेते.
तरि ही ले -आऊट धारकांनी प्लाट विक्री करण्याचा सपाटा सुरूच ठेवला हाेता. मध्ये मनपा आयुक्तांच्या आदेशाने साह्यक आयुक्त सचिन माकाेडे यांनी नदी जवळ असलेल्या ले -आऊट वर जेसीबी लावुन ले – आऊट येथिल नंबरींग केलेले प्लाट चे गाेटे काढुन टाकले हाेते.
अश्या ले – आऊट धारकांना मनपा प्रशासनाने नोटीस पाठवूनही प्लाट विक्री सुरूच ठेवली होती व त्यावर प्लाट धारकांनी आपले बांधकाम सुरू केले हाेते.
१ ऑगस्ट २०२३ ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत वरील २३ बिल्डर्स व डेव्हलपर्सनी वडगाव व गोंविदपूर प्रभागातील ब्ल्यू लाईनमध्ये अवैधरीत्या लेआउट टाकले. एवढेच नाही तर ते भूखंड अवैधरीत्या विक्रीसाठी काढले.
म्हणुन मनपा प्रशासनाने संबंधित २३ बिल्डर्स व डेव्हलपर्सना नोटीस पाठवून विक्री व बांधकाम थांबविण्यासाठी नोटीस दिली होती. तरीही बांधकाम सुरूच होते.
यात दीपक केशवराव चौधरी, राहुल दिनकरराव बोद्ववार, नानाजी संभाजी इटनकर, पूनम जितेंद्र इटनकर, योगिता राजेंद्र रघाताटे, राजेंद्र श्यामराव रघाताटे, विकास जयभाम घटे, सरिता विकास घटे, नंदलाल चंपालाल बियानी, मधुकर नारायण मानेकर, भरत धोंडूबाजी वाघाडे, स्वाती प्रदीप तातावार, संजय हरीदास लेखवाणी, रवी नारायणदास चिमनानी, मोहन केशवराव ठाकरे, अतुल मारोतीराव रायपुरे, बंडू संभाजी नागरकर, रफीक सत्तार शेख, व्यंकटस्वामी नागय्या पंगा, उत्तम यादव वाघमारे, क्रिष्णा मानाखा मारवा, रामकृष्ण लटभय्या रावा, मंजू शिवमंगल कश्यप या बिल्डर ले -आऊट धारकांचा समावेश आहे.
या बिल्डरांनी केली सर्वसामान्यांची लाखोंने फसवणूक
आधीच चंद्रपूर शहरात जागेची कमतरता आहे. त्यामुळे अनेकजण स्वप्नाचे घर बांधण्यासाठी मिळेल तिथे जागा खरेदी करत आहेत. बिल्डर्स व डेव्ह- लपर्सनी अनेक खरेदीदारांना चांगले भूखंड असल्याची खाेटी बतावणी करून त्यांना भूखंड विक्री केले. त्यातून लाखो रुपये उकळले आहेत, अशी अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे पालिकेने २३ बिल्डर्स व डेव्हलपर्सविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आणखी पुन्हा काही बिल्डरांवर कारवाई हाेण्याची शक्यता आहे. ब्लु लाईन ले – आऊट टाकणा-या बिल्डारांनी प्लाट धारकांची रक्कम परत करावी. अशी मागणी फसवनुक झालेल्या फ्लाट धारकांनकडुन करण्यात येत आहे.
त्यामुळे रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.



