Saturday, April 18, 2026
Google search engine

जुनी शिधापत्रिका सापडत नसेल? तर आता मिळणार ‘ई-शिधापत्रिका’

जुनी शिधापत्रिका सापडत नाही? आता मिळणार ‘ई-शिधापत्रिका’

ऑनलाईन अर्ज : नाव वगळणे, नवे नोंदविण्याची कामे घरबसल्या करा

जुने रेशनकार्ड सापडत नसेल किंवा हरवले असेल तर ई-शिधापत्रिका काढता येते. त्यासाठी पुरवठा विभागाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ई-शिधापत्रिका देण्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

ऑनलाइन लिंकवरून डुप्लिकेट शिधापत्रिकेसाठी अर्ज डाउनलोड करता येतो. शिधापत्रिका डुप्लिकेट फॉर्म पीडीएफ हा फॉर्म फूड सेफ्टी पोर्टलवरून मिळवता येतो. हा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यामध्ये शिधापत्रिका क्रमांक, शिधापत्रिकेत नोंद असणारे कुटुंबप्रमुखाचे नाव, वडील व आईचे नाव, मोबाइल क्रमांक इत्यादी तपशील अचूक द्यावा लागेल. यानंतर काही दिवसांत ई-शिधापत्रिका उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना त्याद्वारे रेशनवर धान्य व अन्य वस्तु खरेदी करता येतील.

या ऑनलाइन सेवेमुळे शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नवे नाव नोंदवणे, स्थलांतरित करणे अशी कामे करता येणार आहेत.

जुनी मार्गदर्शक तत्त्वे भूतकाळातील आहेत

शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालयातही त्याचा अर्ज मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून लाभार्थ्यांना नव्या शिधापत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या शिधापत्रिका वापरून वापरून फाटल्या आहेत. पानेही संपली आहेत.

या लिंकचा वापर करा https:rcms.mahafood.gov.in

पृष्ठ क्रमांक 3 सप्टेंबर 09, 2024 द्वारा समर्थित: erelego.com

शिधापत्रिका हरवली तर करा ऑनलाइन अर्ज

शिधापत्रिका हरविल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल, रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालयातही त्याचा अर्ज मिळतो.

ई-शिधापत्रिका कोणाला मिळणार?

  • सध्याची शिधापत्रिका हरविल्यास नव्या शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर ई-शिधापत्रिका मिळेल.

● जुनी शिधापत्रिका मळकट झाली असेल, फाटली असेल, नावे पुसली गेली असतील तर नवी शिधापत्रिका मिळेल.

पुरवठा कार्यालयात काम वेळेत होण्याची हमी मिळत नाही. या स्थितीत ऑनलाइन प्रणालीमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येतो. लाभार्थ्यांना https:rcms.mahafood.gov.in या पोर्टलवर अर्ज करता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page